शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
2
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
3
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
4
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
5
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
6
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
7
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
8
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
9
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
10
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
11
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
12
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
13
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
14
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
15
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
16
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
17
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
18
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
19
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
20
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
Daily Top 2Weekly Top 5

अमूल गर्ल - तिच्या ‘डिझाइन’च्या गोष्टीने इतिहास घडवला आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 06:00 IST

हातातल्या पावाच्या स्लाइसवर बटरचा थर लावलेली ही मिश्कील मुलगी गेली कित्येक वर्षे आपल्यासोबत आहे !

ठळक मुद्देutterly butterly ही टॅग लाइन सहज गप्पांच्या ओघात सुचवली आणि अमूल गर्ल हीच टॅग लाइन घेऊन प्रत्येक भारतीयाचा घरात पोहोचली.

हृषीकेश खेडकर

‘अमूल’ हा शब्द ऐकता क्षणीच मनात एक आनंदी भाव निर्माण होतो. ‘अमूल’ हे नाव आणि त्याच्याशी निगडित असलेले अमूल गर्लचे चित्र डोळ्यासमोर दिसायला लागते, पांढरा, गुलाबी, निळा या रंगछटा मनात उमटू लागतात आणि आपण नकळत दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या दुनियेत मनाने पोहोचलेलो असतो. वास्तविक अशा कुठल्याही पदार्थाला प्रत्यक्षात न पाहता किंवा स्पर्श न करता ‘अमूल’ या शब्दाशी निगडित आपण बनवलेल्या एका भावनिक दुनियेत रममाण व्हायला पाहतो. तुम्हाला हे सगळं गमतीशीर नाही वाटत? एक शब्द ज्याला भाषेच्या दृष्टिकोनातून काहीच अर्थ नाही; पण आपल्या विचारांना ठरावीक दिशा देण्याची, एक सुप्त इच्छा मनात जागृत करण्याची ताकद मात्र या शब्दात आहे. कुठून येते ही ताकद? कोण निर्माण करतं? आजच्या डिझाइनच्या गोष्टीत आपण याच प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रय} करू.ब्रँड हा शब्द तुम्ही कधी ऐकला असेल किंवा तुम्हाला माहितीही असेल. आधुनिक जगात वस्तू किंवा सेवा पुरवणारी कंपनी आपल्या ग्राहकांबरोबर एक वैशिष्टय़पूर्ण नातं बनवण्यासाठी स्वत:ची काल्पनिक छबी निर्माण करते जिला आपण ढोबळमानाने ‘ब्रँड’ असं म्हटलं जातं. कंपनीने निर्माण केलेल्या या छबीला जनमानसात पोहोचविण्यासाठी एका विशिष्ट व्यक्तिमत्त्वाची किंवा ओळखीची गरज असते. याला  ‘ब्रँड आयडेंटिटी’ असं म्हणतात. आपल्या ग्राहकाला आपला ब्रँड पूर्णपणो आत्मसात व्हावा; त्याला त्याचा अनुभव घेता यावा यासाठी लोगो, पॅकेजिंग, वेब साइट, सोशल मीडिया, छापील जाहिराती, वस्तू किंवा सेवा पुरवणा:या जागेचे डिझाइन, बिझनेस कार्ड; इतकंच काय तर त्या कंपनीत काम करणा:या लोकांचा गणवेश अशा प्रत्येक संधीतून कंपनी तिचा ब्रँड लोकांर्पयत पोहोचवते. थोडक्यात ‘अमूल’ हा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकणा:या कंपनीचा ब्रँड असेल तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणो ‘अमूल’ हा शब्द ऐकल्यावर ग्राहक म्हणून आपल्या मनात या ब्रँडविषयी येणारे विचार आणि अनुभव म्हणजे त्या कंपनीने जाणीवपूर्वक डिझाइनच्या माध्यमातून तयार केलेली ब्रँड आयडेंटिटी. गोष्टीची सुरुवात होते 1946 साली; त्रिभुवनदास पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणंद