गडकिल्ले हे महाराष्ट्राचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संचित.
पण वास्तुशिल्पाचे हे अजोड नमुने आज लयाला जाताहेत.
महाराष्ट्रातले दुर्गप्रेमी आणि दुर्ग संघटना यांच्या
अथक प्रयत्नांनंतर आता शासनानंही
‘गडकिल्ले संवर्धन समिती’ची स्थापना केली आहे. समितीचं कामही सुरू आहे.
आता तरी गडकिल्ल्यांचं जतन आणि संवर्धन होऊन त्यांना
पुनर्वैभव प्राप्त होईल अशी सा:यांचीच अपेक्षा आहे.
यगड, राजगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर. किती किल्ल्यांची नावं घ्यायची? महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीची साक्ष असणारे हे बेलाग आणि बुलंद किल्ले!
डोंगरी किल्ले ही तर महाराष्ट्राची शान. जगातल्या कुठल्याही प्रदेशात नसतील इतके डोंगरी किल्ले महाराष्ट्रात आहेत.
शिवरायांनी सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर गडकोटांचा साज चढवला आणि सर्वसामान्य मावळ्यांच्या साथीनं स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.
जाज्वल्य इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्यानं मुसमुसलेले हे किल्ले, पण त्यातल्या बोटावर मोजता येण्याइतक्याही किल्ल्यांची स्थिती आज चांगली नाही.
अनेक किल्ल्यांचे बुरूज ढासळले आहेत. दरवाजे तुटले आहेत. तलाव बुजले आहेत. ठिकठिकाणी खिंडारं पडली आहेत. तटावर रान माजले आहे.
गडांची ही दुर्दशा पाहून व्यथित झालेले इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमी नागरिक, संघटना आपापल्या परीनं हा इतिहास जपण्याचा प्रयत्न करताहेत. त्यांच्याच प्रयत्नांचा भाग म्हणून अलीकडेच महाराष्ट्र शासनानं ‘गडकिल्ले संवर्धन समिती’ची स्थापना केली आहे. संस्थेचं काम सुरू झाले आहे. शासनाकडून काही निधीही प्राप्त झाला आहे. त्यानुसार विभागवार कार्यशाळा होताहेत. जीपीएस या अत्याधुनिक प्रणालीनं गडकिल्ल्यांचं मॅपिंग होणार आहे.
महाराष्ट्रात जवळपास 5क्क् किल्ले आहेत. परवाच झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात 24 किल्ल्यांच्या जतन, संवर्धनाचं काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा शिवयज्ञ पेलण्यास सारेच सज्ज झाले आहेत. तरीही गडकिल्ल्यांचं प्रत्यक्ष संवर्धन हे एक मोठे आव्हानच आहे. त्याविषयीची विशेष लेखमाला या अंकापासून..