शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हास्य कट्टाः फेसबुकचा नाद... जिंदगी के साथ, जिंदगी के बाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 12:00 IST

हास्य कट्टा... थोडीशी गंमत

आमचे एक शेजारी होते...वय वर्षे पंच्याऐंशीं ते नव्वद....

मात्र कॉम्प्युटर अन स्मार्टफोन अगदी एखाद्या तरुणाला लाजवतील, इतक्या सफाईने वापरीत.

गेली पाच वर्षे काका अंथरुणावरच बेडरीडन होते. (वाक्य खटकण्यासारखं आहे, 'खरी वस्तुस्थिती' किंवा 'सकाळचं मॉर्निंग वॉक'सारखं)पण काकांच्या अंथरुणावर त्यांचं एक स्पेशल बेड होतं, म्हणून असा शब्दप्रयोग...

छंद फक्त एकच. स्मार्टफोन. हल्ली त्यांना फेसबुकचा नाद लागला होता. दर तासाला स्टेटस अपडेट करायचे. स्टेटस तरी काय??

बीपी अमुक,.. शुगर तमुक, ...नुकतंच दोन दिवसानंतर पोट साफ झालं, फीलिंग फिदरी. इत्यादी इत्यादी...

झोपल्या-झोपल्या काकांनी अनेक विविध क्षेत्रातले आभासी मित्र जोडले होते...

डॉक्टर, वकील, इंजिनियर, इतकंच काय तर मृत-सामग्री केंद्राचे मालक, वैकुंठ रथाचे ड्रायवर,तेरा दिवसांचे काँट्रॅक्ट घेणारे, सर्व उपयोगी क्षेत्रातले लोक काकांचे आभासी मित्र होते..

रोज सकाळी मेसेंजर वर मेसेज यायचे..

"तैयारीकू लगू क्या??"

काका त्यांना ,"वेट अँड वॉच.." चा सल्ला द्यायचे..

एक मात्र विशेष मैत्रीण भेटली होती काकांना..त्यांच्या प्रत्येक स्टेटस वर कॉमेंट करणारी..

शब्द संपले की, ती एखाद्या पायाच्या नखाने जमीन कुरतडणाऱ्या मांजरीचा फोटो टाकायची..

उत्तरादाखल काका टाळ्या पिटणारं माकड टाकायचे..

काकुला वाटायचं, आपल्याला माकड म्हणतो हा थेरडा.

ती वस्सकन फेंदारलेल्या मिश्यांची मांजर टाकायची..

एकंदरीत काय, यमराजाची वाट पाहणं सुकर झालं होतं फेसबुकमुळे..

आणि एक दिवस..साक्षात यामराजाची फ्रेंड रिक्वेस्ट आली.रेड्याचा व्हाट्सअप्प वर मेसेज आला.."कमिंग टुडे..आवरतं घ्या" आदल्या रात्रीच काकांचं फोरजी बंद पडलं..नियतीचे संकेत काकांना समजले..रात्रभर बायको, मुलगा आणि सून..गंगाजल घेऊन बाजूला बसले होते..

काका  शेवटचं स्टेटस अपडेट करत होते.."आम्ही जातो आमुच्या गावा.."

सकाळी सकाळी काका गेले...

क्रियाकर्म आटोपले. ...

पिंडदानाचा दिवस आला.दोन कावळे हजर होते. पण पिंडाला एकही शिवेना...

काकांच्या सर्व इच्छा पुरवायचे वचन दिले गेले,पण कावळे अगदी ढिम्म...

शेवटी काकांचा नातू आला आणि म्हणाला,"आजोबा, तुमच्या अंतिम पोस्टला एकशे साठ लाइक आले आणि मुख्य म्हणजे तुमच्या बेस्ट फ्रेंड आजीची कॉमेंट पण आली, "Thank God, सुटले एकदाची" अशी...

आणि काय आश्चर्य???कावळ्यांची अख्खी खानदान पिंडावर तुटून पडली.☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺

सौजन्यः व्हॉट्स अॅप

टॅग्स :JokesविनोदFacebookफेसबुक