शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

नागपुरातून निघणाऱ्या घनकचऱ्यात १० ते १२ टक्के प्लास्टीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 20:32 IST

प्रदूषण हा विषय आता ग्लोबल झाला आहे. जगात ज्या-ज्या घटकापासून प्रदूषण होतेय त्यामध्ये प्लास्टीक सर्वात अग्रेसर आहे. कारण प्लास्टीक हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग झाले आहे. प्लास्टीकचाच सर्वात मोठा धोका पर्यावरणाला बसतोय. भारतात पर्यावरण आणि स्वच्छतेच्या बाबतीत होत असलेल्या भरपूर प्रयत्नामुळे यावर्षी युनायटेड नेशनने प्लास्टीकपासून होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी भारताला प्रतिनिधित्व दिले आहे. नागपूरचा विचार केल्यास शहरातून निघणाऱ्या घनकचऱ्यातून १० ते १२ टक्के प्लास्टीकचा समावेश असतो.

ठळक मुद्देपर्यावरणाला प्लास्टीकचा धोकाजगभरात प्लास्टीकच्या प्रदूषणाची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदूषण हा विषय आता ग्लोबल झाला आहे. जगात ज्या-ज्या घटकापासून प्रदूषण होतेय त्यामध्ये प्लास्टीक सर्वात अग्रेसर आहे. कारण प्लास्टीक हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग झाले आहे. प्लास्टीकचाच सर्वात मोठा धोका पर्यावरणाला बसतोय. भारतात पर्यावरण आणि स्वच्छतेच्या बाबतीत होत असलेल्या भरपूर प्रयत्नामुळे यावर्षी युनायटेड नेशनने प्लास्टीकपासून होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी भारताला प्रतिनिधित्व दिले आहे. नागपूरचा विचार केल्यास शहरातून निघणाऱ्या घनकचऱ्यातून १० ते १२ टक्के प्लास्टीकचा समावेश असतो.युनायटेड नेशनतर्फे १९७४ पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. दरवर्षी पर्यावरण दिनावर एक थीम ठेवल्या जाते. यावर्षी युनायटेड नेशनने ‘बीट द प्लास्टीक वेस्ट’ ही थीम ठरविली आहे. केंद्र सरकारने २०१६ मध्ये कमी जाडीच्या प्लास्टीक बॅग विक्रीवर बंदी आणली होती. सोबतच भारतात पर्यावरणाच्या बाबतीत होत असलेले काम, स्वच्छतेसाठी देशभरात राबविण्यात आलेले अभियान यामुळे भारताला या थीमवर काम करण्यासाठी प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. प्लास्टीकचे विघटन सहज होत नाही. पृथ्वीवर प्लास्टीकचे अस्तित्व बराच काळ टिकते. घनकचºयात प्लास्टीकचे अस्तित्व १० ते १२ टक्के असते. प्लास्टीक जळाल्यानंतर त्यातून मर्क्युरी, डायआॅक्साइन, फ्युरनसारखे घातक पदार्थ उत्सर्जित होतात. या घातक पदार्थापासून कर्करोगाचा धोका निर्माण होतो. भारतात तर प्लास्टीकच्या पन्नीमुळे महापुराची स्थिती निर्माण झाली होती. पाळीव जनावरांच्या मृत्यूमागे प्लास्टीक हे मोठे कारण पुढे आले आहे. समुद्र आणि तलावाच्या इकोसिस्टमला प्लास्टीकचा धोका निर्माण झाला आहे. प्लास्टीकच्या प्रदूषणाची ही भयावह स्थिती लक्षात घेता, प्लास्टीकच्या वापरावर नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे.जगभरात प्लास्टीकचे वास्तव५०० बिलियन प्लास्टीक बॅगचा दरवर्षी उपयोग होतो.१३ मिलियन प्लास्टीक दरवर्षी समुद्रात जाते.१७ मिलियन बॅरल आॅईल प्लास्टीक बनविण्यास वापरले जाते.१ लाख समुद्री जीव प्लास्टीकमुळे मरतात.महाराष्ट्र सरकारच्या प्लास्टीक बंदीवर आक्षेपमहाराष्ट्र सरकारने २३ मार्च २०१८ रोजी प्लास्टीकवर बॅन आणले आहे. प्लास्टीकच्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत. लाखो लोक त्यात काम करीत आहे. त्यामुळे प्लास्टीक बंदी महाराष्ट्र सरकारसाठी शक्य नाही. युनायटेड नेशनच्या मते सिंगल टाईम उपयोगात येणाऱ्या प्लास्टीकवर नियंत्रण आणल्यास ५० टक्के प्लास्टीक प्रदूषण कमी होऊ शकते.नागपुरातही प्लास्टीकचा धोकानागपूरचा विचार केल्यास शहरातून निघणाऱ्या घनकचऱ्यातून १० ते १२ टक्के प्लास्टीकचा समावेश असतो. हा कचरा जशास तसा डम्पिंग यार्डमध्ये जमा होतो. या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने भांडेवाडीत लाखो मेट्रिक टन कचरा आजही पडला आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणून भांडेवाडीत आग लागण्यासारखे प्रकार नेहमीच घडताना दिसताहेत. तरच मिळू शकते प्लास्टीकवर नियंत्रणएकदा वापरून फेकणाऱ्या प्लास्टीकवर नियंत्रण आणल्यास ५० टक्के प्रदूषण कमी होऊ शकते. प्लास्टीक निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी वस्तूच्या लाईफ सायकलची गॅरंटी घेऊन, वस्तू खराब झाल्यानंतर परत घेऊन त्याचा उपयोग झाला पाहिजे. घनकचरा संकलनाचे व्यवस्थापन सुधारावे लागेल. सरकारला प्लास्टीकचा पर्याय शोधावा लागेल.कौस्तुभ चॅटर्जी, समन्वयक, ग्रीन व्हिजिल संस्था

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीpollutionप्रदूषण