शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

"मिहानमध्ये १ लाख युवकांना रोजगार मिळणार"; नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास

By मोरेश्वर मानापुरे | Updated: February 25, 2024 21:49 IST

‘क्लिक टू क्लाऊड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस’च्या कार्यालयाचे भूमिपूजन

मोरेश्वर मानापुरे, नागपूर: कृषिआधारित व्यवस्था विकसित करण्यावर फोकस करणे आणि विदर्भातील शेतकऱ्यांची प्रगती कशी होईल, या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

मिहान येथे ‘क्लिक टू क्लाऊड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस’च्या कार्यालयाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मिहानमध्ये लवकरच १ लाख तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने काम व्हावे. त्यासोबतच कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्न व्हावे, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला मिहान सेझचे विकास आयुक्त व्ही. श्रमन, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मैत्री, क्लिक टू क्लाउड संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत मिश्रा, कुसुमलता मिश्रा उपस्थित होते.गडकरी यांनी क्लिक टू क्लाउड कंपनीद्वारे विकसित ‘अ‍ॅग्रिपायलट’ या प्रकल्पाचे सादरीकरण बघितले. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतीचे उत्पादन वाढविण्यास फायदेशीर ठरणारा हा प्रकल्प आहे. कंपनीद्वारे कॉम्पॅक्ट सॉइल डॉक्टरची निर्मिती करण्यात आली असून शेतकºयांना काही मिनिटांमध्ये मृदा परीक्षण करून मिळेल. गडकरी यांनी यासंदर्भात माहिती घेतली व प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. कंपनी २०० ते ३०० जणांना रोजगार देणार आहे. संचालन सन २०२२५ पासून नवीन इमारतीत सुरू होईल. कंपनीने २०२९ मध्ये १.२ एकर जमीन घेतली होती.

कंपनीला आयआयएम नागपूरचे सहकार्य

क्लिक टू क्लाउड कंपनी आयआयएम नागपूरच्या सहकार्याने फार्म रिसर्च लॅब तयार करणार आहे. या लॅबमध्ये पूर्णत: एआय अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने शेतकºयांना उपयोगाचे ठरणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर