पुष्कर जोग आणि सई लोकूरची वेब सीरिज ठरतेय सुपरहिट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 11:20 AM2020-12-26T11:20:56+5:302020-12-26T11:26:13+5:30

बिग बॉसच्या घरात असताना सई लोकुर आणि पुष्कर जोग या जोडीने रसिकांची भरघोस पसंती मिळवली होती. सई लोकूर घरात अनेकदा पुष्करसोबतच वेळ घालवताना दिसायची.

Sanam Hotline A WebSeries Starring Pushkar Jog And Sai Lokur | पुष्कर जोग आणि सई लोकूरची वेब सीरिज ठरतेय सुपरहिट

पुष्कर जोग आणि सई लोकूरची वेब सीरिज ठरतेय सुपरहिट

googlenewsNext

अभिनेता पुष्कर जोग आणि सई लोकूर यांच्या 'सनम हॉटलाईन' या वेब सीरिजला रसिकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये ही सीरिज लाँच करण्यात आली आहे. आकाश गुरसाले यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. पुष्कर जोग आणि सई लोकूर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते विनय येडेकर, उदय नेने यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अतिशय धमाल असं कथानक या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. 

 

इशान (पुष्कर जोग) आणि त्याचा मित्र अभिजीत (उदय नेने) यांना कॉल सेंटरमधली नोकरी गमवावी लागते. त्यानंतर काहीतरी रोमांचक करण्यासाठी हे दोघे सनम हॉटलाईन ही अडल्ट हॉटलाईन सुरू करतात. ग्राहकांच्या कल्पना आणि इच्छांचे समाधान तंत्रज्ञानाच्या साह्याने करणारी ही सेवा असते. शिवानी (सई लोकूर) ही दोघांची सहकारी आणि इशानची प्रेयसी ही या मित्रांच्या लहानशा स्टार्टअपमध्ये सहभागी होते. त्यांच्या छोटेखानी व्यवसायाला मिळणाऱ्या यशाचा आनंद फार काळ टिकत नाही. त्यांच्या काही ग्राहकांना खंडणीसाठी कॉल येऊ लागतात.

 

तिघांच्या आयुष्याला विनोदी कलाटणी मिळते. सनम हॉटलाईनचे ग्राहक खंडणी जाळ्यात अडकत जातात आणि पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी ही वेब सीरिज पहावी लागेल. वेब सीरिज लाँच झाल्यानंतर प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद लाभतो आहे. या वेबसिरीजबाबत पुष्कर जोग म्हणाला की, डिजीटल माध्यमावर काम करताना प्रयोगशील काम करण्याची संधी मिळाली.काम करण्याचा अनुभव अतिशय उत्तम होता. 

बिग बॉसच्या घरात असताना सई लोकुर आणि पुष्कर जोग या जोडीने रसिकांची भरघोस पसंती मिळवली होती. सई लोकूर घरात अनेकदा पुष्करसोबतच वेळ घालवताना दिसायची. ऑनस्क्रीन पसंती मिळवलेली या जोडीने आता डिजीटल दुनियेतही आपल्या अभिनयाने रसिकांची पसंती मिळवली आहे. सई लोकूर ही नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. सईचा लाइफ पार्टनर कोण असेल, याबद्दलही तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. तिर्थदीप रॉय असं सईच्या पतीचं नाव आहे.

Web Title: Sanam Hotline A WebSeries Starring Pushkar Jog And Sai Lokur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.