शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

‘द अनकॉमन मॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 06:05 IST

एका कार्यक्रमात आर. के. लक्ष्मण म्हणाले होते, ‘उत्तम बुद्धी व मानवाच्या शरीररचनेचा  ज्यांचा अभ्यास असतो ती व्यक्ती डॉक्टर होते.  उत्तम बुद्धी व तंत्नज्ञानाचा ज्यांचा अभ्यास असतो  ते इंजिनिअर होतात; पण कुशाग्र बुद्धी,  शरीररचना व तंत्नाचा अभ्यास, चांगले रेखाटन  व उत्तम विनोदबुद्धी असे सर्वगुण असलेली व्यक्तीच  ‘व्यंगचित्नकार’ होऊ शकते.  त्यांच्या बाबतीत अतिशय खरं होतं ते ! त्यांच्या उतारवयात त्यांच्या घरी जाऊन त्यांची छायाचित्रे घेण्याचा योग आला, त्यावेळी त्याचं पुन्हा एकदा प्रत्यंतर आलं!

ठळक मुद्देसगळ्या अटी पूर्ण करणारी व्यंगचित्ने म्हणजे आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्ने ! 

- सतीश पाकणीकर 

टिळक स्मारक मंदिराचं सभागृह रसिकांनी खच्चून भरलेलं होतंच; पण वरच्या गॅलरीतही पाय ठेवायला जागा नव्हती. सगळेजण आपल्या आवडत्या कलाकाराच्या जादूच्या रेषांची कमाल अनुभवायला उत्सुक होते आणि त्याबरोबरच त्याचे शब्द ऐकायलाही. भारतातील यच्चयावत राजकारणी ज्याच्या रेषांना बिचकून असत; पण तरीही त्याच्या कुंचल्यातून एकदातरी आपले चित्न उमटावे, अशी मनोमन इच्छा धरत असा हा कलाकार होता. सर्वसामान्य म्हणजेच ‘कॉमन मॅन’चा प्रतिनिधी असलेला ‘अनकॉमन मॅन’ अर्थातच व्यंगचित्नकार आर.के. लक्ष्मण.पडदा बाजूला गेला. मध्यावर असलेल्या टेबलमागे मधोमध बसलेली, पांढरा शर्ट व त्यांचा टिपिकल पद्धतीचा जाड फ्रेमचा काळा चष्मा घातलेली व्यक्ती ही आर.के. लक्ष्मण आहे हे सांगायची गरज नव्हती. बाजूलाच एक मोठा इम्पिरिअल आकाराचे कागद असलेला इझल व काळ्या रंगाचे काही मोठे मार्कर पेन ठेवलेले होते. आधीच्याच वर्षी सिम्बॉयोसिसच्या एका प्रकाशचित्न स्पर्धेत त्यांच्याच स्वाक्षरीने व त्यांच्याच हस्ते मला एक प्रशस्तिपत्नही मिळाले होते. साधारण 1985 सालची ही घटना असावी.कार्यक्र म सुरू झाला. एक-दोन जण त्यांच्याविषयी बोलले. आणि मग आर.के.लक्ष्मण बोलायला उभे राहिले. त्यांचं भाषण त्यांच्या उत्स्फूर्त रेषांच्या इतकंच प्रभावी व मनांची पकड घेणारं होतं. सुरुवातीलाच त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेशासाठी कसा अर्ज केला व त्यावेळच्या डीनने त्यांना कसे पत्न पाठवले की, ‘‘रेखांकनामध्ये विद्यार्थी म्हणून आमच्या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी पात्न होण्याचे कौशल्य तुझ्यात कमी आहे’’ आणि प्रवेश नाकारला. पण त्याच संस्थेनं पुढे काही वर्षांनी कलेचा अभ्यास पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याच्या कार्यक्र मात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं. हा किस्सा अतिशय रंगवून सांगितला. हे सांगताना अतिशय सहजपणे ते बोलून गेले की, ‘‘उत्तम बुद्धी व मानवाच्या शरीररचनेचा ज्यांचा अभ्यास असतो ती व्यक्ती डॉक्टर होते. उत्तम बुद्धी व तंत्नज्ञानाचा ज्यांचा अभ्यास असतो ते इंजिनिअर होतात; पण कुशाग्र बुद्धी, शरीररचना व तंत्नाचा अभ्यास, चांगले रेखाटन व उत्तम विनोदबुद्धी असे सर्वगुण असलेली व्यक्तीच ‘व्यंगचित्नकार’ होऊ शकते. त्यांच्या बाबतीत किती खरं होतं ते !