शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

मनाच्या जखमा भरणारी लस कशी शोधावी, याचे तंत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 06:00 IST

संताप, भीती, दुःख, हताशा या भावना मनात आल्या की फुग्यातील हवा टाचणी लागून एकदम निघून जावी, तसे होते. अशावेळी काय करावे?

ठळक मुद्देजेव्हा प्रत्येकच गोष्ट चुकीची घडत असते तेव्हा आपण एका गोष्टीवर प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवू शकतो आणि ती म्हणजे, या चुकीच्या गोष्टीला आपण देत असलेला प्रतिसाद!

- वंदना अत्रेपरिस्थितीने पाठीत हाणलेले रट्टे सोसल्यावरही ताठ उभे राहून दाखवण्याचा चमत्कार करणारे डॉ. व्हिक्टर फ्रांकेल हे मानवी इतिहासातील एक अलौकिक उदाहरण आहे. शारीरिक-मानसिक छळाची परिसीमा म्हणजे नाझी छळछावणीत त्यांच्या वाट्याला आलेल्या नरकयातना. त्यातून ते निव्वळ वाचले नाहीत, त्यानंतर त्यातून मिळालेले धडे सांगणारे पुस्तकत्यांनी लिहिले. या काळात त्यांनी जपलेला एकच मंत्र होता, “छळ माझ्या शरीराचा होतोय, मनाचा नाही. माझ्या मनापर्यंत काय जाऊ द्यायचे ते मी ठरवणार!” शरीराच्या वाट्याला आलेला अमानुष छळ त्यांनी आपल्या मनापर्यंत कधीच जाऊ दिला नाही..!या महामारीने आपल्याला काय शिकवले? एक - आपली इच्छा असो वा नसो, मनाविरुद्ध गोष्टी घडणारच आहेत. परिस्थिती सुधारण्याची वाट बघत बसलो तर वाट बघतच बसावे लागण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. आणि दोन - एखाद्या महामारीत विषाणूवर लस शोधता येते, मनाला होणाऱ्या जखमा आणि येणारी हताशा त्यावर लस शोधणे अवघड आहे. आपली लसआपल्यालाच निर्माण करून घेत राहायची आहे.ती कशी मिळवता येते?1. पहिली बाब म्हणजे, जेव्हा प्रत्येकच गोष्ट चुकीची घडत असते तेव्हा आपण एका गोष्टीवर प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवू शकतो आणि ती म्हणजे, या चुकीच्या गोष्टीला आपण देत असलेला प्रतिसाद!2. या काळात जर आपण फक्त नकारात्मक, वाईट गोष्टींवरच लक्ष ठेवले तर चांगली कामगिरी करण्याची आपली इच्छाच क्षीण होऊ लागते. आणि त्यातून होणारी चिडचिड, नाराजी, राग या भावना आपल्याला नको त्या मार्गाला घेऊन जातात.3. कोणत्याही आव्हानाच्या काळात कोणती गोष्ट सर्वांत प्रथम करावी? - तर कोणत्या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत आणि कोणत्या गोष्टी नियंत्रणाबाहेर आहेत त्याची यादी करणे, करीत राहणे. गरज असल्यास हे कागदावरसुद्धा लिहून काढावे.4. गोष्टी कागदावर आल्या की लढण्याच्या रणांगणाचा पूर्ण आराखडा आपल्या समोर येतो. हाआराखडा बघताना रोज स्वतःला एका मंत्राचे स्मरण द्यायचे, “जेते कधीही पळून जात नाहीतआणि पळपुटे लोक कधीही जिंकत नाहीत.”5. जेते आणि रणांगण ही भाषा भले युद्धाची वाटेल; पण आव्हान तगडे असेल आणि हिरिरीने हाताळायचे असेल तेव्हा ती भाषा का नाकारायची?6. अशा काळात संताप, भीती, दुःख, हताशा या भावना मनात आल्या की फुग्यातील हवा टाचणीलागून एकदम निघून जावी तशी आपल्या यंत्रणेत असलेली शक्ती जणू एकदम संपून जाते.आणि मग साध्या-साध्या गोष्टीसुद्धा अवघड वाटायला लागतात, जमेनाशा होतात.7. हे टाळण्यासाठी डॉ. फ्रांकेल काय करीत होते?- आपल्या पत्नीचे स्मितहास्य आठवत राहत आणिकैदेतून सुटका झाल्यावर तिची भेट होईल तेव्हा ती कशी हसेल ते सतत डोळ्यांपुढे आणत..!भारतीय योगशास्त्राने, भविष्यातील चित्रणाची साधना सांगितली आहे (चौकट पाहा)कोरोना संकट दिसेनासे झाल्यावर तुम्हाला काय करायचे आहे? त्यातील जवळचे आणि दूरचेटप्पे लिहा. त्याचे चित्रण मनात सुरू करा... त्यासाठी शुभेच्छा!

व्हिजुअलायझेशन कसे कराल?भारतीय योगशास्त्राने, भविष्यातील चित्रण किंवा visualisation करण्याची साधना सांगितली आहे.भूतकाळातील आपल्या एखाद्या उत्तम अनुभवाचे स्मरण करणे आणि भविष्यात तसेच उत्तमआपल्याला साधता येईल याचा विचार करीत त्याची दृश्ये मनापुढे आणणे म्हणजे चित्रण. मनापुढेहे चित्रण करताना त्याला आपल्या स्वसंवादाची जोड जरूर द्यावी. “मी जे काही बघते आहे तेचघडायला मला हवे आहे!” एवढा स्वसंवादसुद्धा पुरेसा आहे.भविष्याचे चित्रण करताना त्यामधीलदूरचे टप्पे आणि जवळचे उद्दिष्ट असे आपण बघू शकलो, त्यासाठी आत्ता काय करायचे त्याचीआखणी करू शकलो तर आपल्या आंतरिक शक्तीला आपल्या प्रयत्नांची दिशा स्पष्ट होते. मनत्यावरच एकाग्र होऊन सर्व शक्तीनिशी ते चित्रण प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करू लागते.आपले प्रतिसाद योग्य येऊ लागतात. हे चित्रण करताना मनात ध्यास दूरच्या भविष्याचा; पणवारंवार चित्रण मात्र जवळच्या उद्दिष्टाचे करीत राहिलो तर स्वतःवरील विश्वास दृढ होतजातो.(ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक)vratre@gmail.com