पिंटू- आजी टीव्ही बघू..?
आजी- नको, माझ्याशी गप्पा मार ना..
पिंटू- आजी, आपल्या घरात नेहमी सहाच सदस्य असणार का.? तू, आई, बाबा, दीदी, मी आणि माझी मांजर..
आजी- नाही बाळा.. तुझ्यासाठी उद्या कुत्रा आणतोय ना.. मग सात होणार..
पिंटू- कुत्र्यानं मांजरीला खाल्लं की मग सहाच होणार ना..?
आजी- नाही बाळा.. तुझं लग्न झाल्यावर सात होणार ना...
पिंटू- दीदी लग्न करून गेल्यावर सहाच होणार ना..?
आजी- मग तुला बाळ झालं की सात होणार ना आपण...?
पिंटू- तेव्हापर्यंत तर तू मरशील.. मग सहाच असू ना आपण..?
आजी (चिडून)- तू जा.. टीव्ही बघ..