शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बीटी बियाण्यांचे १०९ पॅकेट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:43 IST

कृषी विभागाने खरीपाचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांची पेरणीच्या अनुषंगाने लगबग सुरू होणार आहे. यंदा कापसाचे क्षेत्रफळ वाढले आहे. त्याचाच फायदा घेत बोगस बीटी बियाण्यांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शुक्रवारी मौदा तालुक्यातील अडेगाव येथे धाड टाकून १०९ पॅकेट बोगस बीटी बियाणे जप्त केले. विशेष म्हणजे शासकीय गोदामात बीटी बियाण्यांची साठवण केली होती.

ठळक मुद्देशासकीय गोदामात केला होता साठा :नागपूर जि.प.कृषी विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषी विभागाने खरीपाचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांची पेरणीच्या अनुषंगाने लगबग सुरू होणार आहे. यंदा कापसाचे क्षेत्रफळ वाढले आहे. त्याचाच फायदा घेत बोगस बीटी बियाण्यांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शुक्रवारी मौदा तालुक्यातील अडेगाव येथे धाड टाकून १०९ पॅकेट बोगस बीटी बियाणे जप्त केले. विशेष म्हणजे शासकीय गोदामात बीटी बियाण्यांची साठवण केली होती.मिळालेल्या माहितीनुसार कृषी विभागाला मौदा तालुक्यातील अडेगाव येथे एका व्यक्तीकडून अवैध बीटीची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे शुक्रवारी दुपारच्या सुमारास धाड टाकण्यात आली. येथील सिंचन विभागाच्या बंद गोदामात हे बीटी बियाणांचे पॅकेट ठेवून होते. यात १४ पॅकेट बिल्ला तर ९५ पॅकेट अरुणोदय नावाचे असल्याची माहिती आहे. रघू नावाच्या व्यक्तीच्या मालकीचे हे पॅकेट असल्याचे सांगण्यात येते. कृषी विभागाने रघूच्या विरोधात मौदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यावर्षातील ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी बुटीबोरी येथे ९९९ बोगस बीटी बियाणे पॅकेट मिळाले होते. जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी पंकज लोखंडे यांनी ही कारवाई केली. बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे अधिकारी प्रवीण देशमुख यांनी तालुका स्तरावर भरारी पथक तयार केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीraidधाड