शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

तिघी, वांझोटेपणाचा शिक्का नको म्हणून सत्तरेक वर्षांपूर्वी या बाईनं आपल्या गावाकडे जाणारा रस्ता निवडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 06:30 IST

पोटी मूल नाही, तर वांझोटेपणाचा शिक्का नको म्हणून सत्तरेक वर्षांपूर्वी या बाईनं आपल्या गावाकडे जाणारा एक रस्ता निवडला, आणि त्याच्या दोन्ही कडांना वडाची झाडं लावायला घेतली.

- ओंकार करंबेळकर

थिमक्का. नानम्मल. मस्तानम्मा.एरवीच्या आपल्या साध्यासरळधुवट लुगड्यासारख्या आयुष्यातया तिघींनी एकेक असाभन्नाट धागा विणलाय,की ज्याचं नाव ते!

थिमक्का. वय वर्षं १०६.- पोटी मूल नाही, तर वांझोटेपणाचा शिक्का नको म्हणून सत्तरेक वर्षांपूर्वी या बाईनं आपल्या गावाकडे जाणारा एक रस्ता निवडला, आणि त्याच्या दोन्ही कडांना वडाची झाडं लावायला घेतली. रोज किमान एक झाड लावायची. आणि कालपर्यंत लावलेली झाडं पोटचं मूल वाढवावं, तशा निगुतीनं वाढवत राहायची. असं गेली कित्येक वर्षं, रोज चाललंय.वयाची शंभरी उलटली, तरी अजूनही रोज चाललंय.**********नानम्मल. वय वर्षं ९८.या वयात आॅलिम्पिकमधल्या अ‍ॅथलिट्स असतात तशा चपळाईनं योगासनं करते ही आजीबाई. आयुष्यभर योगासनं केली आणि दुसºयांना शिकवली.घरापलीकडचं जग पाहिलेलंच नाही.गावाबाहेरचा एकच माणूस नानम्मलच्या चांगल्या ओळखीचा आहे -नरेंद्र मोदी!**********जगभरातून पाच लाखांवर नातवंडांची आॅनलाइन फौज जमवणारी यू ट्यूबस्टार मस्तानम्मा. या आज्जींचं वय अवघं १०६.शेतात चूल पेटवून भसाभस चिरत-कापत-कांडत-कुटत रांधायच्या हटके स्टाइलमुळं५ लाखांहून जास्त फॉलोअर्स मिळवणाºया आजीबाई यू ट्यूबवरून सगळ्या जगभर प्रसिद्ध झाल्या आहेत. मिचमिच्या डोळ्यांतून, गालांमध्ये हसत शेतात स्वयंपाक करणाºया या खमक्या बाईनं एकटेपणाची थोडीथोडकी नाही तर तब्बल आठ दशकं काढली आहेत.आणि गंमत म्हणजे यू ट्यूब म्हणजे काय याचा बार्इंना ठार पत्ता नाही!!!- मुकेश माचकरशिवाजीराव गायकवाड हे मराठी नाव टाकून कर्नाटकातून तामिळनाडूत गेलेल्या एका विलक्षण माणसाची ‘हिट’ आणि ‘फ्लॉप’च्या पलीकडे पोहचलेली अफलातून कहाणीआज जो दिसतो, त्या रजनीकांतमध्ये एक अजब विरक्ती आहे... ती आशकमस्त टाइप बोलघेवडी फकिरी नाही...ऐन तारुण्यात त्याने अफाट यश उपभोगलं आहे. यशाबरोबर आलेली सगळी सुखंही मन:पूत भोगून झाली आहेत. या सुखांच्या पलीकडे काहीतरी शाश्वत आहे, असलं पाहिजे, अशी आंतरिक जाणीव असलेल्या माणसाचा हा तृप्त, निर्लेप संन्यास आहे... तोही राजस!देवांनाही हेवा वाटावा इतकी अफाट लोकप्रियता मिळाल्यानंतरही तो कमालीचा साधा आहे.पडद्यापलीकडे तो जसा असतो तसा दिसतो. टक्कल झाकत नाही आणि पांढरे केसही लपवत नाही. सुपरस्टारपदाचे तामझाम मिरवत नाही, पार्ट्या करत नाही. रंगरोगन थापून, वय लपवून फिरत नाही. दक्षिणेचा हा महानायक उत्तरेत अगदी फाटक्या माणसासारखा हिमालयात तीर्थाटन करून येतो, तेव्हा तिथे त्याला कोणीही ओळखत नाही. सफेद लुंगी आणि शर्टातल्या कोणत्याही अण्णासारखाच तो दिसतो आणि तसाच राहतो-वावरतोही!- असा माणूस राजकारणात, खासकरून आजच्या डिझायनर राजकारणात उतरेल का?उतरला तर चालेल, टिकेल का?राजकारणात तीव्र चिवट महत्त्वाकांक्षा लागते. ती रॉकेटच्या इंधनासारखं काम करते.ते इंधन रजनीकांतमध्ये आहे का?की बस कंडक्टर ते महानायक या भल्या मोठ्या झेपेमध्ये ते संपून गेलं?तामीळ जनता गेली २२ वर्षं त्याच्या आगमनाच्या करेक्ट वेळेकडे डोळे लावून बसली आहे...भारतातल्या घातक अस्मितावादी राजकारणात करेक्ट वेळ यायची वाट पाहायची नसते;आपण जी वेळ साधू ती करेक्ट बनवून दाखवायची असते,हे रजनीकांतला तेव्हाही कळलं नसावं, अजूनही कळलेलं दिसत नाही!- नाहीतर लोखंड तापलेलं असताना हातोडा मारायला तो चुकला असता का?

