शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘हे’  टिकणार नाही!- डॉ. वसंत आबाजी डहाके 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

सभोवती झाकोळून आले आहे.  श्वास नीट घेता येत नाही, घुसमटते आहे.  राजसत्तेला माणसाच्या जीविताचे  काही मोल आहे की नाही, असेही वाटते आहे,  असे वातावरण फार काळ टिकणार नाही. 

ठळक मुद्देकाळोखातही ठिकठिकाणी दिवट्या पेटतच असतात..

- डॉ. वसंत आबाजी डहाके 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे  माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक  डॉ. वसंत आबाजी डहाके यांना ‘महाराष्ट्र फाउण्डेशन’चा दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार पुण्यात नुकताच प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त विशेष संवाद.

* सध्याचा काळ हा बदलांचा काळ आहे. या सगळ्या अवस्थांतराकडे आणि बदलांकडे एक लेखक म्हणून आपण कसे पाहता?-  लेखक हा वर्तमानात जगतो आणि वर्तमानही जगतो. त्यामुळे स्वाभाविक रीतीने अवतीभोवती सर्व क्षेत्रांत जे काही घडत असते त्याची स्पंदने लेखकाच्या मनात उमटतच असतात. ती तो कशाप्रकारे मांडतो हा भाग वेगळा. आपल्या साहित्यात या बदलत्या काळाची जाणीव नक्की होती. आजचे तरुण कादंबरीकार कृष्णात खोत, जी.के. ऐनापुरे, प्रवीण बांदेकर यांच्या कादंबरी लेखनातून अथवा आसाराम लोमटे, किरण राव यांच्या कथालेखनातून बदलत्या काळाचे चित्रण येताना दिसते आहे. आजचा लेखक सजग आहे. अवतीभोवती जे घडतेय त्याची जाणीव त्याला आहे आणि सर्मथपणे ते मांडण्याची ताकदही त्याच्याकडे निश्चित आहे. त्यामुळे लेखक फक्त आपल्या कोशात मग्न असतो असे आजच्या नव्या पिढीबाबत म्हणता येत नाही.* ज्या प्रमाणात अथवा तीव्रतेने बदलत्या सामाजिक अवस्थांतराची स्पंदने यायला हवी तितकी ती मराठी साहित्यात उमटत आहेत असे तुम्हाला वाटते का?- लेखक जेव्हा काही स्पंदने टिपतो अथवा जेव्हा त्याला काहीतरी भिडते, अस्वस्थ करते तेव्हा तो सर्व जसेच्या तसे मांडत नाही. तो काळ लेखकाच्या मनात जातो. त्याचे कलात्मक रूप तो सादर करतो. कारण तो सर्जनशील असतो. त्यामुळे घटनांच्या वर्णनात त्याला रस नसतो. जागतिकीकरणामुळे किती पातळ्यांवर माणूस उद्ध्वस्त होत चालला आहे हे आपल्याला ‘चाळेगत’सारख्या कादंबरीतून दिसून येते. ‘रिंगाण’सारख्या कादंबरीतून विस्थापितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडल्याचे दिसते. पण सरसकट वाड्मयाचा विचार केला तर मात्र मोठय़ा प्रमाणावर ते घडते आहे असे म्हणता येत नाही.* धकाधकीच्या जीवनशैलीने लोकांचे प्राधान्यक्र म बदलत चालले आहेत. या बदलत्या अवकाशात मराठी साहित्याचे भवितव्य काय असेल, असे  वाटते?- धावपळीच्या जीवनशैलीमुळे साहित्य, कलेचा आस्वादच अनेकांना घेता येत नाही. एखाद्या गोष्टीत जीव गुंतवावा, असे काही सापडत नाही. पण या कलांपासून आपण अगदीच दूर गेलो आहोत असेही नाही. त्यामुळे चांगले जे जे असेल ते नवतंत्रज्ञानाच्या मदतीने वाचण्याची सवय लावावी लागेल. दुसरीकडे मराठी साहित्याविषयी कायमच निराशाजनक बोलणे होत असते. वाचक कमी झाला आहे, असेही म्हटले जाते. त्यात काहीअंशी तथ्य असले तरीही ती केवळ एक ‘फेज’ आहे असे मला वाटते. कारण सगळे पर्याय उपलब्ध असतानाही पाश्चात्त्य देशांत छापील पुस्तके प्रकाशित होत आहेत. त्याच्या नवनव्या आवृत्त्याही निघत आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने ही पुस्तके वाचली जात आहेत. त्यामुळे ही ‘फेज’ संपल्यानंतर लोक पुन्हा साहित्याकडे निश्चित वळतील.