शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या सात महिन्यात १ कोटी, १२ लाख महिलांचा प्रवास; लालपरीवर गृहलक्ष्मी भरभरून प्रसन्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 18:03 IST

 खडखडाट असलेल्या एसटीला आली भरभराट.

नरेश डोंगरे , लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : सवलतीचे स्वागतदार उघडल्यामुळे गृहलक्ष्मी लालपरीवर चांगलीच प्रसन्न झाली आहे. लक्ष्मीची पावलं वळल्यामुळे खडखडाट असलेल्या एसटीच्या तिजोरीला चांगलीच भरभराट आली आहे.  गेल्या वर्षीपर्यंत एसटी महामंडळाच्या बसेस रिकाम्या ठणठण धावताना दिसायच्या.  मात्र एसटी महामंडळाने १७ मार्च २०२४ ला महिलांना सरसकट प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत जाहीर केली. तेव्हापासून गावोगावच्या महिला एसटीकडे धाव घेऊ लागल्या अन् रिकाम्या एस टी बसेस महिलांनी फुलून गेल्या. गर्दी अशी की l, अवघ्या  सात महिन्यात तब्बल एक कोटी, १२ लाख, ५० हजार ६६८ महिलांनी नागपूर विभागातून प्रवास केला. 

जानेवारी ते जुलै २०२४ या सात महिन्यातील प्रवासी महिलांची आकडेवारी काढल्यास सर्वाधिक प्रवासी महिलांनी मे महिन्यात प्रवास केल्याचे दिसून येतील. 

विशेष म्हणजे, महिलांना तिकीट भाड्यात सूट जाहीर होण्यापूर्वी एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या अर्ध्यापेक्षाही कमी होती. मार्च २०२३ मध्ये ही सवलत लागू झाली. त्यापूर्वीच्या तीन महिन्यात दर महिन्याला साधारणतः तीन ते चार लाख महिला एसटीतून प्रवास करायच्या. मात्र ५० टक्के प्रवास सवलत लागू होताच मार्च २०२३ मध्ये पाच लाख ३७ हजार महिलांनी प्रवास केला. एप्रिलमध्ये ही संख्या दुप्पटहुन अधिक झाली. अर्थात एप्रिल २०२३ मध्ये १३ लाख ८३ हजार महिलांनी प्रवास केला. मे मध्ये १८ लाख, १६ हजार, जून मध्ये १५ लाख, १० हजार,  जुलैमध्ये १३ लाख, ३६ हजार महिलांनी एसटीतून प्रवास केला. अर्थात मार्च ते जुलै २०२३ या पाच महिन्यात ६५ लाख, ८३ हजार महिलांनी एसटीतून प्रवास केला होता. तर आता २०२४ मध्ये जानेवारी ते जुलै या सात महिन्यात १ कोटी, १२ लाख, ५० हजार, ६६८ महिलांनी एसटीतून प्रवास केला.  घसघशीत गंगाजळी महिलांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे एसटीच्या तिजोरीत घसघशीत गंगाजळी पडली आहे. गेल्या वर्षी मार्च ते जुलै २०२३ मध्ये एसटीचे उत्पन्न ३४ कोटी, ६२ लाख, १६ हजार, ४७४ रुपये होते. यावर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत ६० कोटी, ५ लाख, ९५ हजार, १६ रुपये एवढे आहे. अर्थात यावर्षी एसटी च्या तिजोरीत सुमारे २५ कोटींची जास्त गंगाजळी पडली आहे.

टॅग्स :state transportएसटीBus Driverबसचालक