मग त्यांनी हातात मार्कर घेतला. सारं सभागृह श्वास रोखून पाहत होतं की, आता त्या समोरच्या कागदावर काय उतरणार आहे म्हणून. त्यांनी आधी कागदावर पेन न टेकवता एक-दोनदा हात फिरवला. कागदावर वरच्या बाजूला मार्कर टेकला आणि त्यातून हाताचा पंजा निर्माण झाला. त्याला खाली हात काढत त्यांनी एकदा प्रेक्षकांकडे पाहिलं. ‘हाइल हिटलर’ म्हणताना र्जमन अधिकारी जसा हात करीत तसाच होता तो. आता ते हिटलरचे चित्न काढत आहेत असे वाटेपर्यंत त्यांनी एक चेहरा काढला त्यातल्या नाकावरून सगळ्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की, ते हिटलरचे नसून इंदिरा गांधी यांचे चित्न काढीत आहेत. काहीच वर्षांपूर्वी अनुभवलेली आणीबाणी प्रेक्षकांच्या लक्षात असणारच. त्या चित्नाची सुरुवात, त्यात होत गेलेले बदल, आणि त्यातून नुसत्या रेषांतून दिला गेलेला संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. टाळ्या वाजण्याचे थांबेनाच. नंतर त्यांनी तीन-चार सलग रेषांतून महात्मा गांधी हे त्यांचे आवडते आणि प्रसिद्ध चित्न व इतरही काही चित्ने रेखाटली. स्पष्टता, सहजता, मोजक्या रेषा, नेमकं भाष्य व मार्मिक टिपण्णी यांचा तो उत्कृष्ट आविष्कार होता. माझ्या या आवडत्या कलाकाराला कधी भेटता येईल का असा विचार नेहमी माझ्या मनात येत असे. एकदा तर मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसमध्ये नार्वेकर नावाच्या माझ्या मित्नाला भेटायला गेलो असताना - ‘‘इथे आर.के. सर बसतात’’ असं म्हणून त्यांची केबिनही मला दाखवली. पंढरपूरला गेल्यावर मंदिराचा कळस दिसल्यावर वारकर्‍याची जी अवस्था होईल तशी माझी झाल्याचे आठवते. पण त्यांना भेटण्याचे धाडस काही तेव्हा झाले नाही. त्यांच्या रोज येणार्‍या ‘पॉकेट कार्टून्स’मधून ते नियमितपणे भेटत होतेच. त्यांचे एक कार्टून मला आजही अगदी स्पष्ट आठवते. आणि आजही ते तितकेच ताजे व मार्मिक ठरेल. त्या चित्नात एक लाल दिव्याची लांबलचक गाडी थांबलेली आहे. मागच्या सीटवर एक व्यक्ती बसलेली आहे. रस्त्यावर एक भिकारीण बसलेली आहे. तिचं छोटंसं लेकरू भिकेच्या आशेनं त्या गाडीकडे धावतंय. ती भिकारीण त्या पोराला दटावताना म्हणतीयं - ‘कम बॅक, यू फूल. ही वोण्ट गिव्ह एनिथिंग. ही इज अ मिनिस्टर!’  वास्तवाचे चटके; पण विनोदी अंगानं दिलेले. रेषा अन् रेषा जिवंत. अशी आठवणारी अक्षरश: हजारो चित्नं असतील. मध्यंतरीच्या काळात बरीच वर्षे वाहून गेली. आर. के. सर मुंबईतून पुण्यात राहायला आले आहेत असे कळले. पण थकले होते. काय निमित्त घेऊन त्यांच्याकडे जाता येणार? माझी इच्छा मनात तशीच होती. पण आंतरिक इच्छा प्रबळ असली की आपोआप दरवाजे उघडतात याचा मला अनुभव मिळणार होता. 29 जुलै हा सुप्रसिद्ध हास्यचित्नकार र्शी. शि.द. फडणीस यांचा जन्मदिन. त्यांना त्यांच्या 88व्या जन्मदिनाच्या शुभेच्छा द्यायला मी सुभाषनगरमधील त्यांच्या घरी गेलो. माझ्या अगोदरच एक व्यक्ती तेथे बसली होती. ती व्यक्तीपण त्याच कारणाने आली होती. शि.