अपहरणकर्ता- तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे..
आई- बरं मग..
अपहरणकर्ता- आम्हाला ५० लाख रुपये द्या.. नाही तर मुलगा जिवंत राहणार नाही..
आई- जरा फोन द्या त्याला..
अपहरणकर्ता (मुलाला)- हे घे, तुझ्या आईशी बोल..
आई- तू तिकडे काय करतोय.. तुला कोथिंबीर आणायला पाठवलं होतं ना..? आता मला कोथिंबीर कोण आणून देणार...आईचे हे शब्द ऐकून अपहरणकर्त्यानं डोक्यावर हात मारला..