एकदा नवरा बायकोचं जोरदार भांडण झालं... अगदी टोकाला गेलं..
बायको नवऱ्यावर प्रचंड संतापली.. आदळआपट केली...
बायको- आता हद्द झाली.. माझी सहनशक्ती संपली..
नवरा- मग आता काय करणार आहेस तू..?
बायको- मी आता माझ्या आईच्या घरी जातेय.. पुन्हा कधीच येणार नाही मी...
नवरा- बिनधास्त जा.. फक्त जाता जाता एक खूशखबर ऐकून जा...
बायको- काय..?
नवरा- तुझी आईदेखील काल वडिलांशी भांडलीय आणि तिच्या माहेरी निघून गेलीय...