शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
6
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
7
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
8
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
9
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
10
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
11
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
12
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
13
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
15
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
16
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
17
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
18
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
19
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर

मुंबईतील रुग्णसंख्येत पुन्हा घट, राज्यात ६, ७२७ नवीन रुग्णांचे निदान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 5:43 AM

मृतांमध्ये नऊ पुरुष तर नऊ महिला रुग्णांचा समावेश होता. सात मृत झालेले रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर १० रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. तर एक मृत ४० वर्षांखालील आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सोमवारी पुन्हा घट दिसून आली. दिवसभरात ६०८ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण वाढीचा सरासरी दैनंदिन दर मात्र ०.०९ टक्के एवढा आहे. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता ७२८ दिवसांवर पोहोचला आहे. आतापर्यंत मुंबईत सात लाख २० हजार ९६४ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सहा लाख ९४ हजार ७९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ४१४ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या आठ हजार ४५३ सक्रिय रुग्ण आहेत. सोमवारी मृत्युमुखी पडलेल्या १८ रुग्णांपैकी १२ रुग्णांना सहव्याधी होत्या. 

मृतांमध्ये नऊ पुरुष तर नऊ महिला रुग्णांचा समावेश होता. सात मृत झालेले रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर १० रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. तर एक मृत ४० वर्षांखालील आहेत. दिवसभरात २८ हजार २९५ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत ७० लाख ७२ हजार ९५३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात ६, ७२७ नवीन रुग्णांचे निदानमुंबई : राज्यात सोमवारी ६ हजार ७२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, १०१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यू दर २.०१ टक्के इतका आहे. आता राज्यात १ लाख १७ हजार ८७४ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१२,०८,३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,४३,५४८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,१५,८३९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४,२४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी, तिसऱ्या लाटेची धास्ती सतावत आहे. आज नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आज १० हजार ८१२ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत एकूण ५८ लाख ९२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ टक्के इतके आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या