शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

हर गंगे भागीरथी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 1:30 PM

आम्ही गंगोत्रीच्या वाटेवर होतो. अनेक हिमशिखरांचं इथे दर्शन झालं. फार पूर्वी गंगोत्रीच्या हिमनदीतून भागीरथीचा उगम होत असे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज गंगोत्री हिमनदी एकोणीस किलोमीटर पूर्वेकडे मागे सरकली आहे. भागीरथीचा उगम आज गोमुख येथे होतो.

वसंत वसंत लिमये|गढवाल म्हणजेच आत्ताच्या उत्तराखंडचा पश्चिम भाग, माझ्यासाठी खास जिव्हाळ्याचा. पूर्वेच्या भागाला कुमाऊँ म्हणतात. आजही त्यांच्यात भांडण नसलं तरी दोन्हीही प्रांत स्वतंत्र अभिमान बाळगून आहेत.प्रवासाच्या चौथ्या आठवड्यात, गेल्या रविवारी अरुंधती पाटील (राणी) आणि सुहिता थत्ते ‘हिमयात्रे’त पिथौरागढ येथे सामील झाल्या. मुनस्यारी मार्गे आम्ही ग्वाल्दम गाठणार होतो. पिथौरागढ म्हणजे मानससरोवराला भारतातून जाणाऱ्या यात्रामार्गावरील महत्त्वाचा मुक्काम. मुनस्यारी हे नंदादेवी सँक्च्युरीच्या जवळचं ठिकाण.ढगांशी आमचा पाठशिवणीचा खेळ सुरूच होता. पिथौरागढमधील सुमेरू लॉजवर सुहिता आणि राणी आमच्या आधीच पोहचल्या. वेटरपासून सारी कामं करायला तत्पर असणारा, तिथला हसतमुख मॅनेजर प्रकाश हे आमच्यासाठी सुखावणारं वरदान होतं. राणी वयामुळे तब्बेतीनं थोडी नाजुक; पण उत्साह दांडगा. पाईन आणि देवदार वृक्षांनी नटलेले डोंगर, अधेमध्ये ºहोडेडेण्ड्रॉन म्हणजेच ‘बुरांस’चं जंगल, शीतल हवा अशा वातावरणात आल्या आल्या मोठ्या उत्साहानं दोघी मस्त फिरून, उल्हसित होऊन आल्या. ‘बाळ्या, मन:पूर्वक धन्यवाद! तुझ्यामुळे आम्हाला ही संधी मिळते आहे.’ - मी गारद! नकळत अपेक्षा उंचावल्या होत्या एवढं मात्र खरं.आधी सिक्कीम मग नेपाळ आणि आता उत्तराखंड, हिमालय एकच असला तरी अलगद होत जाणारं स्थित्यंतर मनोवेधक होतं. नेपाळच्या भव्यतेनंतर अलकनंदा, भागीरथी, यमुना आणि त्यांच्या अनेक उपनद्या अंगाखांद्यावर खेळवणारा हिमालय काहीसा सौम्य, ध्यानस्थ भासू लागला होता. असंख्य देवालयं आणि त्यांच्या थेट रामायण महाभारताशी नातं सांगणाºया आख्यायिका, कहाण्या संपूर्ण भारतातील भाविकांच्या श्रद्धेला साद घालतात. त्यातही बंगाली, बिहारी, मराठी, राजस्थानी आणि दाक्षिणात्य भाविक अधिक संख्येनं आढळतात. पंचकेदार, यमनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रिनाथ अशी चार धामं, अल्मोडा, नैनिताल अशी हिलस्टेशन्स, नेहरू घराण्याचं आवडतं बिन्सर, गरु ड येथील बैजनाथ, जागेश्वर अशा अनेक रमणीय, ऐतिहासिक आणि प्राचीन स्थळांनी नटलेला उत्तराखंड, अनेकांना प्रिय असला तरी बाजारू पर्यटनाचं गालबोट त्याला अजून लागलं नाही आहे.आमच्या प्रवासाची सुरुवात धारचुला मार्गावरील जौल्जीबी येथून झाली. इथे काली आणि गोरी या नद्यांचा संगम आहे. इथूनच कैलास आणि मानससरोवर यात्रेला भारतातून जाणारा मार्ग जातो. नेपाळ आणि भारताच्या सीमेवरील काली नदीच्या हिरवट, दुधाळ पात्राकडे पाहात असताना, सहज आठवण झाली. माझ्या बाबांनी पासष्टाव्या वर्षी ही यात्रा केली होती, त्या पिढीचा पीळच वेगळा होता! यानंतर आम्ही निघालो होतो मुनस्यारीला. त्रिशूल, पंचचुली, नंदाघुंटी, नंदाखाट अशा शिखरांच्या दर्शनासाठी. ढगाळ हवामानामुळे त्रिशूलसकट सर्वांनी पूर्ण हुलकावणी दिली. याच हवामानाच्या अनिश्चिततेमुळे आमच्या कॅम्पिंगच्या बेतावर पाणी फिरलं.