येथे अमूल या सहकारी दुग्ध उत्पादन कंपनीची स्थापना झाली. पुढे तीन वर्षानी डॉ. वर्गिस कुरियन ज्यांना दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं; यांची नेमणूक संचालकपदी करण्यात आली आणि नंतर अमूल कंपनीने इतिहास घडवला. Anand Milk Union Ltd. (AMUL)  आणि संस्कृत भाषेतील ‘अमूल्य’ या शब्दापासून प्रेरणा घेत कंपनीचे नाव यथार्थरीत्या ‘अमूल’ असं ठेवण्यात आलं.1966 साली डॉ. वर्गिस कुरियन यांची ओळख सिलव्हिस्टर डाकुन्हा या अॅडव्हर्टायजिंग एजन्सीमध्ये काम करणा:या एका अवलियाशी झाली. मार्केटिंग या विषयाची जाण असणा:या कुरियन यांनी सिलव्हिस्टर यांना पूर्ण निर्मिती स्वातंत्र्य दिलं. काटरून आर्टिस्ट कुमार मोरे आणि स्क्रिप्ट राइटर भरत दाभोळकर यांच्या मदतीने डाकुन्हा यांनी अमूलसाठी जाहिराती बनवायला सुरुवात केली. त्या काळात माध्यमांची उपलब्धता आणि त्यासाठी येणारा खर्च यांचा विचार करता होर्डिगचा वापर जाहिरातींसाठी करण्यात आला. यूस्टन्स फर्नाडिझ या आर्ट डायरेक्टरने अमूल गर्लची निर्मिती केली. हे बनवताना फर्नाडिझ यांनी दोन गोष्टी कटाक्षाने पाळल्या. एक म्हणजे प्रत्येक भारतीय गृहिणीला ही मुलगी मोहक वाटली पाहिजे आणि दुसरी, होर्डिग रंगवण्याच्या दृष्टीने तिची रचना अत्यंत सोपी असली पाहिजे. सिलव्हिस्टर यांची पत्नी  निशा यांनी utterly butterly ही टॅग लाइन सहज गप्पांच्या ओघात सुचवली आणि अमूल गर्ल हीच टॅग लाइन घेऊन प्रत्येक भारतीयाचा घरात पोहोचली.अमूलच्या जाहिरातीत काळानुरूप घडणा:या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी राष्ट्रीय दृष्टय़ा महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केला जाऊ लागला आणि ह्याच मुळे अमूल गर्ल फक्त अमूल कंपनीच्या ग्राहकांनाच नाही तर प्रत्येक भारतीयाला आपलीशी वाटू लागली. कंपनीचा ट्रेडमार्क हाच लोगो म्हणून वापरला जाऊ लागला. आज आपण पहात असलेल्या कंपनीच्या लोगोत 1994 साली श्री केनन कृष्ण यांनी बनवलेल्या The Taste of India या स्लोगनचा समावेश करण्यात आला. दूध, तूप, चॉकलेट, आइस्क्रीम, श्रीखंड असे अनेक पदार्थ घेऊन आपल्या स्वयंपाकघरात पोहोचलेला अमूलचा लोगो खरंच भारताची चव संपूर्ण जगात पोहोचवण्याचं काम करतो आहे. तुम्ही अमूलचे ट्विटर किंवा फेसबुक अकाउण्ट बघितले तर तिथेदेखील तुम्हाला हाच अनुभव येईल. अमूल गर्ल सोशल प्लॅटफॉर्मवरदेखील आजच्या तरुणाईला भुरळ घालत अमूलची ब्रँड आयडेंटिटी जपताना दिसते. इतकंच नाही तर ज्या पद्धतीने याठिकाणी अमूल प्रॉडक्टचे फोटो बघायला मिळतात त्याचे बरेच साधम्र्य प्रॉडक्टच्या पॅकेजिंगवर आढळणा:या फोटोंबरोबर बघायला मिळते. थोडक्यात अमूल या ब्रँडची दृश्यमान ओळख वेगवेगळ्या माध्यमातून सुसंगतरीत्या अत्यंत नावीन्यपणो मांडली आहे. आजही अमूल ब्रँडचा भारतातल्या प्रत्येक आर्थिक वर्गातील माणूस उपभोक्ता आहे ही त्या ब्रँडची यशोगाथाच म्हणावी लागेल.  भारतीयांसाठी अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे अमूल ब्रँडचा उल्लेख जगातील सगळ्यात जास्त काळ यशस्वीरीत्या चालणारी जाहिरात मोहीम म्हणून गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेला आहे.  अमूलचे आजमितीला शंभरहून अधिक प्रॉडक्ट बाजारात आहेत; पण त्यांचे पॅकेजिंग जर आपण बघितले तर ब्रँड आणि आतील खाद्यपदार्थाशी सुसंगत अशा प्रसन्न रंगांचा वापर खास करून डिझाइनमध्ये केलेला आढळतो. अमूलचा लोगो आणि ब्रँड मॅस्कॉट असणारी अमूल गर्ल छोटय़ा टपरीपासून मोठय़ा मॉलर्पयत सगळीकडे तितक्याच प्रभावीपणो ग्राहकाला खुणावत असते. हजारो कोटींची वार्षिक उलाढाल, 86 टक्के  मार्केट शेअर, पाच लाखांपेक्षा जास्त रिटेल स्टोअर आणि चाळीसहून अधिक देशांमध्ये उपस्थिती असणारा हा ब्रँड गेली अनेक र्वष आपल्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे. स्वात्यंत्रपूर्व काळात सहकारी तत्त्वावर चालू झालेले अमूल आज आपल्या देशाची ब्रँड आयडेंटिटी बनलं आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही कदाचित.  

(लेखक वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)