शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

पाकिस्तानात ‘औरत मार्च’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 06:00 IST

‘खुद खाना गरम कर लो !’, ‘मुझे क्या मालूम तुम्हारा मोजा कहां है?’, ‘दुपट्टा इतना पसंद है, तो खूद पहन लो!’, ‘कन्सेण्ट का नारा, रोजाना!’, ‘माय बॉडी इज नॉट युअर बॅटल ग्राउण्ड!’, आज वाकई मां-बहन एक हो रही है!’, ‘डिव्होर्स्ड अ‍ॅण्ड हॅपी!’ - हे असे फलक घेऊन पाकिस्तानात हजारो बायका रस्त्यावर उतरल्या आणि ..

ठळक मुद्देसमानता आणि अन्यायाविरुद्ध आवाज या वरकरणी दोनच मागण्यांसाठी निघालेले हे ‘औरत मार्च’. मात्र जणू देशावर आलेलं भयानक संकट म्हणूनच या मोर्चांकडे पाहणं सुरू झालं आणि बायकांना त्यापायी जबाबादार धरणंही सुरू झालं.

‘खुद खाना गरम कर लो!’‘मुझे क्या मालूम तुम्हारा मोजा कहां है?’‘दुपट्टा इतना पसंद है, तो खूद पहन लो!’‘कन्सेण्ट का नारा, रोजाना!’‘माय बॉडी इज नॉट युअर बॅटल ग्राउण्ड!’‘आज वाकई मां-बहन एक हो रही है!’‘डिव्होर्स्ड अ‍ॅण्ड हॅपी!’- हे असे नारे लिहिलेले फलक घेऊन हजारो पाकिस्तानी बायका एक दिवस थेट रस्त्यावरच उतरल्या आणि मोठा गहजब झाला. इमरान खान आणि पाठीराखे ‘नया पाकिस्तान’ म्हणत जे फुगे उडवत आहेत त्यांनाच या बायकांमुळे टाचणी लागली आणि नयेपणाचा फुगा फुटला. इतका फुटला की आता पाकिस्तानात अनेकजण आपली महान संस्कृती, परंपरा, कुटुंबव्यवस्था तुटू नये म्हणून धास्तावले आहेत. ज्या हजारो बायकांनी रस्त्यावर येत नारेबाजी करण्याची जुर्रत केली, त्यांना अद्दल शिकवण्यासाठी काय करता येईल याचा मोठा खलही सुरू झाला आहे.नेमका गुनाह काय या बायकांचा?तर ८ मार्च या जागतिक महिला दिनी पाकिस्तानातल्या अनेक शहरांत महिलांनी मोठे मोर्चे काढले. त्या मोर्चांचं नाव ‘औरत मार्च’. कराची, इस्लामाबाद, लाहोर या मोठ्या शहरांतच नाही तर थेट रावळपिंडीसारख्या कट्टरतावादाच्या सावलीत जगणाऱ्या शहरांतही हा औरत मार्च निघाला. हजारोंच्या संख्येनं महिला त्यात सहभागी झाल्या. ‘हम औरतें’ या बॅनरखाली या महिला जमल्या होत्या. त्यांच्या हातात फलक होते, त्यावर उर्दू आणि इंग्रजीमध्ये अनेक घोषणा लिहिलेल्या होत्या. त्या घोषणा वाचूनच तिकडे अनेकांचं डोकं गरगरलं. काहींचं तर पुरतं सटकलं. आपल्या देशात बायका हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरतात आणि थेट-भडक शब्दांत नारेबाजी करतात, नारेबाज फलक जाहीर मिरवतात हे काही बहुसंख्यांना (त्यात काही महिलाही आहेतच) झेपलं नाही.पाकिस्तानात संसद सदस्य असलेले आमीर लियाकत यांनी तर एक भावुक व्हिडीओ ट्विट केला. त्यात त्यांनी पंतप्रधान इमरान खान यांना टॅग करत आवाहन केलं की, ‘मी विनंती करतोय तुम्ही या प्रकरणात लक्ष घाला. या हजारो बायका पाकिस्तानच्या रस्त्यावर उतल्याच कशा? का उतरल्या? त्यांचा अजेण्डा काय? त्यांना पैसा कोण पुरवतंय? दिवसाढवळ्या देशात सरेआम हे मोर्चे निघालेत त्यांच्या मुळाशी जायला हवं !’