शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील बजाजनगरात १० लाखांची धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 23:11 IST

कारखानदाराच्या सदनिकेतून १० लाखांची रोकड चोरट्याने लंपास केली. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये ७ ते १४ जूनदरम्यान ही धाडसी घरफोडी घडली. शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देकारखानदाराच्या सदनिकेतून रोकड लंपास : परिसरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कारखानदाराच्या सदनिकेतून १० लाखांची रोकड चोरट्याने लंपास केली. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये ७ ते १४ जूनदरम्यान ही धाडसी घरफोडी घडली. शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.डागा लेआऊटमध्ये श्रीकृष्ण अपार्टमेंट आहे. येथे ४०१ क्रमांकाच्या सदनिकेत निशांत विमलकुमार बिरला (वय ३७) राहतात. त्यांचा एमआयडीसीत वॉटर ड्रिंकिंग बॉटलवर लावल्या जाणाऱ्या वेष्टणाचा कारखाना आहे. ७ जूनला सकाळी त्यांचा परिवार त्यांच्या मूळ गावी कोलकाता येथे गेला. तेव्हापासून ते सदनिकेत एकटेच आहेत. सकाळी ९ वाजता कारखान्यात निघून गेल्यानंतर ते रात्री उशिरा घरी पोहोचतात. त्यांनी व्यवसायातून मिळालेली ११ लाखांची रोकड शयनकक्षातील कपाटात ठेवली होती. त्यात काही दोन हजारांच्या, काही ५०० च्या तर उर्वरित १०० च्या नोटांची बंडलं होती. कारखान्यातील कर्मचाºयांना पगार देण्यासाठी त्यांना पैशाची गरज भासल्याने त्यांनी शुक्रवारी शयनकक्षातील कपाट उघडले असता त्यात केवळ १०० च्या नोटांचे बंडल (एक लाख रुपये) दिसले. उर्वरित १० लाखांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार ज्ञानेश्वर पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बिरला यांच्या सदनिकेत जाऊन पाहणी केली. घरातील सर्व साहित्य जैसे थे होते. त्यामुळे कपाटाचे ड्रॉवर चावीने उघडून रक्कम लंपास करण्यात आली होती. त्यामुळे कारखान्यात जाताना बिरला यांच्याकडून घाईगडबडीत चुकून दार उघडे राहिले असावे आणि चोरट्याचे आयते फावले असावे, असा अंदाज आहे.संपर्कातील व्यक्तीचा संशयया धाडसी चोरीत बिरला यांच्या संपर्कात असलेल्यांपैकीच कुणाचा तरी सहभाग असावा, असाही संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी बिरला यांच्याकडे नेहमी येणे-जाणे असलेल्या तसेच काम करणाऱ्यांवर नजर रोखली आहे. शुक्रवारपासून काहींची पोलिसांनी चौकशीही केली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर