शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

तू आणि मी.. पावसासोबतचा एक दिलखुलास संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 3:00 AM

किती त्रास तुझा !!!महानगरांचे शिव्याशाप खातोस आणि शिवार-वावरातल्या आर्त हाका ऐकत नाहीस कधी कधी !- पण एका स्पर्शाने सगळंविसरायला लावतोस तू ! तू हवा असतोस. हवाच असतोस.आलास की थोडी जगण्याची तलखी कमी होते. थोडं बरं वाटतं.थोडी कविता सुचते.

-नीरजा पटवर्धन

कॅलेण्डरमध्ये पावसाचा महिना लागला आणि तुझी वाट बघणं सुरू झालं.. बदललंय हं चित्न आजूबाजूचं. थोडा झगझगीतपणा कमी झालाय. एक ग्रे वॉश चढायला लागलाय सगळ्यावर ! तुझ्या येण्याची वर्दी येऊन पोहचली.दरवर्षाप्रमाणे आम्ही तुझ्या स्वागताला लागलो. पडायला लागशील तेव्हा पहिल्या पावसात खूश झालेली माणसं, हिरवे भिजलेले डोंगर, वाहतं पाणी, खिडकीच्या गजातून दिसणारा ओला रस्ता, ओली झाडं, दिव्याच्या प्रकाशात दिसणार्‍या पावसाच्या रेषा, अति पडलास की सगळं ग्रे आणि एकमेकांत मिसळल्यासारखं दिसणारं असं शहरातलं काहीतरी, कमी पडलास तर जमिनीच्या भेगा.. किती काय काय !.आणि तू आलास.आलास तो असा की सगळ्यांची दाणादाण उडवलीस. आणि काही ठिकाणी इतकी कोरडी तुझी माया, की तिथे एक टिपूस नाही तुझ्या प्रेमाचं. तुझी वाट पाहताना काळवंडून गेली माणसं. तुझी नक्षत्नं कोरडी चाललीहेत.असा कसा तू? नको तिथे चवताळलायस आणि नको तिथे पाठ फिरवलीयेस?हल्ली असा मूड गेल्यासारखाच वागतोस तू नाहीतरी..***पण तुझा मूड गेलेला नाही आवडत मला. तुझ्याबरोबर खूप जुनी मैत्नी आहे. तुझी गरज आहेच जगाला, मला. तुझ्या गोष्टी आठवणं, चघळत बसणं आवडतं मला. तुला माहिती नसलेली एक गोष्ट सांगते. बघ तुलाही छान वाटेल. ‘किंचितशी खिन्न छटा चेह-यावर वागवत ती उभी. अचानक तिच्या गालावर एक थेंब पडतो. पहिल्या पावसाचा त्वचेला पहिला स्पर्श. काय घडतंय हे समजायला तिला काही क्षण लागतात. तोवर दुसरा, मग तिसरा थेंब पडतो. तिचा चेहरा आनंदाने चिंब. हातावर पाण्याचे थेंब झेलत ती गिरकी घेते. तिच्या आजूबाजूला अशाच तिच्यासारख्या मैत्रिणी. पावसाशी खेळणार्‍या. प्रत्येकीचा पाऊस वेगळा. हळूहळू जमिनीवर पाणी थोडंसं. ती त्यात जोरात उडी मारते. तिच्या मैत्रिणीच्या अंगावर ते पाणी उडतं. मग मैत्नीणपण तेच करते. असा सगळा खेळ. थोड्याच वेळात त्या सगळ्या नखशिखांत भिजलेल्या, माती-चिखलाने माखलेल्या. वरून पडणारं पाणी आणि हातापायाच्या तळव्याशी लोण्यासारख्या चिखलाचा स्पर्श ती अनुभवत राहते. हळूहळू अंतर्मुख होते. तिच्या मैत्रिणीही. एका हातावर थोडीशी माती घेऊन एकेक जण उभी राहते. सगळं चित्न बदललेलं. तळव्यावर ठेवलेल्या मातीकडे बघून मग समोर बघत कविता म्हणायला सुरू करते. मंचावरचा प्रकाश बदलतो. ती आणि सगळ्या मैत्रिणी समोरच्या प्रेक्षकाला पावसातून बाहेर काढून वेगळीकडे नेतात आणि अंधारात दिसेनाशा होतात..’ तरुण रंगमंचावरल्या खर्‍या नाटकातल्या खोट्या पावसाची खोटी आठवण. खोट्या पावसात भिजण्याची आठवण. प्रत्येक प्रयोगात पाऊस खोटा होता; पण प्रत्येक प्रयोगात आम्ही खर्‍याच भिजलो होतो हे पक्कं आठवतंय. तू खरा येतोस तेव्हा असंच भिजायचं असतं हे तेव्हाच माझं ठरलं होतं.नंतर मग साता समुद्रापारच्या दूरदेशात भेटलास.

