शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
3
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
4
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
6
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
7
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
8
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
9
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
11
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
12
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
13
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
14
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
15
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
16
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
17
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
18
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 
19
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
20
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

हेल्मेट सक्तीचं करायचं काय? एका शहराला एक न्याय आणि दुसऱ्या शहराला दुसरा न्याय!

By नितीन जगताप | Published: June 12, 2022 6:04 AM

गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी मुंबईत दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीसोबतच आता मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेटची सक्ती केली आहे. हेल्मेट सक्तीचा विषय निघाला

नितीन जगताप, प्रतिनिधी, मुंबई

गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी मुंबईत दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीसोबतच आता मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेटची सक्ती केली आहे. हेल्मेट सक्तीचा विषय निघाला की, राज्यातील विविध शहरांत त्याचे वेगवेगळे सूर ऐकायला येतात. पुण्यासारख्या शहरात तर हेल्मेट सक्ती लोकांनी झुगारून दिलेली आहे. कायदा जर सर्वांसाठी समान आहे, तर एका शहराला एक न्याय आणि दुसऱ्या शहराला दुसरा न्याय, हे कसे चालेल?  हेल्मेटला विरोध करून नेमके आपण काय साधतो, आपल्या सुरक्षेपेक्षा आपला हेल्मेटविरोध मोठा आहे का? 

कोरोनामुळे मानवी आयुष्य फार झपाट्याने बदलले आहे. प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल दिसून येत आहेत. लोकांच्या आरोग्यविषयक सवयी बदललेल्या आहेत. सतत २० सेकंद साबणाने हात धुणे, हाताच्या बोटांचा डोळ्याला/तोंडाला स्पर्श होऊ न देणे, घसा कोरडा राहणार नाही, याची काळजी घेणे. विशेष म्हणजे, व्यक्ती बाहेर जात असेल तर मास्कचा नियमित वापर करणे. लोकांनी मास्क वापरणे किती कमी कालावधीत स्वीकारले आहे. मग हेच हेल्मेटच्या बाबतीत दुचाकीस्वारांकडून का होत नाही? ‘मास्क घालू नका, न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडा’, असे कोणी म्हणत आहेत का? एकट्या पुण्यात मागील १५ वर्षांत किमान ८-१० वेळा हेल्मेट सक्तीची कारवाई झाली; पण लोकांनी ती हाणून पाडली. 

२०१८ मध्ये हेल्मेट न घातल्यामुळे दुचाकीस्वारांनी गमावला जीव ४३,६१४ - भारत५,२५२ - महाराष्ट्र  

जर त्यांनी हेल्मेट घातले असते, तर त्यापैकी ४०% लोकांचा जीव नक्कीच वाचला असता. तरुणांचे सर्वाधिक बळी मुंबई वाहतूक पोलिसांच्या २०२०च्या आकडेवारीनुसार दुचाकी अपघातात तरुणांचा सर्वाधिक बळी गेला आहे. एकूण अपघाती मृत्यूंपैकी २० ते ३४ या वयोगटातील तरुणांचे प्रमाण ५७ टक्के आहे. हे मृत्यू टाळण्यासाठी वाहतूक नियमांच्या अंमलबजावणी सोबतच जनजागृतीची गरज आहे. 

मुंबईत सर्वाधिक अपघाती मृत्यूमुंबईत २०१५ ते २०२० या पाच वर्षांत १६६ दुचाकीस्वारांनी जीव गमावला. त्यानंतर १४८ पादचारी, २२ वाहनचालक, ६ सायकलस्वारांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आपण मास्क घालायला लागलो; पण ज्या देशात १.५ लाख लोक रस्ते अपघातामुळे मरण पावतात, त्या देशात लोक हेल्मेट कधी घालणार. - संदीप गायकवाड, वाहतूक अभ्यासक, परिसर संस्था 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र