शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

झरे.. झाकीर हुसेन सांगताहेत आपल्या संगीत प्रवासाची कहाणी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 06:05 IST

कुठे झाली माझ्या प्रवासाची सुरुवात? ...माहिमचा दर्गा आणि त्याच्या जवळ असलेली आमची छोटीशी खोली. खोलीच्या एका कोपऱ्यात दगडी ओट्यावर रॉकेल भरलेल्या स्टोव्हजवळ खटपट करीत असलेली अम्मा. ‘या मुलाला चार-पाच महिने सांभाळा नीट’, असे सांगणारा, पांढरी दाढी असलेला हडकुळा फकीर आणि कानावर सतत पडत असलेले अब्बाजींच्या तबल्याचे बोल...

ठळक मुद्देविलक्षण सुंदर क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले आहे. फार फार दुर्मीळ आहेत हे क्षण... या संधी माझ्यात काय पेरत होत्या, ते त्या वेळी मला कळत नव्हते... पण जमिनीत खूप काही जिरत होते.

- झाकीर हुसेन‘ग्लोबल पुलोत्सव’ आणि उस्तादजी ‘आशय सांस्कृतिक’, ‘पु.ल. कुटुंबीय’ आणि ‘पुण्यभूषण प्रतिष्ठान’च्या सहयोगाने येत्या वर्षभरात भारतासह जगभरातील एकूण पाच खंडात ‘ग्लोबल पुलोत्सव’ रंगणार आहे. या महोत्सवाचा प्रारंभ नुकताच पुण्यात झाला. त्या कार्यक्रमात जगद्विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांची प्रदीर्घ मुलाखत दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी घेतली. त्या मुलाखतीवर आधारलेल्या लेखाचा हा पूर्वार्ध.‘कसे जुळले या जगभरातील संगीताशी तुझे नाते?’ जगाच्या कोणत्या तरी कोपºयात एखादी उसळती, बेहोश करणारी जाझची मैफल किंवा ब्राझिलमध्ये कुठेतरी ड्रम्सबरोबर जुगलबंदी सुरू असताना कोणीतरी मला विचारत असते, तेव्हा मला सर्वात प्रथम आठवतो तो माहिमचा दर्गा आणि त्याच्याजवळ असलेली आमची छोटीशी खोली. खोलीच्या एका कोपºयात असलेल्या दगडी ओट्यावरील रॉकेल भरलेल्या स्टोव्हजवळ खटपट करीत असलेली अम्मा. ‘या मुलाला चार-पाच महिने सांभाळा नीट’, असे सांगणारा पांढरी दाढी असलेला हडकुळा फकीर आणि कानावर सतत पडत असलेले अब्बाजींच्या तबल्याचे बोल... यांच्याबरोबर वाढलो मी. या वातावरणाची सोबत घेत, ऊब अंगामनावर घेत, तिथे असलेल्या कित्येकांचा दुवा घेत. आणि मग जाणवते ही सगळी मुळं आहेत माझी. मला इथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात रुजवत जाणारी, सतत पायाला आधार देणारी आणि हळूहळू त्याच वेळी उंच होऊन खूप दूरवरचे बघण्यासाठी लागणारी मदत करणारी. दृष्टी देणारी. माझे गुरु आणि पूर्वज यांना विसरूच शकत नाही मी, आणि विसरायलाही नको.- कोण आहे मी? कोणत्या विचारांचे, संस्कारांचे प्रतिनिधित्व करतो? माझ्या गुरुंनीच तर दिला मला एक असा आत्मविश्वास जो, तोपर्यंत शिष्य म्हणून माझ्यापुढे आखलेली लक्ष्मणरेषा ओलांडून जगातील संगीताचे अनेक नवे प्रवाह, त्यातील विचारप्रवाह स्वीकारण्यासाठी आवश्यक होता.- माझ्या प्रवासाची सरुवात झाली ती वयाच्या सातव्या वर्षी. पहाटे ३ वाजता सुरू होणाºया आमच्या रियाझापासून. अब्बाजी पहाटे पहाटे पढंत करायला उठवायचे. ती झाली की नमाज पढून शाळेत पळायचे. त्यावेळी ए.एल. कुरेशी या नावाने अब्बाजी हिंदी चित्रपटांसाठी संगीत देत होते. पस्तीसेक चित्रपटांना त्यांनी चाली दिल्या असतील. त्यामुळे मलाही नौशाद, मदन मोहन, ओ.