नवरा दारू पिऊन घरी आला... त्याचा एकंदरीत अवतार पाहून बायकोला ते समजलं होतं...
बायको- आलात ना पुन्हा ढोसून..?
नवरा- दारू वाईट.. खूप वाईट...
बायको- तरी पिताच ना...?
नवरा- आजपासून सोडली... कारण आज मला साक्षात्कार झालाय दारू वाईट....
बायको- का हो..? आज काय झालंय..?
नवरा- येताना एटीएममध्ये गेलो होतो... दारूच्या नशेत काय करून बसलो मी हे...
बायको- काय केलंत..? फोडलंत की काय एटीएम..?
नवरा- नाही गं.. दोन हजार काढले.. चुकून नोट फाडली आणि एटीएमध्ये निघालेली पावती घडी करून खिशात ठेवली...