शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचे कर्दनकाळ

By admin | Updated: November 15, 2015 18:23 IST

तापी नदीच्या काठावर रानकुत्री मागे लागल्याने गांजलेल्या वाघाचे आदिवासी मुलींच्या धाडसी साहाय्याने प्राण वाचले. त्या प्रसंगाने माङया मनात त्यांच्याविषयी एक विचारचक्र सुरू झाले.

शीळ घालणारे शिकारी रानकुत्रे
प्रकाश ठोसरे
अनुवाद : अरविंद आपटे
 
तापी नदीच्या काठावर रानकुत्री मागे लागल्याने गांजलेल्या वाघाचे आदिवासी मुलींच्या धाडसी साहाय्याने प्राण वाचले. त्या प्रसंगाने माङया मनात त्यांच्याविषयी एक विचारचक्र सुरू झाले. मी रानकुत्र्यांसंबंधी वाचन सुरू केलं, माङया लहानपणीच्या अनुभवांचा धांडोळा घेऊ लागलो, सहकारी वनाधिका:यांशी चर्चा केल्या आणि रानकुत्र्यांची दहशत असणा:या जंगलांना भेटी दिल्या. ह्या रानकुत्र्यांना मराठीत विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात ‘कोळसुंदे’ असंही नाव आहे. टोळीनेच ते शिकार करतात. ही टोळी सहसा एक कुटुंब किंवा दोन कुटुंबाचा संघ असतो. 
सर्वसाधारणपणो रानडुक्कर किंवा हरीण हे त्यांचं आवडतं खाद्य, पण मोठी टोळी गवा, रानम्हैस, अस्वल, बिबटय़ा आणि चक्क वाघासारख्या मोठय़ा प्राण्यांचीही शिकार करतात. रानकुत्री सहसा दिवसा शिकार करतात. प्रथम ते त्यांच्या सावजाचा वासावरून माग काढतात. मग प्रत्यक्ष पाहून पाठलाग सुरू करतात. पाठलाग करत असताना किंवा अचानक मानवी चाहूल लागल्याने त्यांची चुकामूक झाली तर ते एकमेकांना शीळ घालून संदेश देतात. त्यामुळे त्यांना शीळ घालणारे शिकारी असं यथार्थ नाव पडलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते पाळीव प्राण्यांवर सहसा हल्ला करत नाहीत, तसेच इतर जंगली श्वापदांप्रमाणो मनुष्यप्राण्याला घाबरून असतात. 
त्यांची शिकार करण्याची पद्धत काहीशी क्रूर आहे. ते त्यांच्या भक्ष्याला पूर्ण मरण्याआधीच खायला सुरुवात करतात. भक्ष्य तडफडत असताना, त्याचे प्राण जायच्या आधीच ह्यांचं लचके तोडणं सुरू होतं. रानकुत्र्यांच्या मोठय़ा टोळ्यांच्या दहशतीने जंगलात अघोषित संचारबंदी लागू झाल्याची उदाहरणं मी पाहिली आहेत. जेव्हा हे प्राणी पाठलाग करतात तेव्हा हरीण कुळातले प्राणी माणसापासून हाताच्या अंतरावर येतात. ह्या कुत्र्यांच्या धिटाईच्या दंतकथाही ब:याच आहेत. मोठय़ा प्राण्यांवर केलेल्या हल्ल्यांच्या गोष्टीही काही कमी नाहीत. मी वन विभागात रुजू होण्यापूर्वी अशाच एका प्रसंगाचा साक्षी झालो होतो. 
साठच्या दशकातला शेवटचा काळ होता तो. मी कोकटू विश्रमगृहाच्या व्हरांडय़ात आरामखुर्ची टाकून बसलो होतो. देशमुख नावाचे माङया वडिलांचे सहकारी वनाधिकारी़, जे की पुढे माङोही सहकारी झाले, मला ह्या शंभर वर्षे जुन्या विश्रमगृहात घेऊन आले होते. त्यावेळच्या रीतीप्रमाणो देशमुख त्यांची गन सोबत घेऊन आले होते. कडक उन्हाळ्याची ती दुपार होती. विश्रमगृहापासून साधारण तीनएकशे मीटरवर मोहाचं एक मोठं झाड होतं. त्या झाडाखाली एक ढिगा:यासारखं काही तरी होतं. पण हा ढिगारा खालीवर होत होता. नेमका काय प्रकार आहे ह्या उत्सुकतेपोटी मी दुर्बीण डोळ्याला