शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

दलाल व अधिकाऱ्यांनी हडपला १०० कोटींचा एरिअर्स

By गणेश हुड | Updated: June 28, 2024 20:48 IST

शिक्षण विभागातील बोगस नियुक्त्या : शिक्षकांच्या जिल्हा परिषदेत घिरट्या

गणेश हूड, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : हयात नसलेले जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्याच नव्हे तर अनेक माजी शिक्षणाधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून खासगी अनुदानित शाळांवर शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हा आकडा चारशेहून अधिक असून नियुक्ती आदेशाच्या मोबदल्यात संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून त्यांना मिळालेला १० ते १२ वर्षांचा एरिअर्स हा यातील दलाल, शिक्षण विभागातील अधिकारी व संस्था चालकांनी हडपल्याचा आरोप आहे. नुसता एरिअर्सचा आकडा १०० कोटीहून अधिक असल्याची जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा आहे.

आजवर फक्त सोमेश्वर नैताम यांच्याच बोगस स्वाक्षऱ्या करून मागील तारखांत आदेश देवून शिक्षण विभागात शिक्षक व कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्याची चर्चा होती. परंतु तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांची हुबेहुब स्वाक्षरी करणारे बहाद्दर शिक्षण विभागात कार्यरत आहेत. बोगस नियुक्त्यांबाबचे वृत्त प्रकाशित झाल्याने या शिक्षकांच्या जिल्हा परिषदेत घिरट्या सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी झाल्यास नोकरी तर जाईलच पोलीस चौकशीलाही सामोरे जावे लागणार असल्याने आता त्यांना आापली फसवणूक झाल्याची जाणीव झाली आहे. आम्ही अडकलो तर तुम्हालाही सोडणार नाही. असा इशारा दलाल व संबंधित अधिकाऱ्यांना या शिक्षकांनी दिल्याची माहिती आहे.

तपासात नियुक्ती आदेश कधी दिला. संबंधित शाळा संचालकांनी या बाबतचा प्रस्ताव पाठविला होता का? किती वर्षांचा एरिअर्स संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना मिळाला. या बोगस नियुक्ती आदेशाला शालार्थ आयडी कुणी दिला. याचा उलगडा चौकशीतून होणार असल्याची दबक्या आवाजात शिक्षण विभागात चर्चा आहे.

रेकार्ड नष्ट करण्याचे प्रयत्न

बोगस नियुक्ती प्रकरणाचा रेकॉर्ड शिक्षण विभागातून बेपत्ता करण्याच्या दलालाच्या हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे एरिअर्सची ६० ते ७० लाखांची रक्कम देवूनही नोकरी धोक्यात आल्यास शिक्षकच या प्रकरणातील सत्य समोर आणतील. असा इशारा काही शिक्षकांनी खासगीत बोलताना दिला. एका शिक्षकांकडून एरिअर्सचे ६० ते ७० लाख रुपये गृहीत धरल्यास नुसता एरिअर्सचा आकडा शंभर कोटींच्या पुढे जातो. यावरून या घाेटाळयाची व्याप्ती व्यापक असल्याचे दिसते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी