शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सिंदीच्या तान्हा पोळ्याची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:06 IST

विदर्भात नागपूरची मारबत, पांढुर्ण्याची गोटमार आणि सिंदी (रेल्वे) येथे साजरा होणारा बालगोपालांचा लाकडी नंदी पोळा प्रसिद्ध आहे. या तान्हा पोळ्याची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. पिढ्यान्पिढ्यांपासून साजरा होत असलेला पोळा उत्सव लोकोत्सवाप्रमाणे साजरा होत आहे. यामुळेच सिंदी नगराची पोळासिटी अशी नवी ओळख निर्माण होत आहे.

नंदी देतात कारागिरांच्या कलात्मकतेची साक्षगावातील जयस्वाल कुटुंबीयांचा मानाचा नंदी हा या पोळ्याची ओळख आहे. १९ व्या शतकाच्या प्रारंभी हा लाकडाचा नंदी तयार करण्यात आला. या नंदीचे शरीरसौष्ठव देखणे आणि प्रमाणबद्ध आहे. तो चार फूट उंच, आसनासह नऊ फूट लांब आहे. हा नंदी घडविताना काष्ठ शिल्पकाराने संपूर्ण कौशल्य पणाला लावल्याचे दिसते.

१९७७ मध्ये दीपकसिंह राठौर यांनी बनविलेला साडेतीन फूट उंच उंचीचा हा नंदी अतिशय आकर्षक आहे. तसेच विकास पेटकर यांनी साडेपाच फूट उंच नंदी बनवून पोळ्याची शान वाढविली. रवींद्र बेलखोडे, मुन्ना शुक्ला यांनी मोठे नंदी बनवून पोळ्याचे स्वरूप मोठे केले. यात चंद्रशेखर अवचट, पुरूषोत्तम मुठाळ, प्रणय चावरे, हेमंत सोनटक्के, बांगडे आदींनी पोळा उत्सवात भर टाकली. प्रत्येक नंदी बैलाची सजावट व विद्युत रोषणाई उत्सवात येणाऱ्यांचे मन मोहून घेते.सिंदीला जत्रेचे स्वरूपपोळा सणाची एक महिन्यापासूनच आतुरतेने सिंदीवासी वाट पाहतात. तान्हा पोळ्यासाठी ४ ते ५ दिवसांपासूनच गाव सजविण्यात येते. दरवर्षी ४० ते ५० हजार लोकांच्या साक्षीने हा महोत्सव पार पडतो. लाकडी नंदी बैलांना सजवून ट्रॅक्टर ट्रॉलीवर ठेवले जाते. त्यासमोर आकर्षक देखावेही आकारले जातात. ढोलताशाच्या निनादात नंदींची बाजार चौकाकडे मिरवणूक काढण्यात येते. नंदीमालक व देखाव्यांवर २ ते ३ लाखांपर्यंत खर्च केला जातो. महोत्सवादरम्यान सिंदी गावात प्रत्येकाच्या घरी पाहुण्यांची रेलचेल पाहायला मिळते. नंदींच्या सोबतीलाच १० ते १२ मंडळातर्फे देखावे सादर होतात. यामुळे पोळ्याला लोकोत्सवाचे स्वरूप येत आहे. नगर पालिकेच्यावतीने आयोजित या पोळ्यात पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. हा ऐतिहासिक पोळा डोळ्यात साठविण्यासाठी संपूर्ण विदर्भातून लोक सिंदीत दाखल होतात.

  • प्रशांत कलोडे
टॅग्स :cultureसांस्कृतिक