नवरा बेडरूममध्ये बसून लॅपटॉपवर ऑफिसचं काम करत होता...
बाजूला बायको आरामात बेडवर पडली होती.. मोबाईलवर टाईमपास करत होती...
अचानक नवऱ्याच्या फोनवर व्हॉट्स ऍप मेसेज आला.. नोटिफिकेशनचा आवाज ऐकू आला..
फोनचा आवाज ऐकताच नवरा बेडरूममधून घाईनं उठला.. फ्रिजवर चार्जिंगला ठेवलेल्या मोबाईलकडे आला..
त्यानं पटकन मोबाईलमधला मेसेज चेक केला.. तो मेसेज बेडरूममध्ये बसलेल्या बायकोनं केला होता..
'येताना फ्रीजमधून पाण्याची बाटली आणा.. तुमची लाडकी बायको...'