सगळे विवाहित मित्र गप्पा मारत होते.. बायकोकडून होणारा त्रास एकमेकांना सांगत होते..
एक एक करून सगळ्यांनी आपली व्यथा मांडली.. फक्त एक जण शांत बसला होता..
सगळ्यांनी त्याला यामागचं कारण विचारलं..
तर तो म्हणाला, माझ्याकडे एक मस्त ट्रिक आहे.. ती वापरून मी काही वेळासाठी का होईना काळाची चक्रं उलटी फिरवतो..
सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.. ही कोणती ट्रिक आहे..? सगळ्यांनी त्याला याबद्दल विचारलं..
त्यानं शांतपणे उत्तर दिलं.. मी लग्नाची सीडी पाहतो.. पण उलट.. शेवटून सुरुवातीकडे.. माप ओलांडून घरात आलेली बायको पुन्हा कारमध्ये जाऊन बसते.. विवाह मंडपात मी तिच्या गळ्यातून मंगळसूत्र काढत असतो.. सगळे विधी अगदी उलट होतात.. हॉल रिकामा.. ती तिच्या घरी.. मी माझ्या घरी.. यातून मला आनंद मिळतो.. मग तो तासभर का होईना..