अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते.

तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंवर एक नजर टाकली तर याफोटोंमधील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. ज्ञानदाने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतले फोटोशूट शेअर केला आहे. नाकात नथ घालून मराठमोळ्या अंदाजातील फोटोशूट सगळ्यांच लक्ष वेधून घेते आहे. नववारी साडीतल्या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. फॅन्सनी तिच्या फोटोवर आईशप्पथ नादखुळं, अस्सल मराठमोळ निखळ सौंदर्य, खूप सुंदर अशा कमेंट्स केल्या आहेत. 

तिच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ज्ञानदा कर्लसवरील 'सख्या रे' जिंदगी नोट आऊट, शत:दा प्रेम करावे, ईअर डाऊन यासारख्या मालिकेंमध्ये तिने काम केले आहे. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dnyanada ramtirthkar share her saree photo on social media gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.