पी. नय्यर यांच्यासारख्या अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी सहजपणे मिळाली. ते माझ्यासाठी फार महत्त्वाचे होते. कारण तबल्यासारख्या वाद्याला भावनांची भाषा असते, ते मला इथे शिकायला मिळाले. तुम्हाला ‘ओ सजना, बरखा बहार आयी’ हे सदाबहार गीत आठवत असेलच. त्यात फक्त आणि फक्त एकच तबला आहे; पण काय तो ठेका ! एखाद्या गुराख्याने आपल्या हातातील छोट्याशा काठीने सगळा कळप आपल्याला हव्या त्या दिशेने न्यावा, वळवावा असा त्या गाण्यातील तबला काम करतो. तबलावादक सोलो तबला कसा वाजवतो यावरून आपल्याकडे बहुतेकवेळा त्याचे मूल्यमापन केले जाते; पण मी ठामपणे असे म्हणतो, तो तबलावादक साथसंगत कशी करतो यावरून हे मूल्यमापन होणे आवश्यक आहे. कारण तबला हे मुळात साथीचे वाद्य आहे. साठ-सत्तरीच्या दशकात वादक, गायक, नर्तक आणि चित्रपट संगीत या सगळ्यांसाठी वेगवेगळे तबलावादक होते.मला शिक्षण देताना अब्बाजींनी खूप तºहेचे गाणे ऐकायला शिकवले. मी मुंबईत जन्मलेला आणि वाढलेला कलाकार, मला बनारसमधील कबीर चौराहाची संस्कृती, तिथले गाणे कसे ठाऊक असणार? तिथे वाढलेल्या गिरिजादेवी यांचे गाणे, त्या गाण्यातील तराणे, चैती, ठुमरी, झुल्यामध्ये झुलणारा झुला आणि त्याच्या बरोबर झुलणारा तबल्याचा ठेका हे कसे शिकायला मिळणार? कसे अनुभवता येणार? गाण्यातील ते बेहेलावे, तो रस वादनात कसा उतरणार? माझे अब्बाजी गायक होते. त्यांना ठुमरी-टप्पा आणि त्यातील दर्द मिठास हे ठाऊक होते.मी बारा वर्षाचा असताना दर रविवारी सकाळी तबल्याची जोडी पिशवीत घालून बसने आधी नेपियन सी रोड मग आणखी एक बस घेऊन तीन बत्ती भागात जायचो. तिथे एका इमारतीत भल्या मोठ्या घरात बडे गुलाम अली खांसाहेब राहत होते. त्यांना गरज पडल्यास ठेका धरणे हे माझे काम होते आणि त्यासाठी माझी ‘नेमणूक’ तिथे झालेली असायची...!मी तीन वर्षे नृत्य शिकलो आहे हे कोणाला सांगून तरी खरे वाटेल का? मी असाच काहीतरी दहा-बारा वर्षाचा असताना माझ्या अम्माला माझ्या अभ्यासाची काळजी वाटून तिने मला तिच्या मैत्रिणीकडे एक वर्षभर राहायला पाठवून दिले; पण तिची ही मैत्रीण कथक शिकवायची ! मग काय, मेरे लिए वो सोनेपे सुहागा था.. दिवसभर कानावर पढंत आणि तबल्याचे बोल ऐकू यायचे आणि समोर कितीतरी प्रश्न. ती त्यावेळी सीताहरण या विषयावर नृत्यनाट्य बसवत होती. रावण सीतेकडे आला की मला ती सांगायची, ‘अब थोडा बडबड करो तबलेपे. रावण धरती लेके सीताको उठा रहे है...’... ते नाट्य, जटायूशी होणारे युद्ध, हवेत उडणारा रथ हे सगळे तबला कसे दाखवेल? अशी ही परीक्षा... आणि त्यानंतर जेव्हा सीतारादेवी यांच्याशी गाठ पडली तेव्हा माझा हात धरीत त्या म्हणाल्या, ‘बहोत सुंदर लडका है तू, तुझे डान्स करना चाहिये...’- आणि त्यांनी मला उभेच केले. यावेळी नृत्यातील हस्तक शिकलो मी, त्यातील डौल, नजाकत बघितली. अब्बाजींच्या मागे बसून सीतारादेवी, रोशनकुमारी यांची देहबोली समजून घेत राहिलो. एरवी पंडित सामताप्रसादजी, किशन महाराज हे कलाकार कसे भेटणार होते मला? पण मला निव्वळ ते ऐकायलाच मिळाले नाहीत तर काही वेळा त्यांचे विमान चुकल्याने त्यांची जागा घेत साथसुद्धा करावी लागली.एकदा बिरजू महाराजजी यांचा कार्यक्रम होता आणि सामताप्रसादजी यांचे विमान वेळेवर आले नव्हते. ते हैराण होते. सीतारादेवी त्यांना म्हणाल्या, ‘आप परेशान क्यो है?’ आणि माझा हात धरून त्या मला साथ करायला घेऊन गेल्या... महाराजजींच्या नृत्यात, विलायत खांसाहेबांच्या सतारीत आणि हरिजींच्या बासरीतून निर्माण झालेल्या अनेक अद्भुत, विलक्षण सुंदर क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले आहे. फार फार दुर्मीळ आहेत हे क्षण...या संधी माझ्यात काय पेरत होत्या, ते त्या वेळी मला कळत नव्हते... पण जमिनीत खूप काही जिरत होते. जमिनीला समृद्ध करणारे. म्हणूनच वेळ येताच त्यातून अनेक पाझर फुटले... निर्मळ नि जोमदार.. चकित करणारे...शब्दांकन : वंदना अत्रे

manthan@lokmat.comk