द. फडणीस आतून बाहेरच्या खोलीत आले. त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. मग इतर गप्पा झाल्या. माझी त्या व्यक्तीबरोबर ओळख झाली. पौड रोडवरील सरस्वती लायब्ररीचे र्शी. कैलास भिंगारे. माझं ऑफिस कोथरूड येथे आहे हे त्यांना माहीत होते. ते म्हणाले - ‘‘तुम्ही प्रॉडक्ट फोटोग्राफी करता ना? मग माझं एक काम करून द्याल का? मला आर. के. लक्ष्मण यांच्या काही अँवॉर्ड्सचे फोटो काढून हवे आहेत. आम्ही त्यांच्या चित्नांचं एक प्रदर्शन करीत आहोत. त्यात मला ते फोटो प्रदर्शित करायचे आहेत.’’ मी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. इतक्यात भिंगारे पुढे म्हणाले - ‘‘पण एक अडचण आहे की मला ती अँवॉर्ड्स तुमच्या स्टुडिओत नाही आणता येणार. तुम्हाला त्यांच्या घरी येऊन त्याचे फोटो घ्यावे लागतील.’’ तो क्षण आपोआप माझ्या समोर येऊन उभा राहिला होता. मी आनंदानं होकार दिला व माझं व्हिजिटिंग कार्डही. ‘‘आर. के. सरांच्या तब्बेतीचा अंदाज घेऊन मीच तुम्हाला कळवतो.’’ असे म्हणत भिंगारेंनी निरोप घेतला.काही दिवसात अपेक्षेप्रमाणे भिंगारेंचा फोन आला. शनिवार, 17 ऑगस्ट 2013 या दिवशी संध्याकाळी आर. के. लक्ष्मण यांच्या घरी जाण्याचे ठरले. ठरल्यावेळी आम्ही औंधमधील आयरिस पार्कमधील फ्लॅटच्या बेलचे बटन दाबले. एका सेवकाने येऊन दरवाजा उघडला. आम्ही आत गेलो. लिव्हिंग रूममध्ये वेताच्या खुच्र्यांत र्शी. आर. के. लक्ष्मण व समोरच सौ. कमला लक्ष्मण बसलेले होते. त्यांनी दोघांनीही आमचं हसतमुखानं स्वागत केलं. भिंगारेंनी त्यांना कामाची कल्पना दिली असल्याने त्यांच्या सेवकाकडून त्यांनी ती अँवॉर्ड्स मागवली. त्याने ती आणून तेथील एका टेबलवर ठेवली. मी जागेवरून उठलो. आर.के. सरांना नमस्कार केला व त्यांच्यासाठी आणलेले व काही महिन्यांपूर्वीच प्रसिद्ध झालेले माझे ‘स्वराधिराज भीमसेन’ हे कॉफी-टेबल बुक त्यांना भेट दिले. त्यांनी खुणेनेच मला शेजारच्या वेताच्या मोढय़ावर बसायला सांगितले. पुढे झुकून मी त्या पुस्तकाची कल्पना काय आहे हे त्यांना सांगत एक एक करून पाने उलटवून दाखवत होतो. त्यांच्या चेहर्‍यावरील उत्सुकता आणि भीमसेनी मुद्रा पाहतानाचे त्यांचे भाव त्यांना ते पुस्तक आवडलं आहे हे दर्शवित होते. नंतर त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवत शाबासकी दिली. इतक्यात चहाचे कप आले. चहापान झाले. मी त्यांना त्यांचे काही फोटो घेतले तर चालेल का? असे विचारल्यावर त्यांनी हसूनच मान हलवली.योग्य जागा शोधत मी त्यांची पद्मभूषण व पद्मविभूषण, लाइफ टाइम अचिव्हमेन्ट अँवॉर्ड, रामन मॅगेसेसे अँवॉर्ड या भिंगारेंना हव्या असलेल्या अँवॉर्ड्सच्या फोटोंचे काम पुरे केले होते. माझे हे काम आर.के. सर व त्यांच्या पत्नी दोघेही पाहत होते. त्यांच्या भिंतीवर लावलेल्या त्यांच्या आवडत्या पक्ष्याचे म्हणजेच कावळ्यांच्या चित्नांचे फोटो काढले तर चालतील का? असे मी त्यांना विचारल्यावर त्यालाही त्यांनी हसून दाद दिली. मध्येच एकदा माझ्या लक्षात आले की आर.