शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या १० आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 14:45 IST

सालेकसा कनिष्ठ महाविद्यालय परिसरात बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या १० जणांना वनविभागाच्या विषेश पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.

ठळक मुद्देनागपूर व गोंदिया वनविभागाची कारवाई

नागपूर : सालेकसा येथील कनिष्ठ महाविद्यालय परिसरात बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या १० जणांना वनविभागाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बिबट्याच्या कातडीसहसह इतर अवयव जप्त केले आहेत. 

सविस्तर माहितीनुसार, शनिवारी सालेकसा येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाच्या मैदानावर बिबट्याच्या कातडीची विक्री होत असल्याची माहिती नागपूर वनविभागास प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाला गोंदिया येथे रवाना करुन गोंदिया वनविभागाच्या पथकासह सालेकसा परीसरात सापळा रचून १० जणांना ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत आरोपींकडून बिबट्याची कातडी, ४ पंजे, दात, मिशा व ३ मोटार सायकल इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या बिबट्याला कोसमतर्राच्या जंगलात माहे-जुलै २०२१ मध्ये शिकार करून त्याचे अवयव काढण्यात आले व त्यानंतर विक्री करण्याकरता बाहेर काढले, असल्याचे आरोपींनी चौकशी दरम्यान सांगितले.

१) राधेश्याम जोहार उईके, रा.जल्लाटोला, २) जोगेश्वर सुप्रीदास दसेरीया, रा. धनसोवा वोरी, ३) पप्पू जोहारलाल मडावी, रा. जांभळी, ४) दिनेश प्रभुदयाल श्रीवास्तव, रा. भंडारा, ५) संदिप चोखा रामटेके, रा.मोकारा, ६) दिनेश ताराचंद सहारे, रा.देवरी, ७) विनोद सुखदेव दशरीया, रा. कावरावांध ८) लितेश कृष्णकुमार कुंभरे, रा. वाघनदी (छत्तीसगढ़), ९) परसराम राया मेश्राम, रा. गिरोला व १०) रामकृष्ण छोटेलाल डहाले, रा. पांढरी अशी आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ च्या विविध कलमान्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर, पुढील तपास प्रदिप पाटिल, सहाय्यक वनसंरक्षक, गादिया हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीleopardबिबट्याSmugglingतस्करी