इमरान खानसाहेबांनी अजून काही या प्रश्नात आपलं मौन सोडलेलं नाही. सोशल मीडियात मात्र हा औरत मार्च आयोजित करणाऱ्या मुख्य आयोजक महिलांना सर्रास बलात्काराच्या, मारून टाकण्याच्या, पाहून घेण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांच्या ट्विटर अकाउण्ट्सवर खुलेआम भयंकर टिपण्ण्या आणि शेरेबाजी सुरू आहे. ज्यात त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली जातेय. मोर्चात सहभागी मुलींचे फोटो पाहून, त्यांचे पत्ते शोधून घरी जाऊन धमकावणं सुरू झालं आहे. दरम्यान, खैबर पख्तुनवा प्रांताच्या विधिमंडळात तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांनं एकमतानं महिला सदस्यांनाच पुढं करत या औरत मार्चविरोधी ठराव मांडला, जो एकमतानं मंजूर झाला. त्यात हा मोर्चा आणि हे कृत्यच ‘अश्लील’ ठरवण्यात आलं. या ठरावात स्पष्टच नमूद करण्यात आलं की, कुणीतरी ‘छुपे घटक’ या मोर्चाला पाठिंबा देत आहे, त्याला आर्थिक रसद पुरवत आहेत. आपल्या देशाविरोधात हा कट आहे. आपली समाज आणि कुटुंबव्यवस्थाच ध्वस्त करून टाकायची म्हणून कुणीतरी हे सारं कुभांड रचतं आहे, ते नेमकं कोण हे शोधायला हवं !’खरं तर समानता आणि अन्यायाविरुद्ध आवाज या वरकरणी दोनच मागण्यांसाठी निघालेले हे ‘औरत मार्च’. मात्र जणू देशावर आलेलं भयानक संकट म्हणूनच या मोर्चांकडे पाहणं सुरू झालं आणि बायकांना त्यापायी जबाबादार धरणंही सुरू झालं.औरत मार्च नेमका आहे काय?काही स्रीवादी महिलांनी एकत्र येत ८ मार्च २०१८ रोजी कराचीत एक मोर्चा काढला होता. तो पहिला औरत मार्च. त्याचं सूत्र होतं, ‘खाना खूद गरम करलो !’ एवढं एकच वाक्य; पण मोठा गहजब झाला. या बायका असं उर्मटासारखं पुरुषांना उद्देशून म्हणूच कसं शकतात, हे उद्धट आहे अशी टीका तेव्हाही झाली. स्वयंपाक कोण गरम करून वाढतं, याला काय स्रीवाद म्हणतात का अशी हेटाळणीही झाली. मात्र तरीही यंदा ८ मार्च २०१९ रोजी पाकिस्तानात औरत मार्च निघाला. हजारोंच्या संख्येनं महिला आणि मुली या मोर्चात सहभागी झाल्या. त्यांच्या हातात घोषणांचे फलक होेते. ती वाक्यं अनेकांना स्फोटक वाटली. काहींना अश्लील वाटली, काहींना उथळ. केवळ हंगामा करणं या एकमेव हेतूपायी या बायकांनी असे फलक लिहिले, हे मोर्चे म्हणजे स्रीवादाच्या नावाखाली कुटुंबव्यवस्थाच मोडीत काढण्याचे प्रकार आहेत अशी टीका झाली. त्यातही एक फलक आणि तो फलक घेतलेल्या महिलांचा फोटो तर ट्विटरवर भयंकर गदारोळाला कारण ठरला. ‘डिव्होर्स्ड अ‍ॅण्ड हॅपी’ हा तो फलक. घटस्फोट घेतलेली महिला आपलं घटस्फोटित असणं असं मिरवूच कसं शकते, हे शोभतं का असे सवाल विचारले गेले.त्याहून मोठा वाद म्हणजे इंग्लंडस्थित ख्यातनाम पाकिस्तानी स्त्रीवादी लेखिका किश्वर नाहीद यांनीही या मोर्चावर टीका केली. त्यांची ‘हम गुनाहगार औरते’ ही कविता पाकिस्तानात अत्यंत गाजलेली आहे, स्रीवादी म्हणून त्यांचा मोठा दरारा आहे. मात्र त्यांनीही हा मोर्चा आणि त्यातल्या भडक घोषणा म्हणजे उदारमतवाद नव्हे, स्रीवादही नव्हे अशी जाहीर टीका केली. त्यानं तर पाकिस्तानात अनेक स्रीवादी महिलाही चकित झाल्या. दुसरीकडे मोर्चात सहभागी बायकांना ‘एलिट बर्गर फॅमिली’तल्या बाया असं लेबलही समाजमाध्यमांत लागलं.