बायको माहेरी गेली.. घरी नवरा आणि शाळेत जाणारा मुलगा असे दोघेच होते...
बायको सतत नवऱ्याला फोन करून कुठे आहात, काय करताय वगैरे प्रश्न विचारायची.. तिचे फोन सतत सुरू असायचे...
बायको- अहो कुठे आहात..? काय करताय..?
नवरा- घरीच आहे.. वॉशिंग मशीन लावतोय..
बायको- बरं.. आवाज ऐकवा जरा..
नवऱ्यानं फोन वॉशिंग मशीन जवळ नेला आणि मशीनचा आवाज बायकोला ऐकवला..
दुसऱ्या दिवशी बायकोचा पुन्हा फोन...
बायको- अहो कुठे आहात..? काय करताय..?
नवरा- घरीच आहे.. मिक्सर लावतोय..
बायको- आवाज ऐकवा जरा..
नवऱ्यानं फोन मिक्सरजवळ नेला आणि आवाज बायकोला ऐकवला.. पुढले काही दिवस असंच सुरू होतं...
दहा दिवसांनी बायको घरी परतली.. घरात मुलगा एकटा होता..
बायको- काय रे पप्पा कुठे आहेत..?
नवरा- चार दिवस झाले..
बाबा घरीच आले नाहीत.. मिक्सर घेऊन गेलेत कुठेतरी...