एक अतिशय सुंदर, देखणी तरुणी लिफ्टमध्ये आली...
गण्या आधीच लिफ्टमध्ये होता.. मुलीला पाहताच क्षणी ती गण्याच्या मनामध्ये भरली..
मुलगी फोनवर बोलत होती.. मध्येच तिनं गण्याकडे कटाक्ष टाकला..
मुलगी- अग चल मी फोन ठेवते.. लिफ्टमध्ये एक अतिशय रुबाबदार, देखणा मुलगा आहे.. त्याच्याशी बोलता येतं का ते बघते..
गण्याच्या मनात अगदी आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या..
ती मुलगी गण्याकडे वळली अन् नम्रपणे म्हणाली...
मुलगी- सॉरी हं काका..! माझी मैत्रीण खूप पकवते.. तिनं फोन ठेवावा यासाठी खोटं बोलावं लागलं..
गण्या (मनातल्या मनात)- इतक्या कमी शब्दांत, इतक्या शिस्तीत आतापर्यंतच कोणीच माझा असा अपमान केला नव्हता...