शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

स्वयंम् शाळेला लाभली ‘निखळ मैत्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:40 IST

कोल्हापूर : गतिमंद मुलांना स्वयंनिर्भर बनविणाऱ्या स्वयंम्् विशेष मुलांच्या शाळेला निखळ मैत्री परिवाराने सोमवारी सव्वा लाखाची मदत दिली. या गु्रपच्या सदस्यांनी शाळेतील २५ मुलांचे आर्थिक पालकत्व स्वीकारले असून, ही रक्कम सोमवारी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली. निखळ मैत्रीसह विविध व्यक्ती, संस्थांच्या पुढाकारातून गेल्या वीस दिवसांत ‘स्वयंम्’मधील ५० गतिमंद मुलांच्या शिक्षणाचा वार्षिक ...

कोल्हापूर : गतिमंद मुलांना स्वयंनिर्भर बनविणाऱ्या स्वयंम्् विशेष मुलांच्या शाळेला निखळ मैत्री परिवाराने सोमवारी सव्वा लाखाची मदत दिली. या गु्रपच्या सदस्यांनी शाळेतील २५ मुलांचे आर्थिक पालकत्व स्वीकारले असून, ही रक्कम सोमवारी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली. निखळ मैत्रीसह विविध व्यक्ती, संस्थांच्या पुढाकारातून गेल्या वीस दिवसांत ‘स्वयंम्’मधील ५० गतिमंद मुलांच्या शिक्षणाचा वार्षिक खर्च या मदतनिधीतून उभा राहिला आहे.कसबा बावड्यातील न्याय संकुलाच्या मागील बाजूस इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने स्वयंम् विशेष गतिमंद मुलांची शाळा चालविली जाते. येथे सध्या १४५ मुले-मुली शिक्षण घेत आहेत. वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे व्यवस्थापनाला शाळेचा खर्च भागविणे अवघड जात आहे; त्यामुळे शाळेने दत्तक पालक योजना सुरू केली. याद्वारे केवळ पाच हजार रुपये भरून एका विद्यार्थ्याचे एका वर्षासाठीचे आर्थिक पालकत्व स्वीकारायचे आहे. याबाबतचे वृत्त २५ जूनला ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. ‘लोकमत’ने केलेल्या या आवाहनाला कोल्हापूरकरांनी प्रतिसाद दिला आणि शाळेकडे दातृत्वाचा ओघ सुरू झाला. गेल्या वीस दिवसांत विविध व्यक्ती व संस्थांनी २५ मुलांचे दत्तक पालकत्व स्वीकारले आहे.शाळेला अर्थसाहाय्य मिळावे यासाठी निखळ मैत्री परिवार या गु्रपने शाळेवर चार मिनिटांचा विशेष व्हिडिओ तयार करून तो फेसबुक आणि व्हॉटस अ‍ॅप ग्रुपवर पोस्ट केला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातूनच नव्हे, तर मुंबईसारख्या शहरातूनही अनेक व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आणि शाळेतील २५ गतिमंद मुलांच्या शिक्षणाचा वार्षिक खर्च मदतनिधीतून उभा राहिला. संस्थेने सोमवारी शाहू स्मारक भवनात आयोजित केलेल्या ‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्यांच्या कार्यक्रमात शाळेचे खजिनदार महेंद्र परमार यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली. यावेळी ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील, शाळेचे संचालक मनीष देशपांडे, मुख्याध्यापक प्रमोद भिसे, गु्रपचे अ‍ॅडमिन सरदार पाटील, किरण रणदिवे, मनोज सोरप, विजय तांबे, दिलीप अहुजा उपस्थित होते.यावेळी सरदार पाटील म्हणाले, ‘लोकमत’मुळे आम्हाला शाळेची माहिती मिळाली आणि अधिकाधिक अर्थसाहाय्य मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. सोशल मीडियामुळे बातमी सर्वदूर पोहोचली आणि गु्रपच्या सदस्यांनी २५ मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला.महेंद्र परमार यांनी ‘लोकमत’ आणि ‘निखळ मैत्री’ने केलेल्या मदतीबद्दल संस्था कायम ऋणी राहील, अशा शब्दांत मनोगत व्यक्त केले. ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनीही ‘लोकमत’च्यावतीने सामाजिक उपक्रमात घेतला जाणारा पुढाकार व कोल्हापूरकरांची दातृत्वाची परंपरा याबद्दल मनोगत व्यक्त केले.स्वीकारले दहा मुलांचे पालकत्वकोल्हापुरातील निवृत्त अभियंता अशोक शिवराम सूर्यवंशी यांनी संस्थेतील दहा मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे, तर मुंबईचे सुनील पद्माकर आरोळे यांनीही मदत केली. कागल येथील प्रणीत चितारी या विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवसाची रक्कम संस्थेला देण्याची इच्छा जाहीर केली. त्यानुसार वडील संजय चितारी यांच्यासह कुटुंबीयांनी यावेळी रक्कम दिली.यांनी केले अर्थसाहाय्यनिखळ मैत्री गु्रप, एस.टी.मधील सुरक्षा रक्षक आनंदा केरबा पाटील, लेखापरीक्षक जितेंद्र कानकेकर, भोई समाजाचे उपाध्यक्ष निखील उत्तम मुळे, आयर्नमॅन विनोद हरदास चंदवाणी, उद्योजक मुरलीभाई पंजानी, लखमीचंद कलानी, उदय नचिते, राजश्री निंबाळकर, म्हाळुंगेचे सरपंच प्रकाश चौगले, तेंडुलकर कंपनीचे मालक भरत तेंडुलकर, अनिता पाटील.