 

वाळवंटातले डोंगर बघत राहता येतील अशा जागी काम करायचे. तिथे तू आलास आणि मी अशीच भिजले. खरोखरीचा आलास. जून-जुलैचे म्हणजे खास तुझेच महिने. तिथलं ऋतूचं गणित वेगळं; पण माझ्यासाठी हे तुझेच महिने. समोर लांबच लांब बॅकडेक. त्याच्या पलीकडे वाळवंटातले डोंगर. त्यातून कोलोरॅडोला जाणारा रस्ता. डोंगराच्या वर भगभगीत आकाश. तू यायला झालास की समोरच्या चित्नात लगबग सुरू व्हायची.

एरवी अखंड भगभगणारं आकाश अवघ्या पाचेक मिनिटात खरोखरीच गडद जांभळं व्हायचं. वाळूच्या रंगाचे डोंगर आणि त्यावरची खुरटी झुडपं फोटोशॉपमध्ये सॅच्युरेशन कमी करावं तशी रंगहीन आणि काळपट होत जायची. बॅकडेकच्या फरशीवर वाळवंटाची पिवळी झाक पडलेली असायची ती गायब व्हायची. तिथे बर्फगार राखाडी रंग पसरायचा. जिथे काम करायचे त्या इमारतीचा अँडोबी गुलाबी रंग नक्की दिसत राहायचा. तुझ्या रेषा मध्येच प्रकाश पकडून चमकायच्या. माझ्या हातात कधी कुणाचे शूज रंगवायला असायचे तर कधी चामड्याचे पट्टे तयार करायचे असायचे, कधी पुरुषांच्या स्कॉटिश पर्सेस नाहीतर कधी चित्रविचित्न दागिने. माझे हात काम करत राहायचे. डोळे तुला पिऊन घ्यायला उतावीळ. आल्या पावसात भिजायची असोशी माझ्याशिवाय आसपासच्या कोणालाच नाही. हे खास  ‘भारतीय’ वगैरे म्हणावं का? पंधरा मिनिटांच्या ब्रेकमध्ये तुझ्या अगदी काठावर उभी राहायचे. हळूच स्वत:चीच नजर चुकवून दोन - तीन पावलं पुढे जायचे. तोवर कुणीतरी टोकायचंच.. पावसात भिजून सर्दी होईल वगैरे म्हणून नाही; पण तुला असं भेटणं ही मज्जा म्हणून करायची गोष्टच नाही म्हणून.मी काठाशी परत. 

मी माझ्या त्या फिरंगी मैत्रिणींना भारतातल्या मॉन्सून ट्रेक्सबद्दल सांगायला जाई आणि एरवीचं हायकिंग ठिके पण तू असा कोसळत असतानाच मुद्दाम डोंगर चढायला जायचं काय नडलंय हे त्यांना कळत नसे. तिकडे, त्या परदेशी तू येतच असतोस अधूनमधून. आमच्याकडे वर्षातून चार महिने आणि तेही उन्हाळ्याने चांगलं भाजून काढल्यावर. म्हणून बहुतेक भारतात तुझं कौतुक इतकं.आता माझ्या शहरात तू वेड्यासारखा येतोस. नको इतका छळतोस. पण तूच तर मला या शहराला आपलंसं करायला भाग पाडलंस. माझं शहर म्हणायला भाग पाडलंस. नरिमन पॉइंटला मी छत्नी उघडली आणि ‘‘आपुन आया तो भिगनेका ! क्या !’’ अशी दादागिरी करत ती तू  उलटीपालटी करून टाकलीस. ‘हे शहर मी सुंदरही करतो अनेकदा’ असं खडसावून सांगितलंस..मग एकदा एका आलिशान ठिकाणी कुणाला तरी भेटायला थांबलेले असताना खिडकीतून तू दिसत होतास. इतका जोरदार तुझा आवाज, तुझा वेग. 

मी खिडकीशी आले, खिडकीतून बाहेर पडले की खिडकीच विरघळली माहिती नाही. माझा आकार मात्न विरघळला होता. एकमेकांच्या आरपार जात होतो आपण. मी कोसळत होते तुझ्यासारखी अथक.. नाचत होते.. पण मी नव्हतेच.  ..मी तू होते की तू मी होतास?  - कुणीतरी चहा विचारेपर्यंत मी अशीच आकारहीन होते. हातात चहाचा कप घेऊन मी खिडकीबाहेर बघितलं आणि तू डोळे मिचकावून परत कोसळायला लागलास. ही तुझी-माझी गंमत.इकडचे तिकडचे शब्दांचे महापूर, तुझं असून अडचण नसून खोळंबा असणं हे सगळं तुझ्या एका स्पर्शाने गायब होतं.

मी आपली गंमत परत जगते. थोडी जगण्याची तलखी कमी होते. जगण्याने श्वास कोंडल्यासारखा झालेला असतो तो जरा मोकळा होतो.  थोडं बरं वाटतं.थोडी कविता सुचते.

(लोकप्रिय ब्लॉगर असलेल्या लेखिका नाट्य-चित्रपट क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत आहेत.)

needhapa@gmail.com