शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

..धबाबा तोय आदळे

By admin | Updated: July 10, 2016 09:35 IST

बेलाग पसरलेल्या सह्याद्री पर्वतरांगांमुळे महाराष्ट्रात धबधब्यांची रेलचेल. पावसाचा जोर वाढत गेला की धबधब्यांची सादही घुमू लागते. पर्यटकांची पावलेही मग आपसूकच तिकडे वळतात. यातले काही धबधबे भिजण्याचे, तर काही फक्त दुरूनच पाहण्याचे. त्यातला आनंद मात्र सारखाच अवर्णनीय..

मकरंद जोशी
 
प्रत्येक ऋतूतल्या पर्यटनाची खासियत असते. हिवाळ्यात फिरताना धुक्याने भरलेला आसमंत हवाहवासा वाटतो, तर पावसाळ्यात फिरताना दऱ्या-डोंगरांमधून ओसंडून वाहणारे धबधब्यांचे लोट आकर्षित करतात. पावसाळा सुरू झालेला आहेच, मग आपणही बसल्या बसल्या धबधब्यांचे पावसाळी पर्यटन करूया. 
महाडहून बिरवाडीकडे येण्यासाठी गोवा हायवे सोडून आत वळल्यानंतर भोवतालचा परिसरच सांगू लागतो की तुम्ही एका अद्भुताकडे निघाला आहात. एका बाजूला नदीचा खळाळता, आवेगाने वाहणारा प्रवाह आणि दुसरीकडे हिरव्या गर्द झाडांनी भरलेले डोंगर, त्यात मधूनमधून ओसंडणारे पाण्याचे प्रवाह यामुळे आपण खरोखरच एखाद्या अस्पर्श ठिकाणी पोहोचणार याची खात्री पटते. नदीवरचा पूल ओलांडल्यानंतर गाडीरस्ता संपतो तिथेच कानावर पडतो जलधारेचा अनाहत नाद. भोवतालच्या डोंगरांवर आपटून प्रतिध्वनित होणारा हा नाद ज्या जलधारेमुळे निर्माण झालेला असतो, तिच्या समोर उभे राहिल्यावर डोंगराच्या माथ्यावरून प्रचंड आवेगाने कोसळणाऱ्या त्या प्रपाताला पाहिल्यावर समर्थ रामदासस्वामींचे शब्द आपोआप आठवतात..
‘गिरिचे मस्तकी गंगा,
तेथुनि चालली बळे । 
धबाबा लोटती धारा,
धबाबा तोय आदळे ॥’
शिवथरघळीच्या धबधब्याचे वर्णन करणारे हे शब्द समर्थांनी आधी लिहिले आणि मग त्याबरहुकूम हा धबधबा पडू लागला की काय असं वाटावं इतके हे शब्द चपखल आहेत. याच शिवथरघळीत समर्थांनी दासबोधाची रचना केली आणि याच घळीत वास्तव्य करून मोऱ्यांच्या जावळीत शिवाजी महाराजांना शिरकाव करून दिला. शिवथरघळ आणि तिथला धबधबा म्हणजे नैसर्र्गिक सौंदर्य, ऐतिहासिक परंपरा आणि आध्यात्मिक अधिष्ठान यांचा त्रिवेणी संगमच आहे.
राकट देशा, कणखर देशा म्हणून गौरविलेल्या आपल्या महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पर्वतरांगेमुळे धबधब्यांची कमी नाही. पावसाचा जोर वाढला की आंबोली घाटापासून ते ताम्हणी घाटापर्यंत ठिकठिकाणी धबधब्यांची साद घुमू लागते. मग पर्यटकांची पावले जव्हारजवळच्या दाभोसा धबधब्यापासून ते कोकणातल्या मार्लेश्वराच्या धबधब्यापर्यंत, जिथे जिथे जलजल्लोश सुरू असतो तिथे वळतात. भंडारदऱ्याचा रंध्रा फॉल्स, महाबळेश्वरचा लिंगमाळ धबधबा, साताऱ्याजवळचा वज्राई धबधबा, नाशिकजवळचा दुगारवाडीचा धबधबा, वसईजवळचा चिंचोटीचा धबधबा, कणकवलीजवळचा सावदाव धबधबा, वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधबा अशी महाराष्ट्रातल्या धबधब्यांची यादी बरीच मोठी आहे. यातले काही धबधबे भिजण्याचे - म्हणजे जिथे धबधब्याच्या धारेखाली जाऊन भिजण्याचा आनंद घेणं धोकादायक नाही असे, तर काही मात्र दुरूनच पाहण्याचे आहेत. अशा पाहण्याच्या धबधब्यांमधले एक महत्त्वाचे नाव म्हणजे साताऱ्याजवळचा ठोसेघरचा धबधबा. साताऱ्याहून चाळकेवाडीला जाताना हा धबधबा आहे. सुमारे अकराशे फुटांवरून या धबधब्याच्या धारा (दोन आहेत) कोसळतात. ऐन पावसाळ्यात भोवतालच्या हिरव्यागर्द डोंगरातून पडणाऱ्या या पांढऱ्याशुभ्र धारा मन मोहून टाकतात. मात्र पावसाळ्यानंतर ठोसेघरचा जोर मंदावतो.
धबधब्यांचा विषय निघाल्यावर कविवर्य 
