शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  नोकरीचे आमिष दाखवून १० लाख रुपये उकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 20:54 IST

नोकरीचे आमिष दाखवून १० लाख रुपये उकळणाऱ्या तिघांविरुद्ध इमामवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देबनावट नियुक्तीपत्र दिले : इमामवाड्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल : एकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोकरीचे आमिष दाखवून १० लाख रुपये उकळणाऱ्या तिघांविरुद्ध इमामवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बशिर रमजान खान (वय ६५) जमीर बशिर खान (वय २९) आणि रेणू ऊर्फ जोया जमिर खान (वय २७) अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही मोठा ताजबाग परिसरात राहतात. बशिर खानला पोलिसांनी अटक केली आहे.रमाकांत भगवानदास ताम्रकर (वय ५०) इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंटखाना, ईगल पॅलेसमध्ये राहतात. त्यांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, ताम्रकर यांची रेल्वेचे निवृत्त कर्मचारी बशिर खान यांच्यासोबत ओळख होती. त्यातून ते खान परिवारातील सदस्यांच्या संपर्कात आले. ताम्रकर यांना आयुष आणि अमन नामक मुले आहेत. ते बेरोजगार असल्यामुळे या दोघांना चांगली नोकरी मिळावी म्हणून ताम्रकर प्रयत्नरत होते. त्यांनी खान यांच्याकडेही आयुष आणि अमनच्या नोकरीचा विषय काढला होता. या दोघांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष बशिर खान, जमीर आणि जोया खान या तिघांनी दाखविले. त्यानंतर १ सप्टेंबर २०१६ ते ६ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत ताम्रकर यांनी आरोपींना १० लाख रुपये दिले. पोलिसांच्या माहितीनुसार, ही रक्कम घेतल्यानंतर आरोपींनी आयुष आणि अमनला नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र दिले. प्रत्यक्षात नोकरी मिळालीच नाही. त्यामुळे ताम्रकर यांनी आपली रक्कम परत मागितली. ती परत न मिळाल्याने प्रकरण इमामवाडा ठाण्यात गेले. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर उपरोक्त तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील बशिर खानला अटक करण्यात आली असून, जमीर व जोयाची चौकशी सुरू असल्याचे इमामवाडा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूर