एक माणूस थकून भागून घरी आला.. बायकोनं पाण्याचा ग्लास आणून दिला.. तितक्यात मुलगा गुणपत्रिका घेऊन आला..
वडील- विज्ञान- ३९, इंग्रजी ४६, गणित- ४१.. अरे लाज नाही वाटत तुला...? काय अभ्यास करतोस..?
बायको- अहो तुम्ही जरा शांत व्हा..
वडील- तू गप्प बस.. तुझ्याच लाडामुळे बिघडलाय तो.. सतत त्याला पाठिशी घालतेस...
बायको- अहो, जरा ऐका तरी माझं..
वडील- तू शांत राहा.. एक शब्द बोलू नकोस.. वडील कष्ट करतात.. त्याची जराही किंमत नाहीए..
बायको- अहो तुम्ही आधी माझं ऐका.. ती त्याची गुणपत्रिका नाहीए... तुमचीच आहे.. सकाळी कपाट साफ करताना मिळाली..
घरात भयाण शांतता...