शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

खास मित्राला युरोप टूर गिफ्ट करायचीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 10:13 IST

मुलगी ही बापाच्या मनाचा हळवा कोपरा असते. तर वडील हे मुलीचं सर्वस्व असतं. जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. त्यानिमित्त अभिनेत्री रुमानी खरे हिने तिचे वडील कवी संदीप खरे यांच्यासोबत असलेलं नातं उलगडलं आहे.

- रुमानी खरे, मालिका अभिनेत्री सुरुवातीपासूनच 'मम्माज गर्ल' ऐवजी 'डॅडीज गर्ल' आहे. आई चोवीस तास माझ्यासोबत असायची. बाबा खूप कमीच असायचा. त्यामुळे शिस्त लावण्याचं काम आईकडे होते. बाबा मित्रासारखा वागायचा. काही खाऊ हवा असेल, शाळेतून सुट्टी हवी असेल किंवा मस्का मारायचा असेल तर मी नेहमी बाबाकडे जायचे.आई-बाबा दोघेही त्यांच्या त्यांच्या परीने मुलांवर चांगले संस्कार करत असतात आणि तुम्हाला जितकं चांगलं आयुष्य देता येईल त्यासाठी प्रयत्न करतात. आई चांगलं खाऊ घालते तर बाबा कुठे तरी फिरायला घेऊन जाईल आणि गोष्टी सांगेल, किंवा काही तरी चांगलं चांगलं वाचून दाखवेल. माझ्याकडे बाबा खूप वेळ घरी नसायचा पण त्यामुळे तो जेव्हा केव्हा घरी असायचा तेव्हा पूर्ण वेळ मला द्यायचा. एकदा तर पहाटे आम्ही गोव्याचा प्लान केला आणि दुपारपर्यंत गोव्याला निघूनसुद्धा गेलो होतो.चांगले मार्क्स, चांगले टक्के मिळवण्यासाठी काही मुलांवर दबाव टाकला जातो. माझ्या बाबतीत हे कधीच झालं नाही. ९० टक्के मिळायला हवेत असं प्रेशर कधीच नव्हतं. बाबा रिझल्ट पाहून कधी चिडला नाही. आईने प्रेशराईज नाही केलं. तू जे काही करशील ते मनापासून कर, त्यातून तुला आनंद मिळायला हवा, इतकंच त्यांचं म्हणणं. पास झाले तरी ते ओके असतात.बाबा खूप शांतपणे सगळ्या गोष्टी करतो. आधी मला प्रश्न पडायचा की, बाबा का एवढा प्रसिद्ध आहे? तो तर इतरांच्या बाबांसारखा नॉर्मल वागतो, बोलतो. काहीतरी काम असेल तर तो बाहेर जाऊन यायचा, प्रयोग करायचा. घरी आपल्यावर माझा अभ्यास घ्यायचा. खूप नॉर्मल रुटीन असायचं घरी. नंतर हळूहळू लक्षात येत गेलं. बाबा खूप कमी माझ्यावर चिडला किंवा रागवला आहे. सतत चिडचिड करणाऱ्यापैकी तो नाही. हो, पण जेव्हा चिडतो तेव्हा फार चिडतो.मला आठवतेय कितीही उशीर झाला तरी बाबा येणार, छान पापी घेणार आणि मी आलोय हं, हे सांगणार. थोडा वेळ थोपटणार. मी जागी असेन तर गप्पा मारायला येणार. प्रयोगादरम्यानचे किस्से सांगणार. त्यामुळे दमलेल्या बाबाची कहाणी हे गाणं कायम जवळचं वाटतं आणि इमोशनल करतं. अजूनही ते गाणं ऐकायचं मी टाळतं. बाबा माझा खूप जवळचा मित्र आहे. मी त्याच्याकडे जाऊन मोकळेपणे बोलू शकते. अगदी कोणत्याही विषयावर.माझ्या या 'खास मित्रा'ला युरोप टूर गिफ्ट म्हणून द्यायची इच्छा आहे. बाबाला फिरायला खूप आवडतं आणि युरोप तर त्याला फार आवडतो. आम्ही खूप वर्षांपूर्वी युरोप टूर केली होती पण त्याला जेवढा वेळा हवा होता तेवढा मिळाला नव्हता. त्यामुळे त्याला एक युरोप टूर गिफ्ट द्यायची आहे. तेही महिनाभरासाठी!     शब्दांकन - गीतांजली आंब्रे

टॅग्स :Father's Dayजागतिक पितृदिन