- वन्दना अत्रेबाबा अलाउद्दिन खान हे तिचे वडील.ते म्हणाले, ‘तुझ्यावर मा शारदेचा आशीर्वाद आहे. हे सूरबहार हाती घे’- आणि तिने एका व्रताचा निखाराच जणू हाती घेतला. पुढे जन्मगाठ पडली ती एका अवलिया कलावंताशी. पंडित रविशंकर. संसार सुरू झाला; पण फुलला नाही!दोघांमध्ये कुणाची कला श्रेष्ठ, असा पेच उभा राहिल्यावर तिने कठोर पण केला,गुरुजी आणि मा शारदा, या दोघांव्यतिरिक्त कुणासाठीही कधीही न वाजवण्याचा!... आणि स्वत:ला दाराआड बंद केलं.पैसा, प्रसिद्धी, नावलौकिक हे सारं झिडकारून ती एकटी जगत राहिली!नम्र पण ठाम आणि निर्मम ‘नकार’ हेच जगणं!!!दक्षिण मुंबईतल्या एका इमारतीत त्या आजही बंद दाराआड राहातात.मध्यरात्र उलटताना सूरबहारच्या स्वरांनी दरवळणाºया बंद दाराच्या आड!मोजके शिष्य वगळले, तर ते स्वर्गीय वादन गेल्यापन्नासेक वर्षांत कुणीही- अक्षरश: कुणीही ऐकलेलं नाही!!!...

 

- शर्मिला फडके...आता इतक्या वर्षांनंतर शोधायला गेलं तिच्या चित्रांतून,पत्रांतून तरी हाती लागत नाही अमृता.एक अमृता पूर्ण बेफिकीर, टोकाची वादग्रस्त मतं बाळगणारी,बेधडक विधानं करणारी, प्रेमप्रकरणं, स्कॅण्डल्स यांना जन्म देणारी, स्वच्छंद, फुलपाखरी वृत्तीची.दुसरी अमृता आत्ममग्न, संकोची, वैयक्तिक नातेसंबंधांच्या जाळ्यात गुरफटून गेलेली, आपल्याला कोणीच समजून घेत नाही असं मानणारी, सोलमेटच्या शोधात सैरभैर झालेली, आपल्या वडिलांचं आपल्याबद्दलचं मत चांगलं राहावं याकरता धडपडणारी.तिसरी अमृता बेबंद लैंगिक संबंधांमधून निर्माण झालेलं अनारोग्य, गर्भपात यांनी ग्रासलेली, निराशावादी.एकामागोमाग एक जोडीदारांकडून शारीरिक संग उपभोगल्यावरही मानसिक प्रेम न गवसलेली अनाघ्रात अमृता....या सगळ्यापल्याडची तिची चित्रं. आणि रंगांच्या, आकारांच्या सौंदर्याला स्पर्श करता यावा म्हणून आसुसलेली,झगडत राहिलेली... तीच!