लावली. खरंतर तो ढिगारा म्हणजे रानकुत्र्यांची एक टोळी होती. काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर असं निदर्शनास आलं की, रानकुत्र्यांनी वाघाचा पाठलाग करत त्याला तिथपर्यंत आणलं होतं. सर्वसाधारणपणो वाघ झाडावर चढण्यात तितकासा सराईत नसतो. पण आता जीवनमरणाचा प्रश्न होता. त्यामुळे तो कसाबसा झाडावर चढला होता. तो इतका घाबरला होता की तो थरथर कापत आहे हे मला लांबूनही स्पष्ट दिसत होतं. 
रानकुत्र्यांच्या टोळीला घाबरवून वाघाची मदत करावी ह्या उद्देशाने देशमुखांनी हवेत गोळी चालवली. पण झालं भलतंच. गोळीच्या आवाजाने वाघ आणखीनच घाबरला आणि त्याची झाडावरची पकड ढिली होऊन तो खाली पडला. झाडाखाली उभ्या असलेल्या रानकुत्र्यांच्या बुभुक्षित टोळीने त्या वाघाची खांडोळी केली आणि काही मिनिटांतच त्याचा फडशा पाडला. ह्या झटापटीत दोन-तीन कुत्री जबर जखमी झाली होती. देशमुखांनी गोळी चालवली नसती तर कदाचित वाघ वाचला असता. रानकुत्री माणसाला घाबरतात आणि त्याचं अस्तित्व जाणवलं तर पाठलाग सोडून देतात. अशा बिकट प्रसंगात वाघही माणसाशी जवळीक साधतात. आमच्या ह्या वाघाने एक उडी पुढे मारून विश्रमगृहाच्या जवळ आला असता तर तो वाचला असता आणि कुत्र्यांना रिकाम्या पोटी परत जावं लागलं असतं. पण तसं व्हायचं नव्हतं.  
 कोकटू विश्रमगृहावरून मला आलेला रानकुत्र्यांचा आणखी एक अनुभव आठवला. कोकटूला  ‘हिम्मत’ नावाचा एक डरपोक पहारेकरी होता. एक दिवस त्याने माझी भेट घेऊन परतवाडा ह्या मोठय़ा गावी बदली मागितली, कारण? त्याचे बाकीचे साथीदार गस्तीकरता निघून गेल्यावर त्याने भरदिवसा किचनसमोरच्या झाडाखालच्या ओटय़ावर वाघ बसलेला पाहिला होता. निवासस्थानाच्या दरवाज्याच्या मागे फटीतून तो अर्धा तास त्या वाघाला पाहत उभा होता. त्यामुळे उरलीसुरली ‘हिम्मत’ पण तो घालवून बसला होता. मी हिम्मतची बदली केली. त्याला शहरात आणलं. पण त्याला वाघ, अस्वलं हल्ला करत असल्याची स्वप्नं पडणं काही बंद झालं नाही. रात्रीबेरात्री तो ओरडत सुटायचा. शेवटी कंटाळून मी त्याची कार्यालयात बदली केली. 
कोकटू विश्रमगृहापासून एक किलोमीटरवर आमराई नंबर 1 नावाची जागा आहे. ह्या ठिकाणी बरीच जुनी आंब्याची झाडं होती आणि कोकटू नदीत बारमाही पाणी असणारा डोह होता. ह्या पाणवठय़ाजवळच्या एका आंब्याच्या झाडावर मचाणावर मी रात्नीचा बसलो असताना अचानक एक मोठं ‘आमराईका घुग्गू’ नावाचं घुबड (ब्राऊन फिश आऊल) माङया शेजारी येऊन बसलं होतं.  इथंच मला पहिल्यांदा ह्या शीळ घालणा:या शिका:यांचं दर्शन झालं. उन्हाळ्यातल्या एका दुपारी मी आमराई नंबर 1 च्या जवळून जात होतो. अचानक मला वेगळं काहीतरी जाणवलं. कोकटू नदीतल्या त्या डोहात सांबराची एक मादी एकटीच उभी होती. तिच्या अंगावरचे केस भाल्यासारखे ताठ झालेले होते. अर्थातच तिला कशाची तरी प्रचंड भीती वाटली होती. मी हसनला कार थांबवायला सांगितली आणि जरा जवळ गेलो. मी तिच्या इतक्या जवळ जाऊनही ती जागची हलली नाही ह्याचं मला आश्चर्य वाटलं. मला लगेचच त्याचं कारण उमगलं. जवळच्या एका छोटय़ा उथळ डबक्यात तिच्या वाढ झालेल्या पिलाला चौदा रानकुत्र्यांच्या