बा. भ. बोरकरांनी आपल्या उत्फुल्ल शब्दकळेनं मराठी कवितेत अमर केलेला गोव्यातला दूधसागर धबधबा आठवणं अपरिहार्य आहे. कर्नाटक आणि गोवा राज्यांच्या हद्दीवर असलेला हा धबधबा जणू आपल्या नावाप्रमाणेच दुधासारख्या पांढऱ्याशुभ्र पाण्याचा अखंड अभिषेक डोंगरावर करत असतो. सुमारे एक हजार फुटांवरून तीन-चार टप्प्यांमध्ये दूधसागराच्या धारा कोसळत असतात. गोव्यातल्या भगवान महावीर अभयारण्यात येणाऱ्या या धबधब्याजवळून मडगाव-बेळगाव रेल्वेमार्ग गेलेला आहे. या रेल्वेमार्गावरून प्रवास करताना डब्यात बसल्या बसल्या दूधसागराच्या अफाट जलधारांचे आरामात दर्शन होते. पण अशा ‘कोरड्या’ दर्शनात मजा नाही. त्यासाठी रेल्वे ट्रॅकमधून चालत जाऊन धबधब्याच्या तुषारांनी चिंब भिजायलाच पाहिजे. कर्नाटकातही धबधब्यांची रेलचेल पाहायला मिळते. कुर्ग, शिमोगा, कारवार या भागामध्ये पर्यटकांचे आकर्षण ठरलेले अनेक धबधबे आहेत. कर्नाटकातल्या धबधब्यांविषयी बोलताना जोग किंवा गिरसप्पा आणि गोकाक यांचा विशेष उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणारच नाही. घटप्रभा नदीच्या प्रवाहात तयार झालेला गोकाक धबधबा बेळगावपासून फक्त साठ किलोमीटरवर आहे. या अर्धवर्तुळाकार धबधब्याचा घनगंभीर जलनाद पावसाळ्यात दूरवरूनच ऐकू येतो. आपल्या देशातला पहिला जलविद्युत प्रकल्प याच धबधब्यावर सन १८८७ मध्ये सुरू झाला होता. शिमोगा जिल्ह्यातल्या शरावती नदीवरचा जोग धबधबा भारतामधील एका टप्प्यात (मध्ये कुठेही न थांबता) सर्वात उंचावरून पडणारा दुसऱ्या क्रमांकाचा धबधबा म्हणून मानला जातो. (पहिला मेघालयमधील नोहकालिकाई फॉल आहे.) या धबधब्याच्या चार धारा राजा, राणी, रोअरर आणि रॉकेट म्हणून ओळखल्या जातात.
मात्र धबधब्यांची मिरास केवळ दक्षिण भारतालाच लाभलेली नाही. जरा उत्तरेकडे जाऊ लागल्यावर डोळ्यांचे पारणे फेडणारा नजारा पाहायला मिळतो तो मध्य प्रदेशातल्या जबलपूर येथे. नर्मदेच्या प्रवाहात भेडाघाट येथे ‘धुवाधार’ हा विशाल जलप्रपात निर्माण झाला आहे. याच्या अखंड कोसळणाऱ्या धारांमुळे जे पाण्याचे तुषार उडतात त्याने भोवतालचे वातावरण कोंदून जाते आणि ‘धुवाधार’ हे नाव सार्थ ठरते. ऐन मे महिन्यातही या धबधब्याचा जलविलास जराही कमी झालेला नसतो. मात्र धुवाधारच्या पसाऱ्यामुळे अवाक होऊ नका, तो मान मध्य प्रदेशलगतच्या छत्तीसगडमधल्या चित्रकूट धबधब्याचा आहे. छत्तीसगडमधल्या जगदालपूरजवळ असलेल्या या धबधब्याची उंची फक्त ९५ फूट आहे, पण विस्तार इतका मोठा आहे की ‘भारतीय नायगरा’ हे टोपणनाव याला अगदी शोभून दिसते. विस्तारानुसार हा भारतामधला सर्वात रु ंद धबधबा आहे. ओरिसामध्ये उगम पावून छत्तीसगडमध्ये वाहत आलेल्या इंद्रावती नदीच्या प्रवाहात हा धबधबा तयार झालेला आहे. भर पावसाळ्यात जेव्हा इंद्रावती नदी दुथडी भरून वाहत असते तेव्हा या धबधब्याची रुंदी नऊशे फुटांपेक्षा जास्त असते. या काळात मातीमुळे गढूळ झालेल्या लालसर पाण्याचे लोटच्या लोट या धबधब्यातून पडत असतात. या धबधब्याची धार जिथे पडते त्या प्रवाहात बोटिंग करायची सोय आहे. त्यामुळे धबधब्याच्या धारेखाली जाण्याचा अनुभव घेता येतो. वर्षभर या धबधब्याचा जोर कायम असतो. त्यामुळे कोणत्याही ऋ तूत चित्रकूटचे दर्शन आनंददायीच असते. गिरीच्या म्हणजे पर्वताच्या मस्तकावरून पडणारा असो किंवा नदीच्या प्रवाहातला असो, धबधबा तुमच्या पर्यटनाला एक वेगळाच जोम, उत्स्फूर्तता आणि आवेग देऊ शकतात. मात्र कोणत्याही धबधब्याला भेट देताना आवश्यक ती काळजी घ्या. उत्साहाच्या भरात मर्यादा ओलांडू नका आणि अपघाताला निमंत्रण देऊ नका.