लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेच्या एनडीएसच्या पथकांनी रविवारी १०९ प्रतिष्ठानांची तपासणी केली. १० जणांकडून ८१ हजारांचा दंड वसूल केला.
लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने ६ प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार, तर धरमपेठ झोनअंतर्गत ७ प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार दंड वसूल केला. हनुमाननगर झोनच्या पथकाने दोन प्रतिष्ठानांची तपासणी केली. धंतोलीमध्ये १० प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार दंड वसूल केला. नेहरूनगरमध्ये १५ प्रतिष्ठानांची तपासणी केली. गांधीबाग झोनच्या पथकाने ५ प्रतिष्ठानांची तपासणी केली. सतरंजीपुरा पथकाने ४ प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार दंड वसूल केला. लकडगंजच्या पथकाने १४ प्रतिष्ठानांची तपासणी १० हजार, आशीनगर झोनच्या पथकाने २१ प्रतिष्ठांनाची तपासणी करून ११ हजार दंड वसूल केला. मंगळवारी झोनच्या पथकाने २३ प्रतिष्ठानांची तपासणी करून १०हजार दंड वसूल केला. एनडीएस पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.