टोळीने मारून टाकलं होतं आणि त्याला खात होते. मी जवळ येत आहे हे पाहून ते तिथून निघून गेले. मी एका झाडावर चढलो. सुदैवाने त्याच्यावर मचाण होतं. रानकुत्री भक्ष्याकडे परत येतील ह्याची मी वाट पाहत राहिलो. अध्र्या तासाने ती टोळी परतली आणि वीस मिनिटांतच त्यांनी त्या पाडसाचा पूर्णपणो फडशा पाडला. काही काळ त्यांनी डबक्यातल्या पाण्यात विसावा घेतला आणि शीळा घालत ते निघून गेले. ह्या प्रसंगाचे झाडावरून फोटो घ्यायचं भाग्य मला मिळालं.
वाघाचा रानकुत्र्यांनी केलेल्या पाठलागाचा एका बुजुर्ग वनाधिका:याचा (वनपाल) हा अनुभव आहे. फेब्रुवारी महिना होता. अजून हिवाळा संपला नव्हता पण वणव्यांचा हंगाम सुरू झाला होता. जंगलात सर्वत्र सागवान लाकडं पडली होती. ह्या मौल्यवान लाकडांचा आगीपासून बचाव व्हावा म्हणून ह्या वनाधिका:यांनी काही मजुरांसोबत पडावावर मुक्काम केला होता. रात्री जेवणानंतर त्यांनी शेकोटी लावली आणि त्याभोवती रिंगण करून ते झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या नायकाला जाग आली कारण त्यांना जाणवलं की त्यांच्याजवळ कोणी तरी त्यांच्या पाठीलगत पडलं आहे. जेव्हा त्याने कोण आहे हे पाहण्यासाठी डोळे फिरवले तेव्हा कोण आहे हे पाहून त्याचे डोळे खोबणीतून बाहेर पडायचे बाकी राहिले होते. त्याच्या शेजेवर चक्क वाघ होता! तो वनपाल भांबावला, भांबावणारच! पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्यांना रानकुत्र्यांच्या एका टोळीनं घेरलं आहे तेव्हा तो पटकन सावरलाही. त्याने मजुरांना आवाज देऊन उठवलं आणि त्यांनी त्या कुत्र्यांना घालवलं. रानकुत्र्यांची टोळी काही अंतरावर गेली आहे ह्याची खात्री झाल्यावर वाघोबा विरुद्ध दिशेने निघून गेले. 
ही गोष्ट ऐकल्यावर रानकुत्रे मागे लागल्यामुळे माणसाच्या जवळ आलेल्या वाघाचा प्रत्यक्षदर्शी अनुभव घ्यावा अशी मला आस लागून राहिली. आश्चर्यकारकरीत्या ही इच्छा लवकरच पूर्ण झाली. पण प्रत्यक्षदर्शी अनुभव काही मिळाला नाही. 
पूर्वीच्या काळी आमच्याकडे ‘डाक-रनर’ नावाचं पद होतं. पोस्टमनसारखं डाक घेऊन जायचं त्याचं काम असायचं. पण हे काम दुर्गम जंगलात एका कार्यालयातून दुस:या कार्यालयात टपाल घेऊन जाण्याचं असायचं. असाच एक डाक-रनर जंगलातल्या रस्त्यानं जात होता. अचानक त्याला रस्त्यात काही अंतरावर बसलेला वाघ दिसला. नेहमीच्या पद्धतीनुसार त्यानं जवळचं झाडं निवडून त्यावर चढून वाघ निघून जायची तो वाट बघत बसला. वेळ निघून चालली होती पण हा जंगलचा राजा आमच्या डाक-रनरवर काही केल्या प्रसन्न होईना. अचानक रानकुत्र्यांची एक टोळी तिथे अवतरली आणि वाघोबाने एका झटक्यात त्याच झाडावर ङोप घेऊन सरसर वर चढला. हे पाहून कुत्र्यांनी झाडाला वेढा घातला. पण त्यांना जेव्हा माणसाचं अस्तित्व जाणवलं तेव्हा त्यांनी लगेच काढता पाय घेतला. ते निघून गेले आहेत ह्याची खात्री झाल्यावर वाघोबा खाली उतरले. वाघोबाही दूर गेले आहेत ह्याची खात्री झाल्यावर आमचे डाक-रनर महाशयही झाडावरून खाली उतरून आपल्या कामावर रवाना झाले!
 
(लेखक महाराष्ट्राचे सेवानिवृत्त  प्रधान मुख्य वनसंरक्षक आहेत.)
pjthosre@hotmail.com