शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

वेळेचे पक्के

By admin | Updated: April 1, 2017 15:33 IST

चिनी लोक सगळ्याच प्रकारचे खाद्यपदार्थ खूप चवीनं खातात.जेवणाबरोबर ते सतत गरम पाणी किंवा ‘हर्बल टी’ पिताना दिसतात. जेवणाच्या वेळा मात्र अगदी काटेकोर. सहसा कुणी त्या चुकवीत नाहीत.

 - अपर्णा वाईकर

चिनी लोक सगळ्याच प्रकारचे खाद्यपदार्थ खूप चवीनं खातात.जेवणाबरोबर ते सतत गरम पाणी किंवा ‘हर्बल टी’ पिताना दिसतात. जेवणाच्या वेळा मात्र अगदी काटेकोर. सहसा कुणी त्या चुकवीत नाहीत. दुपारी बारा आणि संध्याकाळी सहा. ९५ टक्के चिनी लोक याच वेळी जेवताना दिसतील. अगदी शॉपिंग मार्केटमध्येसुद्धा यावेळी हे लोक डबे उघडून बसलेले दिसतात. त्यावेळी तुम्हाला टॅक्सी मिळणंही कठीण!.. चीनच्या दक्षिणेकडचे डोंगराळ प्रदेशातले लोक बहुतेक करून गरीब शेतकरी आहेत. खाण्यापिण्याच्या पद्धतींतही येथे थोडा फरक दिसतो. या भागात जे पदार्थ मिळतात ते सुकवून टिकवून ठेवण्याची पद्धत जास्त आहे. हे लोक भाताबरोबर खारवलेले किंवा आंबवलेले मासे, भाज्यांची त्यांच्या पद्धतीने बनवलेली लोणची, वाळवलेल्या वेगवेगळ्या शेंगा हे प्रकार खातात.‘शियान’ रेस्टॉरंटमध्ये एक ‘हँड पूल्ड नूडल्स’ हा प्रकार मिळतो. याला ‘ला मियान’ म्हणतात. हे नूडल्स हाताने पिठाच्या गोळ्याला ओढून आपल्यासमोर बनवून, उकडून देतात. त्यावर थोडे सोया सॉस, थोडे व्हिनेगार घालून, लांब मोड आलेले मूग घालून आपल्याला खायला देतात. यावर आपल्याला हवा तेवढा लाल तिखट सॉस म्हणजे ‘ला जाओ’ घेऊन खायचं. हा ला जाओ म्हणजे चिली सॉस लाल मिरच्या, तीळाचे कूट, मीठ आणि भरपूर तेलाने बनलेला असतो. या ला मियान बरोबर चवीला उकडलेले शेंगदाणे, लसूण लावलेले काकडीचे काप, कोवळ्या बांबूची किसून केलेली कोशिंबीर, किसलेल्या ड्राय टोफूची कोशिंबीर, लसूण घातलेली उकडलेली पालकाची पानं, तिखट राइस जेली क्यूब्ज हे कितीतरी शाकाहारी प्रकार आपण खाऊ शकतो. पोट भरतं पण मन भरत नाही, असा आमचा दरवेळेचा अनुभव आहे. हे सगळं शाकाहारी असल्यामुळे बऱ्याच पाहुण्यांना आम्ही तिथे नेतो.‘चायनीज हॉट पॉट’ हासुद्धा एक खूपच इंटरेस्टिंग प्रकार आहे. याचे वेगळे रेस्टॉरंट्स असतात. आपण शाकाहारी किंवा मांसाहारी आणि हिरवी किंवा लाल असा करीचा प्रकार सांगायचा. त्याबरोबर तिखटाची लेव्हल ठरवायची/सांगायची. तसं पाणी किंवा करी ते बनवतात. त्यानंतर भाज्यांचे प्रकार म्हणजे बटाट्याचे, रताळ्याचे, गाजराचे आणि कमळ काकडीचे पातळ काप, पालक आणि इतर हिरव्या भाज्या, कोबीचे तुकडे, मशरूम्सचे हवे ते प्रकार आणि मासे, कोळंबीचे रोल्स, चिकनचे पातळ काप, टोफूचे २-३ प्रकार, मांसाचे ३-४ प्रकार यातलं हवं ते सिलेक्ट करायचं. थोड्या वेळाने आपल्या टेबलवर एक शेगडी आणली जाते. यावर एका मोठ्या भांड्यात आपण सांगितलेली पाणीदार करी असते. मोठ्या ताटांमध्ये आपण सांगितलेल्या