कौल मनाचा चित्रपटाचा प्रीमिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2016 06:02 PM2016-10-22T18:02:55+5:302016-10-22T18:02:55+5:30

                 कौल मनाचा या सिनेमाचा भव्य प्रिमीअर शो नुकताच मुंबईत संपन्न झाला. ...

The premiere of Kaul Mana movie | कौल मनाचा चित्रपटाचा प्रीमिअर

कौल मनाचा चित्रपटाचा प्रीमिअर

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">     
           कौल मनाचा या सिनेमाचा भव्य प्रिमीअर शो नुकताच मुंबईत संपन्न झाला. सिनेमातील स्टारकास्टसह  विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती. वेगळ्या विषयाच्या चित्रपट निर्मितीबद्दल मान्यवरांनी निमार्ता-दिग्दर्शकांचे मनापासून कौतुक केले. या प्रिमीअरप्रसंगी आपल्या पाल्यासोबत उपस्थित असलेल्या पालकांनी हा चित्रपट वास्तवदर्शी असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली. रेड बेरी एन्टरटेंन्मेंट प्रस्तुत श्री सदिच्छा फिल्म्स निर्मित कौल मनाचा या चित्रपटात बालमनाचा वेध घेण्यात आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन भिमराव मुडे यांच आहे. अनेक गोष्टीवर भुलण्याच्या या वयात मुलांची मानसिक घालमेल लक्षात घेऊन त्यांना योग्य-अयोग्याची जाणीव करून देणं महत्त्वाचं असतं, हे सांगण्याचा प्रयत्न कौल मनाचा या चित्रपटातून करण्यात आला आहे. सिनेमा माध्यमाने भारावलेल्या राज कुंडल या मुलाची कथा यात मांडली आहे. किशोरवयीन मुलांना अनेक गोष्टींचे कुतूहल असते. बºयाचदा मोठ्यांकडून या कुतुहलाबद्दल योग्य ती चिकित्सा होत नाही. त्यामुळे आपल्या मनातील कुतूहलाविषयी जाणून घेण्यासाठी ते अनेकदा चुकीचा मार्ग चोखाळतात. याच विषयावर कौल मनाचा या सिनेमात भाष्य करण्यात आले आहे. सिनेमावेडया राजच्या आयुष्यात घडणाºया गोष्टींना तो कशाप्रकारे समोरे जातो? या प्रवासात त्याला कोणाची साथ मिळते? याची रंजक तितकीच भावस्पर्शी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या सिनेमात राजेश शृंगारपुरे, समीर धर्माधिकारी, अमृता पत्की, मिलिंद गुणाजी, विजय चव्हाण, जयवंत वाडकर, विजय गोखले,वर्षा दांदळे, कमलेश सावंत, श्वेता पेंडसे, आशुतोष गायकवाड, गिरीजा प्रभू, निनाद तांबडे, गणेश सोनावणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. 

Web Title: The premiere of Kaul Mana movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.