प्रत्यक्षात पाहिलं तर या मोर्चांचा हेतू स्पष्ट होता. महिलांवर होणारे बलात्कार, आॅनर किलिंग, अ‍ॅसिड फेकणं, जबरदस्ती लग्न, घरगुती हिंसाचार, घरात दुय्यम वागणूक, घरकामात समानतेच्या विचाराचा अभाव आणि समाजात स्रियांना सन्मान आणि समानतेची वागणूक मिळावी ही मागणी. या प्रश्नांकडे लक्ष वेधायचं म्हणून हे मोर्चे निघाले. विशेष म्हणजे पाकिस्तानातल्या सर्व धर्माच्या, आर्थिक स्तरातल्या महिला त्यात सहभागी झाल्या. आपण या मोर्चात का सहभागी झालो याबाबत स्पष्ट भूमिका अनेकींनी समाजमाध्यमात मांडली. मात्र त्यांचा तो आक्रमक आणि रोेखठोक जाहीर आवेश पाहून जुनाट समाजव्यवस्थेचं धाबं दणाणलं. कुटुंब धोक्यात, समाज धोक्यात, देश धोक्यात म्हणत यामागे कोणत्या देशांतर्गत किंवा ‘बाह्यघटकांचे’ पाठबळ आहे ते शोधा, या बायकांना आवरा असा कंठशोष सुरू झाला.हे कमीच म्हणून या मोर्चाला उत्तर म्हणून कराचीत ९ मार्चला काही पुरुषांनी ‘मर्द मार्च’ही काढला. औरत मार्चमध्ये सहभागी झालेल्या महिलांची टर उडवत पुरुषांच्या प्रश्नांचं काय म्हणत हाकारे पिटले.औरत मार्च नंतर पुढे..सध्या तरी या मोर्चाची मोठी जबरी चर्चाच पाकिस्तानात सुरू आहे. आयोजक महिलांना धमक्या दिल्या जात आहेत. कुटुंब खतरेंमें म्हणत भयंकर भावुक भावुक आणि जुनाट विचारही मांडले जात आहेत. दुसरीकडे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुत्तो यांनी मात्र आयोजक महिलांची भेट घेतली आणि कराचीतल्या मोर्चाच्या हेतूला आपलं पाठबळ जाहीर केलं. पंतप्रधान खान या प्रकरणात मौन धारण करून बसलेत. नवाज शरीफ तुरुंगात आहेत आणि त्यांच्या पक्षानंही गप्पच राहणं पसंत केलंय. आजवर पाकिस्तानातल्या कुठल्याच बड्या राजकीय पक्षानं या मोर्चाला जाहीर विरोध किंवा पाठिंबा दर्शवलेला नाही. मात्र त्यांनी ठोस भूमिका घ्यायला हवी असा दबाव दोन्ही बाजूनं वाढतो आहे. कट्टरपंथीय मात्र भडकले आहेत.या मोर्चांनी पाकिस्तानातल्या पुरुषी समाजरचनेला जोरदार दणका दिला आहे हे तर उघड आहे. चांगलं हेच की, तिकडेही काही पुरुषांनी उघडपणे मान्य केलं की महिलांचे हे प्रश्न रास्त आहेत. या मोर्चांना पाठिंबा दिला. पाकिस्तानात या मोर्चांनी स्रीवादाची एक लाट वरवर तरी आलेली दिसते, ती टिकेल की विरेल याचं उत्तर मात्र दिसत नाही. त्यातल्यात त्यात बरं एकच की यानिमित्तानं बायकांचे समकालीन प्रश्न उघड बोलणं तरी सुरू झालं आहे. आणि समाजमाध्यमांच्या नव्या कनेक्टेड जगात बायकांचा हा आवाज दाबून टाकणं, कटकारस्थानांची लेबलं लावून प्रश्नांवर पांघरुण घालणं इतकं सोपं उरलेलं नाही.बाकी राजकीय इच्छाशक्ती?नया पाकिस्तान असा नारा देणारे खानसाहब राजकीय सत्तेचा विचार करता किती ‘लिबरल’ भूमिका घेतात आणि घेतील का.. याचं उत्तर निदान पुढच्या औरत मार्चपर्यंत मिळावं. कारण पुढच्या वर्षीही हा औरत मार्च निघणारच असं आता या मोर्चाचे आयोजक ठणकावून सांगत आहेत..आपल्या शेजारच्या, ‘शत्रू’ असं लेबल लागलेल्या देशातले हे नवे बुलंद आवाज; त्यातले सच्चे प्रश्न आपल्याही कानाआड न झालेले बरे..(लेखिका लोकमत वृत्तपत्र समूहातमुख्य उपसंपादक आहेत.)

meghana.dhoke@lokmat.þcom