आजूबाजूला सातत्याने इतके नवनवे बदल तंत्रज्ञानामुळे घडत आहेत की त्याचे स्वरूप नीट लक्षात येईपर्यंत नवे बदल झालेले असतात. या स्थितीचा नीट अंदाजच येत नाही हे वास्तव आहे. अधिक सजगतेने या तंत्रज्ञानाचा वेग समजून घेत तो आत्मसात करणे गरजेचे आहे. पण जगामध्ये ‘क्र ायसिस’च्या काळामध्येच उत्तम साहित्य निर्माण झालेले आहे. तसे याही काळात ते होईल.* 1970च्या दशकात महाराष्ट्राने अनुभवलेल्या एकूणच रेनेसान्समध्ये लेखक-कवींची भूमिका महत्त्वाची होती. आजच्या संदर्भात हे स्थान साहित्यिकांनी आता गमावले आहे असे वाटते का?- त्या काळात लेखकाला जी प्रतिष्ठा आणि सन्मान होता, त्याच्या शब्दाला जे वजन होते ते हळूहळू कमी झाले. अर्थकारणाला महत्त्व येत जगाचे स्वरूप बदलत गेले. त्यामुळे लेखकाच्या शब्दाचे महत्त्व कमी होत गेले. पूर्वी लेखकाचा जो धाक होता, तो आता राहिलेला नाही. बाह्य परिस्थितीत वेगळ्या गोष्टींना प्राधान्य आले असल्याचा तो परिणाम आहे. लेखक म्हणेल ते खरे अशी परिस्थिती आता राहिलेली नाही हे वास्तव आहे.* देशात सध्या जे वातावरण आहे त्याविषयी तुमचे मत काय आहे?- हा आजचा कळीचा प्रश्न आहे यात काहीही शंका नाही. बटरेल्ट ब्रेश्ट एका कवितेत म्हणतो, ‘हा कोणता काळ आहे, इथे साधे झाडांविषयी बोलणेही गुन्हा ठरतो.’ त्यामुळे वाटते की खरेच आम्ही काळोखाच्या काळात जगत आहोत; पण त्याचवेळी अड्रीयन रिच ही कवयित्री आशावाद व्यक्त करीत म्हणते, ‘या अशा काळात झाडांविषयी बोलणेसुद्धा तितकेच आवश्यक असते.’ हे खरंय की, आजच्या घडीला अवतीभोवती झाकोळून आलेले आहे. श्वास नीट घेता येत नाही, घुसमटते आहे. मन भरून आत स्वच्छ हवा घ्यावी अशी हवाच राहिलेली नाही की काय, असे वाटण्याजोगे काहीसे वातावरण आहे. माणसाच्या जीविताला काही मोल आहे असे राजसत्तेला, अर्थसत्तेला वाटते की नाही असाच प्रश्न मनात घोंघावत असतो. एक सामान्य माणूस, एक लेखक म्हणून हे प्रश्न मला पडतात. असे वातावरण कुणाच्याही आरोग्याला पोषक नाही. अर्थात हे असेच वातावरण फार काळ टिकणारही नाही. घनदाट काळोख असला तरीही ठिकठिकाणी दिवट्या पेटतच असतात त्याप्रमाणे साहित्यिकांनी आपली भूमिका ओळखून आपले काम करीत राहिलेच पाहिजे. त्यातूनच ही परिस्थिती आणि काळ नक्की बदलेल.* एकीकडे साहित्यिकांनी भूमिका घ्यावी, असा आग्रह, अपेक्षा असते तर दुसरीकडे साहित्यिकांनी आगीत तेल ओतण्याची कामे करू नयेत असे म्हटले जाते. या संदर्भात आपली भूमिका काय आहे?- माझ्या मते साहित्यिकांनी बोलले पाहिजे. अन्यथा सामान्य जनतेची बाजू कोण घेणार? साहित्यातून लेखक अनेकदा प्रश्न विचारत असतो. ते त्याचे कामच आहे. समाज नक्की कशाने त्रस्त आहे, कोणत्या कारणाने भयग्रस्त आहे हे जाणून घेण्याचे काम लेखक, कलावंत, पत्रकार करीत असतात. समाजाची घुसमट त्यांनाच ऐकू येत असते. समाजाच्या स्तब्धतेला वाचा देण्याचे काम साहित्यिक करतो. त्यात कधी समंजसपणा असतो, कधी प्रगल्भता असते, कधी असंतोष असतो, कधी विद्रोह असतो, कधी प्रतिरोध आणि निषेधही असतो. साहित्यातून कधी समाजव्यवस्थेतील, राज्यव्यवस्थेतील किंवा अर्थव्यवस्थेतील त्रुटी दाखवण्याचे काम झाले तर कोणत्याही सत्तेने भयभीत होण्याचे कारण नसते. उलट त्यांनी असे साहित्य वाचावे. त्यायोगे त्यांची मने मानवी संवेदनशीलतेने झंकारत राहतील.लेखक लिहितो तेव्हा त्याच्या अस्वस्थतेचा तो हुंकार असतो. भेदाभेदरहित असा समाजच कोणत्याही लेखकाच्या, कलावंताच्या मनात असतो. जेव्हा त्यांना तो दिसत नाही तेव्हा त्यांना क्लेश होतात आणि तेच साहित्यातून झिरपत जाते. त्यातूनच उत्तमोत्तम साहित्यकृती निर्माण होतात. सध्याचा काळदेखील त्याला अपवाद नाही उलट पोषक आहे. मनुष्यत्वाला अर्थ देण्याचे काम साहित्यिक करीतच राहणार हे लक्षात घ्यायला हवे.

(मुलाखत : पराग पोतदार)