भाज्या आणि इतर गोष्टी आणून देतात. ही करी उकळायला लागली की त्यात आपल्याला हव्या त्या गोष्टी घालून ५-७ मिनिटे शिजल्यावर चिमट्याने आपल्या ताटात काढून त्या खायच्या. चवीला अनेक प्रकारचे सॉस असतात. ही करीसुद्धा बाऊलमध्ये घेऊन सूपसारखी पिता येते. मात्र हा हॉट पॉट खायला अतिशय पेशन्स असावा लागतो. भरपूर वेळ आणि मोठ्ठा ग्रुप असेल तर मजा येते. इथलं स्ट्रीट फूड पण बरंच प्रसिद्ध आहे. बहुतेक करून यात बार्बेक्यू फूड असतं. वेगवेगळे कबाबचे प्रकार, तळलेले किंवा भाजलेले टोफूचे काप, पोर्क किंवा बीफचे सातये, काड्यांवर लावलेले खेकडे, बेबी आॅक्टोपस, स्क्वीड किंवा जंबो प्रॉन्स. हे सगळं खायला संध्याकाळी भरपूर गर्दी असते. भाज्यांमध्ये बटाटे, कमळ काकडीचे काप, भाजलेली रताळी, मक्याची कणसं हे प्रकारसुद्धा या गाड्यांवर दिसतात. याबरोबर हवी असल्यास नान, मटन बिर्याणी आणि काही मिठाया पण मिळतात. मात्र आपल्याकडचा शाकाहारी माणूस या भाज्या खाणं शक्य नाही. कारण ज्या शेगडीवर मांस भाजतात त्यावर भाज्यादेखील भाजतात. बिजिंगमध्ये असे प्रकार मिळणारी एक मोठ्ठी फूड स्ट्रीट आहे. खूप सारे टुरिस्ट मुद्दाम तिथे हे सगळं खायला जातात.या सगळ्या साध्या, शाकाहारी किंवा तिखट, तेलकट मांसाहारी जेवणाबरोबर हे लोक सतत गरम पाणी किंवा वेगवेगळ्या वनस्पती घातलेला चहा पिताना दिसतात. कदाचित म्हणूनच यांचं जेवण आपोआप जिरून जात असेल. यांचे बहुतेक पदार्थ शेंगदाण्याचं, मक्याचं, मोहरीचं किंवा तिळाचं तेल वापरून बनवलेले असतात. हे लोक जेवणाच्या वेळा शक्यतो चुकवत नाहीत. दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता ९५ टक्के चिनी लोक जेवताना दिसतील. अगदी शॉपिंग मार्केटमध्येसुद्धा यावेळी हे लोक डबे उघडून बसलेले दिसतात. यावेळी टॅक्सी मिळणंही कठीण असतं. हर्बल चहा किंवा ग्रीन टी मात्र हे लोक सतत पीत असतात. प्रत्येकाजवळ एक छोटा थर्मास असतो. त्यात वेगवेगळे हर्ब्ज. शेवंती, गुलाबाची वाळलेली फुलं, खडीसाखरेचे तुकडे इत्यादि प्रकार ग्रीन टीच्या पानांबरोबर घातलेले असतात. यातलं पाणी संपत आलं की पुन्हा पुन्हा भरत ते दिवसभर पीत राहायचं. यामुळेच हे लोक खूप फिट असतात. इथे इतकी वर्षं राहून यांच्या जेवणाच्या वेळा आम्हीदेखील पाळायला लागलोय. अगदी ६ वाजता जरी नाही तरी ७.३० वाजता आमचं जेवण झालेलं असतं. दिवसातून १-२ वेळा ग्रीन टीसुद्धा प्यायला जातो. भारतीय चायनिज पदार्थांपेक्षा इथल्या खऱ्या चायनिज पदार्थांची चव आणि प्रकार खूपच वेगळे आहेत. या चवींची सवय व्हायला वेळ लागतो. परंतु दोन्हींची तुलना मात्र होऊ शकत नाही. दोन्ही चांगलेच आहेत. या चिनी लोकांच्या सौंदर्यदृष्टीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. रस्त्यांच्या मध्ये आणि दुतर्फा इतकी सुंदर झाडं लावलेली असतात की काय सांगावं! प्रत्येक ३-४ रंगांच्या फुलझाडांची क्रमवारी ठरलेली