पुण्यातला एक १० वर्षांचा मुलगा शहराबाहेर गेला होता... त्याला काकांनी फोटो काढण्यासाठी स्टुडियोत नेलं..
लहान मुलानं नीट उभं राहावं यासाठी फोटोग्राफर प्रेमळ सूचना देत होता...
फोटोग्राफर- बाळा जरा इकडे बघ.. आता ना इथून कबुतर उडणार..
लहान मुलगा- आधी ते लेन्सवरचं कव्हर काढ.. काहीही बडबडू नको.. पोट्रेट मोड वापर मॅक्रो सोबत.. आयएसओ २०० च्या खाली ठेव.. हाय रिझोल्युशनमध्ये फोटो यायला हवा... काय तर म्हणे कबुतर निघणार.. तुझ्या तीर्थरुपांनी टाकलं होतं का त्यात कबुतर...