स्थानिक जनजीवनाची ओळख करून घेण्यासाठी, राणी आणि सुहिता लोकांना भेटायला उत्सुक होत्या. त्यांची विशेषत: बायकांशी, पट्कन गट्टी जमत असे. मुनस्यारीमध्ये आम्हाला उशीर झाल्यानं आमची राहाण्याची सोय होत नव्हती. सावित्रीदेवी अशा भारदस्त नावाच्या तरुण बाईनं, मोठ्या उत्साहानं आमची जोहार हिलटॉप रिझॉर्ट येथे सोय करून दिली. इतकंच नव्हे, तर मिताली नावाच्या आपल्या चिमुरडीला आमच्या सोबत धाडलं. ‘वाण’मधील मधुलीदेवी बिष्ट कपडे धुवायला ओढ्याच्या काठी आलेली. आधी फोटो काढून द्यायलादेखील लाजत होती. पण थोड्याच वेळात, काहीशी भीड चेपल्यावर ती मनमुराद गप्पा मारू लागली.एरवी कदाचित शहरी माणसं एवढ्या आपुलकीनं बोलत नसावीत. धुणी तशीच टाकून, आम्हाला घरी चहासाठी घेऊन जायला ती निघाली होती. ‘मैं तो अब आपकी छोटी बहेन हूँ!’ असं म्हणत आमचा निरोप घेताना रडवेली झाली होती. खरंच ही मंडळी किती निर्व्याज असतात, माणुसकीचा ओलावा मिळताच झुळुझुळु वाहू लागतात! उखीमठचा दिनेश तिवारी, मुखबा येथील दुकानदार रमेश सेमवाल, हर्शिलचा रघुबीरसिंघ रावत अशी कितीतरी नावं, ज्यांच्याकडून आम्हाला निरपेक्ष प्रेम मिळालं. उत्तराखंड नि:संशय प्रेमळ आहे!उत्तराखंडात आम्हाला हिमशिखरांचं नेटकं प्रथमदर्शन झालं चोपटा येथून. चोपटा आहे ९२०० फुटांवर. समोर दिसणारं दिमाखदार चौखंबा, केदारनाथ, थलयसागर, गंगोत्री शिखर समूह आणि दूरवर डोकावणारं बंदरपूंछ. अशा शिखरांच्या दर्शनानं आमच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. चोपटाजवळच कस्तुरीमृगांचं प्रजनन केंद्र आहे.इथून आम्ही सोनप्रयागला पोहचलो, येथे सोनगंगा मंदाकिनीस भेटते. आजकाल केदारनाथला जाणाºया चॉपर्सचा भरभराट इथे तापदायक ठरतो. आम्ही इथूनच दहा किलोमीटर पुढे असणाºया त्रिजुगीनारायणाच्या देवळाला भेट दिली. याच ठिकाणी शिव-पार्वतीचा विवाह झाला, पौरोहित्य केलं होतं नारायणनं आणि तेव्हा चेतलेला होम आजही जळतो आहे, असं या स्थानाचं माहात्म्य!आमचं पुढलं उद्दिष्ट होतं गंगोत्री. या वाटेवर असताना श्रीकंठ, चंद्रपरबत, श्रीकैलाश अशी शिखरं दिसली. गंगोत्री येथून फार पूर्वी हिमनदीतून भागीरथीचा उगम होत असे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज गंगोत्री हिमनदी एकोणीस किलोमीटर पूर्वेकडे मागे सरकली आहे आणि भागीरथीचा उगम आज गोमुख येथे होतो.गंगोत्री मंदिराला भेट देणाºया भाविकांच्या गर्दीत लक्षणीय वाढ झालेली दिसली. साºया प्रवासात, राणी आणि सुहिता मोठ्या भाविकतेनं मंदिरांना भेटी देत होत्या. मी तसा फारसा देव देव करणाºयातला नसलो तरी मला देवालयं आवडतात. गढवाल ही तर देवभूमी. घंटांचा नाद, धुपाचा दरवळ, गर्दीतदेखील सापडणारी गार शांतता हे सारं मला भावतं, अंतर्मुख करतं. साºया गढवालमध्ये एक श्रद्धेचा गंध आढळतो!