शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

युद्धविराम नव्हे, हा तर अर्धविराम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 11:21 IST

Iran War: जगाला चिंतेच्या खाईत लोटणाऱ्या अमेरिका/इस्रायल-इराण युद्धामध्ये ज्या पद्धतीने शस्त्रसंधी झालेली आहे ते पाहता युद्धाला मिळालेला हा विराम नसून तो अर्धविराम आहे. या युद्धाचे प्रयोजन काय होते? यास प्रारंभ का झाला? त्याला जबाबदार कोण? भविष्यात याची पुनरावृत्ती होणार नाही याची हमी देणारे सक्षम व विश्वासार्ह नेतृत्व अस्तित्वात आहे का? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. युद्धाचे परिणाम काय यापेक्षा युद्ध हाच परिणाम आहे, हे मान्य केल्यास युद्धाच्या कारणांचा नेमकेपणाने शोध घेता येतो.

- रोहन चौधरी(आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक)इराणमध्ये लोकशाही प्रस्थापित करणे, अण्वस्त्रांपासून रोखणे किंवा खामेनेई राजवट संपुष्टात आणणे ही युद्ध समर्थनासाठी दिली जाणारी कारणे प्रथमदर्शनी आकर्षक वाटतात; मात्र ती वरवरची आहेत. युद्धाशिवाय अमेरिकेला यापैकी अनेक उद्दिष्टे साध्य करता आली असती. उलट युद्धामुळे ही उद्दिष्टे अधिकच दुरावली.  अमेरिकेला याची जाणीव पहिल्याच दिवशी झाली. सर्वोच्च नेत्याची हत्या झाल्यावर ज्या त्वेषाने इराण लढला, त्याच राष्ट्रीय भावनेने तो खामेनेई जिवंत असतानाही लढला असता. युद्धासाठी सैन्याला लागणारा मनोवैज्ञानिक आधार अमेरिकेने स्वतःच इराणला दिला. त्यामुळे नेतृत्वहीन वाटणारा इराण ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यावर काही अंशी वरचढ ठरला.

देश म्हणजे केवळ राजकीय रचना किंवा भूगोल नव्हे; तो इतिहासात तावून-सुलाखून निघालेला सांस्कृतिक आविष्कार असतो. देशाच्या सामर्थ्यात त्या सांस्कृतिक भावनेचा मोठा वाटा असतो. नेमके हे वास्तव अमेरिकेला आजवर उमगलेले नाही. प्रत्येक वेळी इतर देशांत हस्तक्षेप करायचा आणि त्यातून ना त्या देशाचे भले, ना जगाचे. पश्चिम आशियातील संघर्षाच्या मुळाशी हेच अमेरिकन वर्तन आहे. या युद्धातूनही अमेरिकेला धडा मिळेल, अशी शक्यता कमीच.

दुसरा मुद्दा म्हणजे अमेरिका-इस्रायल यांची तथाकथित ‘नैसर्गिक’ मैत्री. हिटलरने ज्यूंवर केलेले अत्याचार माणुसकीला कलंक होते, हे मान्यच; पण त्याच वेदनेचे भांडवल करून इस्रायलने पॅलेस्टाईनमध्ये आजवर जे केले, ते क्रौर्याचेच उदाहरण आहे. अमेरिकेच्या बहुतांश राष्ट्राध्यक्षांनी या धोरणाकडे दुर्लक्ष केले; पण इस्रायलला धोरणात्मक पाठिंबा देण्यावर अमेरिकेचे एकमत कायम राहिले. यातून इस्रायलला जणू विशेषाधिकार मिळाल्यासारखी स्थिती निर्माण झाली. युद्धविरामानंतरही लेबनॉनवरील हल्ले त्याचेच निदर्शक आहेत. इस्रायल हे अमेरिकेसाठी अवघड जागेचे दुखणे ठरले आहे. अमेरिकेचे इस्रायलवरील आंधळे प्रेम आणि इस्रायलचा बेमुर्वतखोरपणा यावर जोपर्यंत लगाम बसत नाही, तोपर्यंत पश्चिम आशिया धगधगतच राहील; आणि युद्धविराम हा वास्तवात अर्धविरामच ठरेल.

इस्रायलने हे युद्ध का लादले?इराणने किंवा अन्य अरब राष्ट्रांनी अमेरिका हिताला साजेसे धोरण आखल्यास अमेरिका युद्ध लादण्याची शक्यता कमी आहे. अमेरिका-सौदी हे त्याचे उदाहरण. अमेरिकानिर्मित व्यवस्थेला इराण आव्हान देत आहे, हा अमेरिकेचा खरा राग. तर इस्रायलला प्रबळ प्रतिस्पर्धी नको आहे. स्वतःचे अस्तित्व अबाधित राखण्याच्या भावनेतून हे युद्ध इस्रायलने लादले आहे. 

अमेरिकेने वेसण घातली असती तर..इराण हे आपले शत्रूराष्ट्र आहे यात दोन्ही मित्रांमध्ये एकमत आहे, परंतु त्याला किती प्रमाणात सामोरे जावे याबाबतीत दोघांत मतभेद आहेत. डोनाल्ड ट्रम्प ही गुंतागुंत समजण्यास कमी पडले. बायडेन यांच्याप्रमाणे ट्रम्प यांना वेसण घालणे  नेतन्याहू यांना शक्य न झाल्यामुळेच जगाला युद्धाचे हे मोठे परिणाम भोगावयास लागले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ceasefire: Not an End, But a Pause in Middle East Conflict

Web Summary : The US's blind support for Israel and Israel's stubbornness fuel Mideast conflict. The ceasefire is just a pause. Israel imposed the war to maintain its dominance, fearing Iran's challenge to the US-led order. Only restraint can bring lasting peace.
टॅग्स :IranइराणWarयुद्धUnited Statesअमेरिका