शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फायद्याच्या सरकारी योजना कोणत्या? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 13:20 IST

Government Schemes: केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी अनेक सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. आपल्या फायद्याच्या योजना नेमक्या कोणत्या ते पाहू...

- चंद्रकांत दडस, उपसंपादककेंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी अनेक सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. आपल्या फायद्याच्या योजना नेमक्या कोणत्या ते पाहू...प्रधानमंत्री वय वंदना योजनाप्रधानमंत्री वय वंदना योजना ही ज्येष्ठ गुंतवणूकदारांसाठी आहे. विमा कंपनी एलआयसी आणि केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी ही योजना ६० वर्षे ओलांडलेल्या नागरिकांसाठी आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेन्शनची हमी मिळते. या योजनेवर व्याज दरवर्षी ७.४० टक्के निश्चित करण्यात आले आहे. जर पती- पत्नी दोघांनी या योजनेत प्रत्येकी १५ लाख रुपये गुंतवले, तर त्यांना निश्चित व्याजदराने ३० लाख रुपयांवर वर्षाला २ लाख २२ हजार रुपये व्याज मिळेल. या आधारावर दरमहा १८ हजार ५०० रुपयांची मासिक पेन्शन त्यांना मिळेल. योजनेची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे १० वर्षांनंतर गुंतवणूकदाराला गुंतवणूकीची संपूर्ण रक्कम परत मिळते.प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा भारत सरकारची सामान्य लोकांना जीवन संरक्षण देण्यासाठी ही एक उत्तम योजना आहे. तुम्ही वर्षाला फक्त ४३६ रुपये भरून ही योजना घेऊ शकता. ही योजना विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला २ लाखांपर्यंतची आर्थिक मदत देते. ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय चाचणी घेण्याची आवश्यकता नाही. पॉलिसीच्या संमतीपत्रात काही विशेष आजार असल्यास उल्लेख करावा लागेल. या पॉलिसीचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. पॉलिसी खरेदी करण्याचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ५५ वर्षे निश्चित केले आहे. जर तुम्ही ही पॉलिसी घेण्याचे ठरवले असेल, तर तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे. तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे.अटल पेन्शन योजनाअटल पेन्शन योजना ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी असंघटित क्षेत्रातील कामगारांचे भविष्य सुरक्षित करते. या योजनेंतर्गत, वयाच्या ६० वर्षांनंतर, सदस्याला महिन्याला १ हजार ते ५ हजार रुपये पेन्शन दिली जाते. पेन्शनची रक्कम या योजनेत जमा केलेल्या रकमेवर अवलंबून असते. सदस्याचा मृत्यू झाल्यास, योजनेतील नॉमिनी असलेली व्यक्ती जमा केलेल्या रकमेवर किंवा पेन्शनच्या रकमेवर दावा करण्यास पात्र आहे.

टॅग्स :MONEYपैसा