शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

म्युच्युअल फंड म्हणजे काय?... जाणून घ्या सोप्या शब्दांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 11:06 IST

शेअर बाजाराचे ज्ञान नाही , पण पैसे गुंतवायची इच्छा आहे? शेअर बाजाराचे थोडेसे ज्ञान आहे पण एकरकमी भरपूर पैसे गुंतवता येत नाहीत ? शेअर बाजारातील जोखीम कमी हवी आणि थोडीशी मिळणाऱ्या उत्पन्नात स्थिरता सुद्धा हवी ? या सगळ्या अपेक्षा म्युच्युअल फंड पूर्ण करू शकतो.

महागाई दिवसेंदिवस वाढते आहे, व्याजाचे दर मात्र कमी होत आहेत. दरवर्षी म्हणावी तेवढी आणि आपल्याला पाहिजे तेवढी पगार वाढ होताना दिसत नाही, पण महिन्याचे खर्च वेगाने वाढत आहेत. मग या खर्चाची आणि उत्पन्नाची मिळवणी कशी करायची बरं? असा कुठला पैसे देणारा पण विश्वासू पर्याय आहे का?  ज्याच्याकडे आपण ठेवलेले पैसे बुडणार नाहीत, आपल्याला हवे तेव्हा पैसे परत मिळू शकतील असा पर्याय उपलब्ध आहे का ? तुमच्या या कठीण प्रश्नाचं सोप्प उत्तर म्हणजे म्युच्युअल फंड !

काय आहे नेमका हा प्रकार?

म्युच्युअल फंड या दोन शब्दांचे अर्थ समजून घेऊया. म्युच्युअल म्हणजे एकमेकांसाठी किंवा परस्परांशी संबंधित आणि फंड म्हणजे निधी किंवा पैसे. असं समजा की तुम्हाला जसा पैसे मिळवण्याचा विश्वासार्ह पर्याय हवा आहे तसाच तो खूप जणांना हवा आहे मग अशा सगळ्या गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्या लोकांचा पैसा हा एका हेतूने एकत्र केला तर त्याला म्युच्युअल फंड असे स्वरूप मिळते.

एका सोप्या उदाहरणाने हे समजून घेऊया असा आहे की 25 जणांना स्टेशनवर बस स्टँड वर उतरल्यानंतर एकाच परिसरातल्या ऑफिसमध्ये जायचं आहे त्या सगळ्यांना साधारण थोड्याफार फरकाने एकाच वेळेला ऑफिसमध्ये पोहोचायचं प्रत्येकाने आपापली टू व्हीलर नेली तर खर्च वाढेल आणि प्रत्येकालाच गाडी चालवायचा चालवायचे कष्ट घ्यावे लागतील याउलट जर एक कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा असेल तर कमी खर्चात सर्वांना त्याचा फायदा होईल नेमकं हेच म्युच्युअल फंड करतात या उदाहरणांमध्ये जेवढं वाटतं तेवढे सोपं नसलं तरी फंडाचा फंडा साधारण हाच आहे !

शेअर बाजाराचे ज्ञान नाही , पण पैसे गुंतवायची इच्छा आहे? शेअर बाजाराचे थोडेसे ज्ञान आहे पण एकरकमी भरपूर पैसे गुंतवता येत नाहीत ? शेअर बाजारातील जोखीम कमी हवी आणि थोडीशी मिळणाऱ्या उत्पन्नात स्थिरता सुद्धा हवी ? या सगळ्या अपेक्षा म्युच्युअल फंड पूर्ण करू शकतो.

गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशाचे एका एक्सपर्टने केलेले व्यवस्थापन म्हणजेच म्युच्युअल फंड.

 

टॅग्स :Knowledge Centerज्ञानाचं केंद्रbusinessव्यवसायMONEYपैसा