नवरा रात्री घरी दारू प्यायला बसला.. मध्यरात्र उलटली.. बाहेर छान पाऊस सुरू होता..
मध्यरात्र होऊन गेली तरी नवऱ्याचा एकही पेग संपेना.. नशेत असतानाही त्याला ती गोष्ट जाणवली..
सकाळ झाली.. बायकोनं रात्रीच्या पिण्याबद्दल विचारणा केली..
बायको- मग काल रात्री किती ढोसलीत..? कितीपर्यंत बसला होतात..?
नवरा- तुझी शप्पथ घेऊन सांगतो.. फक्त १ पेग प्यायलो..
बायको- फक्त एक पेग घेऊन मध्यरात्रीपर्यंत बसला होतात.. कोणाला येड्यात काढताय..?
नवरा- अग खरंच सांगतोय.. डायनिंग टेबलवर बसून पित होता.. एक पेग घेऊन तीन तास बसलो.. तरीही तो संपला नाही..
बायकोनं डायनिंग टेबलवर पाहिलं.. खाली वर लक्ष दिलं..
बायको- कसा संपेल पेग..? जिथे बसला होतात, बरोब्बर तिथेच छत गळतंय... छताला लागली कळ, पेग थेंब थेंब भरं..