के. सर समोरच्या टीपॉयवर ठेवलेली ‘द अनकॉमन कॉमन मॅन’ ही त्यांच्याच कामाबद्दलची पुस्तिका घेऊन ती पाहण्यात दंग झालेत. मी माझा कॅमेरा वळवला आणि तो क्षण माझ्या कॅमेर्‍यात अलगदपणे स्थिरावला. ते कॅमेर्‍यात बघत असतानाही मी क्लिक करत गेलो. त्यांच्या बरोबरच मी सौ. कमला लक्ष्मण यांचीही पोट्र्रेट्स टिपली. मी उपलब्ध प्रकाशात फोटो टिपत होतो, त्यामुळे त्या दोघांचेही नैसर्गिक असे भाव कॅमेर्‍यात बंदिस्त होत गेले. एका फ्रेममध्ये तर आर.के. सरांनी त्यांच्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटाने व अंगठय़ाने त्यांचा डोळ्यावरचा चष्मा पकडला आहे व कोणत्यातरी गहन विचारात ते गढून गेले आहेत हे दर्शवणारा त्यांचा भाव टिपला गेला. मला आवडलेली ही त्यांची मुद्रा त्यांना दोघांनाही खूप आवडली. आमचे काम संपले होते. इतक्यात त्यांनी त्यांच्या सेवकाला आतून एक चित्न आणायला सांगितले. ते होते आर.के. सरांनीच काढलेले गणपतीचे चित्न. खास आर.के. शैलीतील. गणपतीच्या शेजारी त्यांनीच जन्माला घातलेला ‘कॉमन मॅन’ शेजारी उभा राहून गजाननाला नमस्कार करतोय असं ते चित्न. यावरून आठवलं की या कॉमन मॅनने दैनंदिन कॉमिक स्ट्रिपच्या माध्यमातून सर्व भारतीयांच्या आशा, आकांक्षा, त्नास आणि अगदी धोक्यांचेही प्रतिनिधित्व नेहमी केले आहे. अगदी सदैव अबोल राहून. कॉमिक स्ट्रिपमध्ये तो सहानुभूतीचे प्रतीक आहे. तो पाहतो; पण त्याला हे कळते की या देशासाठी काय योग्य आहे व काय अयोग्य. त्याची पत्नीही आहे; पण ती गप्प बसणारी नाही. ती तिला जे सांगायचे आहे ते निर्धास्तपणे सांगते. तो बुजरा आहे; पण ती आक्र मक आहे. आर. के. लक्ष्मण यांनी या दोघांत जो समतोल साधला आहे त्याला तोड नाही. मला पुढे बोलावत सरांनी ते चित्न मला भेट म्हणून दिलं. अर्थात ती एक आर्ट प्रिंट होती. मी विनंती केली की त्यांनी त्या प्रिंटवर स्वाक्षरी करावी. त्यांनी मार्कर पेन घेतलं आणि त्या चित्नावर त्यांची ती जगप्रसिद्ध स्वाक्षरी केली. मी ते चित्न पाहिलं आणि माझ्या असं लक्षात आलं की प्रिंटमध्ये सही होतीच. म्हणजे आता त्या चित्नावर त्यांच्या दोन सह्या झाल्या होत्या. एक प्रिंटमधील व एक ओरिजिनल. माझा आनंद गगनात मावत नव्हता!स्वत: प्रतिभाशाली व्यंगचित्नकार असलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते की, - ‘‘आपल्या मनातलं भाष्य व्यंगचित्नातून मांडलं जात असतं. त्यात खट्याळपणा व खोडकरपणा असतो. त्यामुळे व्यंगचित्नात रेषेची ताकद आणि कल्पनेची झेप पाहिजे. व्यंगचित्न असं असलं पाहिजे किंवा त्याची कल्पना अशी असली पाहिजे की ज्याला तुम्ही टोला मारता, त्यानं तुमचं कौतुक केलं पाहिजे. अरे वा! सुंदर! असा उद्गार त्याच्या तोंडून आला पाहिजे.’’ या सगळ्या अटी पूर्ण करणारी व्यंगचित्ने म्हणजे आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्ने ! खरंच माननीय बाळासाहेब - ‘यू सेड इट’.

sapaknikar@gmail.com                                   (लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)