शनिवारी गंगोत्रीहून परत येताना आम्ही हर्शिल येथे मुक्काम केला. सात हजार आठशे फुटांवर वसलेलं हर्शिल हे छोटंसं गाव. चारही बाजूस गर्द हिरव्या देवदार वृक्षांचे उतार, दिमाखात डोकावणारी हिमशिखरं, खोल दरीतून वाहणारी भागीरथी प्रथमच आठ - दहा किलोमीटर लांब अशा विस्तीर्ण खोºयातून वाहू लागते. गावाच्या पूर्वेला मुखबा येथे गंगा मंदिर आहे. हिवाळ्यात भागीरथी गंगोत्रीहून माहेरपणासाठी इथे येते आणि अक्षय तृतीयेला पुन्हा गंगोत्री येथे परतते, मगच मंदिराचे ‘पट’ खोलतात आणि यात्रेचा सीझन सुरू होतो.हर्शिल म्हणजे हरीची शिळा, विष्णूनं म्हणे इथे तप केलं होतं. ‘लॉक ग्रिफीन’ या कादंबरीच्या रिसर्च निमित्तानं मी इथे पूर्वी येऊन गेलो होतो. अनेक गंमतीशीर गोष्टी या ठिकाणाशी निगडित आहेत. त्यातली बहारदार कहाणी आहे एकोणिसाव्या शतकातील पहाडी राजा ‘विल्सन’ याची.१८४० साली अफगाण युद्धानंतर, यॉर्कशायर येथील विल्सन हा तरुण खडतर प्रवास करून गढवालमधील हर्शिल येथे पोहचला. जवळच्याच धराली येथील ‘गुलाबो’ या मुलीशी लग्न करून तो इथलाच झाला. विल्सन हरहुन्नरी होता. आधी कस्तुरीचा व्यापार, मग त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली, भागीरथी नदीतून देवदारचे ओंडके ऋ षिकेशपर्यंत न्यायचे! भारतीय रेल्वेच्या जन्माच्या वेळचा तो काळ. लवकरच विल्सन श्रीमंत झाला. हर्शिल भागात त्यांनी लावलेली सफरचंदं आजही ‘विल्सन अ‍ॅपल्स’ म्हणून प्रसिद्ध आहेत. गंगोत्रीजवळ लंका येथे त्यानी ‘जढ’गंगेवर पहिला झुलता पूल बांधला, स्वत:च्या नावाची नाणी पाडली.. असं काय काय! कर्तबगार, धडपडी माणसं जगात कुठेही गेली तरी इतिहासावर आपला ठसा उमटवतात. आजही पहाडी ‘विल्सन’ची कहाणी स्फूर्तिदायक आहे.रात्रीचे ८ वाजलेले. भागीरथीच्या पात्रावरून झुळझुळ वाहणारा वारा, दूरवर लुकलुकणारे मुखबा आणि बगोरी गावातील दिवे, दिल्ली कॉलेजातील ‘गंगा ग्रुप’ नावाच्या समाजसेवी संस्थेतील बारा-पंधरा जण आणि आम्ही. लाल-पिवळ्या ज्वाळांनी शेकोटी रसरसलेली. राजदत्त उनियाल खड्या स्वरात गढवाली गीत गात गंगेला आळवत होता. भाषा अनोळखी असली तरी ओळखीची वाटत होती. त्यातला भाव कुठेतरी काळजाचा ठाव घेणारा होता. ‘गंगा यमुनेच्या किनाºयावर असलेले आम्ही खरे भाग्यवान’, असा काहीसा अर्थ असलेलं गीत होतं. पूर्वापार मानवी संस्कृती नेहमीच नद्यांच्या काठी जन्माला आली आणि बहरली. तंत्रज्ञानाच्या विकासासोबत माणूस जगभर संचार करू लागला; पण त्याची जमिनीशी असलेली नाळ सुटत गेली. मी विकासविरोधी नाही. पण भक्कम खोल गेलेली मुळंच कुठल्याही वृक्षाचा डौलदार विस्तार पेलू शकतात, याचं भान असणं मला गरजेचं वाटतं. ताºयांनी चमचमणाºया आकाशाखाली, थंडगार हवेत शेकोटीची हवीहवीशी वाटणारी ऊब घेत, हिमालयाच्या कुशीत, त्या रंगलेल्या संध्याकाळी मी पुनश्च माझ्याच आदिम सांस्कृतिक ॠणानुबंधांच्या जवळ गेल्यासारखं वाटत होतं. इंग्रजी ‘अवतार’ सिनेमातील सांस्कृतिक मायबाप असलेल्या ‘आयवा’ वृक्षाशी नाळ जुळल्यासारखं वाटत होतं!(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)

टॅग्स :Travelप्रवासriverनदी