शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

बोगस बियाण्यांचे दृष्टचक्र कधी थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 20:29 IST

कष्टाचे थोडीतरी जाणीव ठेवून कंपन्यांनी शेतकºयांची पिळवणूक थांबवली पाहिजे.

पावसाळा सुरू झाला अन् बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं... पण अल्पावधीतच हे हास्य बोगस बियाण्यांच्या कंपन्यांनी हिरावून घेतलं.यंदा चांगला पाऊस असल्याच्या हवामान अंदाजानं शेतकºयाचं मन हरकून गेलं होतं. झालंही तसंच पावसाने चांगली सुरुवात केली मात्र पावसानं हुलकावनी दिल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. दुसरे संकट ओढवले ते बोगस बी बियाण्यांचे. आधीच आर्थिक कोंडीत अडकलेल्या शेतकºयाला अनेक कंपन्यांनी बोगस बियाणे बाजारात आणले. कृषी केद्रांनीही त्याची विक्री केली. बोगस बियाण्यांच्या दृष्टचक्रातून शेतकरी बांधवांची सुटका कधी होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पावसाळा सुरू झाला की आपल्या संपूर्ण भारतामध्ये नव्या दमाने नव्या उत्साहाने पेरणी सुरुवात करणारे शेतकरी आनंदाने पेरणी करतात; पण यावर्षी मात्र संपूर्ण जगालाच कोरोना नावाच्या संकटाने घेरलेलं आहे. अशातच बोगस बियाण्याने शेतकºयांवर मोठे संकट ओढवले. बळीराजाची फसवणूक होत असताना कंपन्या प्रकरणातून पळवाटा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा कंपन्यांना कायद्याने वेठीस धरले पाहिजे आणि आपली नुकसानभरपाई वसूल केली पाहिजे .शेतकºयांनी शेतामध्ये बियाणी पेरून त्यानंतर काही दिवसांनंतर ते बियाणे उगवलेच नाही. यामुळे बºयाच ठिकाणी शेतकरी वर्ग घाबरून गेला आहे. तेव्हा शेतकºयांनी न घाबरता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा. शेतकºयांनी न्याय मिळत नसेल तर त्यांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी.बोगस बियाण्यांमुळे झालेले नुकसान आणि दुबार पेरणीचे संकट शेतकºयांवर आलेलं आहे. दुबार पेरणीसाठी त्यांनी पैसा कुठून आणावा.? हा सवाल या संपूर्ण हलाखीच्या परिस्थितीमध्ये निर्माण होतो आहे. संबंधित फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. आर्थिक स्वाथार्पायी शेतकºयांची पिळवणूक करणाºया कंपन्यांचा हा फसवणुकीचा खेळ कुठेतरी थांबवणे खूप आवश्यक आहे. ज्या ठिकाणी ही बाब घडत आहे, तेथील शासन, प्रशासकीय, कृषी अधिकारी, सर्वांनी या संपूर्ण प्रकरणावर लक्ष देऊन शेतकºयांना न्याय देण्याचे कार्य करावे. सर्व शेतकºयांनी एकत्र येऊन या बोगस बियाणे प्रकरणावर एकत्रित लढून या कंपन्यांना धडा शिकवणे महत्त्वाचे आहे. छोट्या-छोट्या गोष्टीची काळजी घेत शेतकरी आपली पेरणी करत असतो. पुढे पेरणी करतो. त्याला कधी कधी जंगली जनावरांपासून पिकाचे संरक्षण करावे लागते. त्यासाठी रात्र-रात्र जागरण करावे लागते. आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना तो देशातील सेवा सुद्धा करत असतो. म्हणूनच शेतकºयाला जगाचा पोशिंदा म्हटले जाते; पण हा पोशिंदा मात्र सदैव संकटात सापडतो आणि या संकटामध्ये फक्त तोच वादळाला सामना करतो. संपूर्ण जग ^‘वर्क फ्रॉम होम’ करीत असले तरीही आमचे शेतकरी याची इंडस्ट्री मात्र चालूच आहे आणि ही इंडस्ट्रीज बंद पडली तर तुम्हाला आम्हा सर्वांचे खाण्याचे काय हाल होतील, याचा विचार करणे फार महत्त्वाचे. शेतकºयांच्या हक्कासाठी सर्वांनी बोलायला हवं. यांच्यावर वादळ येतो संकटाच वादळ येतो तेव्हा मात्र शेतकरी हतबल होऊन बसतो आणि सगळेजण त्याच्या हालावर फक्त बोलतात करतात मात्र काहीच नाही. शेती ही इंडस्ट्री आहे, ती जर बंद पडली तर......? या प्रश्नाचे उत्तर आपण शोधू शकत नाही, अशी अवस्था होईल. त्यामुळे शेतकºयांच्या चाललेल्या पिळवणुकीला थांबण्यासाठी सर्वांनी आवाज उचलने महत्त्वाचे आहे. शेतकºयांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा आणि जे काही कंपनी बोगस बियाणे करून शेतकºयांची पिळवणूक करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सर्वांनी आवाज उठवला पाहिजे. शासनाने अशा कंपन्यांचे परवाने रद्द केले पाहिजेत. तेव्हा त्यांना कळेल की शेतकºयांच्यासोबत केलेली कृती ही एका देशाविरोधी केलेली कृती आहे. जो शेतकरी आहे, त्याच्या हाडावर शेतीची जबाबदारी आहे, त्याला मात्र या सगळ्या गोष्टी मनाला स्पर्शून जाणाºयो आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी खूप गरीब असतो, तो या सगळ्या गोष्टींसाठी खूप खटपट करतो. तिथे शेतीच्या बियाण्यांसाठी पैसा नसतो. त्याला दुबार पेरणीसाठी परवडणारा पैसा आणवा तरी कोठून? त्यामुळे त्यांच्यावर झालेला हा जुलूम कुठेतरी थांबणे महत्त्वाचे आहे. कारण ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने शेतीची पिके घेतली जातात. ग्रामीण भागातील शेतकरी खूप हालअपेष्टा सहन करून जीवाचे रान करतो. त्या कष्टाचे थोडीतरी जाणीव ठेवून कंपन्यांनी शेतकºयांची पिळवणूक थांबवली पाहिजे. आणि बोगस बियाणे हा धंदा बंद केला पाहिजे. शासनानेही अशा कंपन्यांवर कडक कारवाई करून त्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे म्हणजे पुढे चालून कोणीही आपल्या शेतकरी बांधवांच्या आयुष्याशी खेळण्याचे धाडस करू शकणार नाही.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती