शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

Youtube: उनाड फिरतो अन् बक्कळ कमावतो...

By जयदीप दाभोळकर | Updated: August 28, 2022 12:11 IST

youtube: नवनवीन ठिकाणी फिरणं, नवनव्या जागा पाहणं, त्या एक्सप्लोअर करणं कोणाला आवडत नाही? काही लोकांना ते शक्य होतं, तर काहींना कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते शक्य होत नाही. अनेकदा असतात त्या आर्थिक अडचणी. बिहारमध्ये राहणाऱ्या शुभमला भटकंतीची आवड आहे.

- जयदीप दाभोळकर(सीनिअर कन्टेंट एक्झिक्युटिव्ह, लोकमत डॉट कॉम)नवनवीन ठिकाणी फिरणं, नवनव्या जागा पाहणं, त्या एक्सप्लोअर करणं कोणाला आवडत नाही? काही लोकांना ते शक्य होतं, तर काहींना कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते शक्य होत नाही. अनेकदा असतात त्या आर्थिक अडचणी. बिहारमध्ये राहणाऱ्या शुभमला भटकंतीची आवड आहे. त्यामुळेच त्यानं आपला हा छंद जोपासतच कमाईदेखील सुरू केली आहे. ‘नोमॅड शुभम’ असं त्याच्या यूट्युब चॅनलचं नाव. त्यानं आपल्या चॅनलवर अल्पावधीतच तब्बल २.२५ मिलियन युझर्स जोडले आहेत. त्याच्या प्रत्येकच व्लॉगला लाखोंच्यावर व्ह्यूज असतात. केवळ भारतातच नाही, तर भारताबाहेरही तो भटकंती करत असतो. अनेकदा तर खासगी वाहनांनी प्रवास न करता पैसे वाचवत तो हिचहायकिंगही करतो. त्यात त्याच्या पैशांची बचतही होते.  १७ व्या वर्षापासून शुभमने ट्रॅव्हल व्लॉगिंगला सुरूवात केली. आतापर्यंत त्यानं अनेक देशांना भेट दिली आहे. अजून भरपूर फिरायचं आहे, असं तो सांगतो. आता तुम्ही म्हणाल ट्रॅव्हल व्लॉगिंग करून तो इतके पैसे कसे कमावतो किंवा प्रवासाचे पैसे कसे देतो. तर त्याच्या मागे असलेलं कारण म्हणजे, त्याचे फॉलोअर्स पाहून अनेकदा त्याला व्लॉग्ससाठी काही स्पॉन्सर्स मिळतात. तर यूट्युबच्या माध्यमातून वर्षभराच्या कालावधीत २० लाखांच्या आसपास कमाई झाल्याचंही त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं. तुमच्यातही ती कला असेल, काही करण्याची जिद्द असेल तर तुम्हीही नक्कीच यात यशस्वी होऊ शकाल. सध्या शुभम इजिप्तसारख्या देशात फिरत असून, त्या ठिकाणची परिस्थिती तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहे.   

टॅग्स :YouTubeयु ट्यूबSocial Mediaसोशल मीडिया