असते. त्यांच्याभोवती कधी हिरवी झाडं तर कधी नुसतीच गवताची हिरवळ. चौकाचौकांतून फुलझाडांच्या वेगवेगळ्या रचना केलेल्या असतात. कधी उडणारे पक्षी, तर कधी मोठ्ठी सांडलेली फुलांची परडी. अतिशय सुंदर अशी रंगसंगती या सगळ्यांतून दिसत असते. आणि हे रंग अर्थातच ही फुलझाडं ऋतूप्रमाणे बदलत असतात. हे सगळं अखंडपणे करणाऱ्या त्या माळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. दर काही दिवसांनी चौकातल्या रंगसंगती आणि रचना बदललेल्या असतात.शांघायच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जायला हांगपू नदी पार करावी लागते. यासाठी नदीवर ४-५ पूल्स आणि काही टनेल्स किंवा भुयारं या नदीखाली बनवली आहेत. यामधून सतत वाहतूक सुरू असते. या पुलांच्या कठड्यांना सौरऊर्जेवर चालणारे लाइट्स लावलेले आहेत. रात्री हे सगळे पूल अतिशय सुंदर दिसतात. हांगपू नदीच्या काठाला ‘बंड’ असं म्हणतात. या बंडला खूप सुंदर फुलझाडांच्या रचनांनी सजवलेलं असतं. याठिकाणी नेहमीच भरपूर पर्यटक असतात. या नदीच्या पूर्वेला शांघायचा २००० सालानंतर बनलेला नवा भाग बघायला मिळतो. यांचा बांधकामाचा वेग थक्क करून टाकणारा आहे. अगदी अलीकडे म्हणजे २०१५ मध्ये लोकांसाठी सुरू झालेल्या शांघाय टॉवरचं काम २००८ मध्ये चालू झालं होतं. ही १२८ मजली इमारत यांनी अवघ्या सहा वर्षांत उभी केली आणि २०१५ मध्ये त्याचं उद्घाटनही झालं. असं म्हणतात की, या इमारतीचा नवा स्लॅब दर तीन ते पाच दिवसांत पूर्ण होत होता. हे चित्र केवळ शांघायसारख्या मोठ्या शहरातूनच नव्हे, तर अगदी लहान गावांतूनही दिसतं. इथली माणसं पाऊस पडत असतानासुद्धा छत्री घेऊन झाडांचं किंवा कचरा उचलण्याचं काम करताना दिसतात. पूर्वीच्या काळी ही गावं आणि शहरं एवढी स्वच्छ नव्हती. पण आता मात्र यांच्या देशातले लोक स्वच्छतेबाबत फार जागरूक आहेत. चीनमध्ये खूप पर्यटक येतात. आपल्या देशाविषयी चुकीच्या कल्पना मनात घेऊन त्यांनी परत जाऊ नये यासाठी हे नागरिक खूपच जागरूक असतात. जगभरातल्या पाहुण्यांना आपला देश स्वच्छ आणि आकर्षक वाटावा यासाठीही हे लोक खूप मेहनत घेतात. चिनी नागरिकांचं स्वच्छतेविषयीचं प्रेम आणि तिथल्या कायद्यांविषयी पुढच्या भागात..(लेखिका शांघायमध्ये वास्तव्याला आहेत.)भारतीय रामाला चिनी वस्त्रं!भारतीय नववर्ष गुढीपाडव्याचा सण भारतात नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आम्ही इथे चीनमध्येही गुढीपाडवा त्याच उत्साहात साजरा करतो. आमच्याकडे चैत्रात रामाचं नवरात्र असतं. चीनमध्ये आल्यापासून दरवर्षी आमच्या पिढीजात मूर्तींना आम्ही नवी वस्त्रं शिवतो. ही वस्त्रं शिवण्याचं काम कोण करत असेल?- आमची चिनी आया! दर गुढीपाडव्याला तिने स्वहस्ते शिवलेली चायना सिल्कची अत्यंत सुबक वस्त्रं आमच्या रामरायाला आम्ही घालतो!यंदाही आमच्या चिनी आयानं तयार केलेल्या सुंदर वस्त्रांनीच आमचा रामराया नटला!