शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

कथकची राणी

By admin | Updated: November 29, 2014 14:12 IST

कथक म्हणजे सितारादेवी आणि सितारादेवी म्हणजे कथक, हे समीकरण कायमचे रूढ झाले होते व आहे. कथक क्वीन सितारादेवी यांनी आपले एक अढळ स्थान निर्माण केले होते. अशा या ज्येष्ठ व श्रेष्ठ कलावंताचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयीच्या आठवणींना दिलेला हा उजाळा..

 पं. नंदकिशोर कपोते

 
भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीचे अकरा प्रकार आहेत. उत्तर भारतातील कथक, तमिळनाडूचे भरतनाट्यम, केरळचे कथकली, मणिपूरचे मणिपुरी, ओरिसाचे ओडिसी, केरळचे मोहिनीअट्टम, आंध्र प्रदेशातील कुचीपुडी, बिहारचे छाऊ, सत्रिय, गौदिया व थांबता. महाराष्ट्रात यांपैकी प्रचलित लोकप्रिय शैली आहेत कथकनृत्य व भरतनाट्यम्. त्याखालोखाल ओडिसी.
उत्तर प्रदेशातील कथकनृत्य शैली ही एक नैसर्गिक अर्थात सर्वांगसुंदर नृत्त, नृत्य, नाट्य यांनी परिपूर्ण अशी शैली आपले एक खास वेगळेपण टिकवून आहे. नृत्त, नृत्य, नाट्य अर्थात् पदन्यास (लय-ताल), तोडे-तुकडे, गत विकास, अभिनय अशा सर्व शृंगाराने नटलेले, बहरलेले हे कथकनृत्य. आणि ज्या वेळी कथकनृत्य समोर येते, त्या वेळी आठवतात लय व अभिनयाच्या राणी कथक क्वीन सितारादेवी. त्यांनी कथकविश्‍वात आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे. कथकचा प्रचार व प्रसार करण्यात या ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकाराचे मोलाचे योगदान आहे, हे एक निर्विवाद सत्य आहे. कथक म्हणजे सितारादेवी व सितारादेवी म्हणजे कथक, हे समीकरण कायमचे रूढ झाले होते व आहे.
 सितारादेवी यांचे निधन झाले, यावर अजून विश्‍वासच बसत नाही. सप्टेंबर महिन्यात सितारादीदींनी मला फोन केला होता व म्हणाल्या होत्या, ‘ मुझे तुम्हारे पास बुलाओ। मैं १0-१५ दिन तुम्हारे पास रहूँगी, तुम्हे मैं मेरे बनारस घरानें का कथक सिखानेवाली हूँ। मेरे पास कम टाइम है, मेरा व्हिडिओ तुम करो।’ आणि खरोखरच ‘कम टाइम है।’ हे त्यांचे शब्द  खरे ठरले.   
पद्मश्री सितारादेवी या खरोखरच कथकच्या राणी शोभत होत्या. केवळ दोन महिन्यांपूर्वीपर्यंत सोळा वर्षांच्या असल्याप्रमाणे कथकचा साज चढवून कथकनृत्य प्रदर्शनास तयार होत्या. कथक नृत्यातील पद्न्यास (ना धिं धिं धा) व अभिनयावरील प्रभुत्व ही सितारादीदींच्या नृत्याची खास वैशिष्ट्ये! त्यांचा विलोभनीय सर्वांगसुंदर अभिनय रसिक प्रेक्षकांना सदैव भुरळ घालत असे. दीदी पायाद्वारे खड्या पायांचा ना धिं धिं ना अतिशय स्पष्टपणे काढत असत. त्यात एक गोडवा व मोहकता असे. असा इतका सुंदर ना धिं धिं धा मी कधीच कुठल्या कथकनर्तकाला काढताना पाहिल्याचे आठवत नाही.
कथक नृत्यात लखनौ, बनारस, जयपूर व रायगड ही चार घराणी. यांपैकी महत्त्वाचे बनारस घराणे. याच्या सितारादेवी मुख्य प्रचारक व प्रसारक होत्या. सितारादेवी  या पं. सुखदेवमहाराज मिश्रा यांच्या कन्या. प्राचीन काळी कथकनृत्य हे केवळ पुरुषच करीत असत. स्त्रियांना नृत्य करण्याची परवानगी नव्हती. एखाद्या स्त्रीने नृत्य करण्याचा प्रयत्न केला तर त्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिले जायचे. अशा काळात बनारस घराण्याचे मुख्य प्रवर्तक पं. सुखदेवमहाराज यांनी आपल्या तीन कन्या अलकनंदादेवी, तारादेवी (स्व. पं. गोपीकृष्ण यांच्या आई) व सितारादेवी यांना समाजाची पर्वा न करता कथकनृत्य शिकविण्यास सुरुवात केली होती हे विशेष. सितारादीदींनी अशा प्रकारे बनारस घराण्याचे शिक्षण आपले वडील पं. सुखदेवमहाराज यांच्याकडे पूर्ण केले, तर लखनौ घराण्याचे शिक्षण गुरू स्व. पं. अच्छन महाराज (पं. बिरजूमहाराजांचे वडील), तसेच  पं. शंभूमहाराज व  पं. लच्छूमहाराज यांच्याकडे घेतले.
सितारादेवी या नटराज गोपीकृष्ण यांच्या मावशी. सितारादीदींचा जन्म १९२२ मध्ये बनारस येथे दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी झाला. सितारादीदींनी याविषयी मला एक सुंदर गमतीशीर किस्सा सांगितला, की ‘धनत्रयोदशीच्या दिवशी माझा वाढदिवस असल्यामुळे अभिनेते दिलीपकुमार मला ‘धन्नो’ या नावाने हाक मारायचे. त्यामुळे चित्रपट क्षेत्रात मला सगळे कलाकार ‘धन्नो’ या नावानेच ओळखायला लागले’. 
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक के. आसिफ यांच्या सितारादेवी या पत्नी. सितारादेवींनी अनेक हिंदी चित्रपटांत नायिकाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्या काळात कथक नर्तिका व हिंदी चिटपट नायिका म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शनही केले होते. वयाच्या १६व्या वर्षी सितारादेवींनी गुरुवर्य पं. रवींद्रनाथ टागोर यांच्यासमोर सुंदर कथकनृत्य सादर केले. सितारादेवींचे सुरेख नृत्य पाहून पं. रवींद्रनाथ टागोर भारावून गेले व त्यांनी सितारादेवींना‘कथकक्वीन’ उपाधी (पदवी) दिली. पुढेसितारादीदींना कथकक्वीन म्हणूनच ओळखले जाऊ लागले. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी कथक नृत्यास लोकप्रियता मिळवून दिली. सितारादीदींनी कथकनृत्य घराघरांत पोहोचवले. त्यांच्यामुळे कथकनृत्य क्षेत्रात मुली मोठय़ा प्रमाणात आल्या. सितारादीदी मुंबईत स्थायिक होत्या. त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू आहेत. दीदी परखड (स्पष्टवक्त्या) होत्या.  त्या जेवढय़ा कडक होत्या, तेवढय़ाच प्रेमळ होत्या. दीदींचा कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रमामधून उठून जायची कुणाचीही हिम्मत नसे, इतका त्यांचा दरारा होता. त्यामुळे सितारादीदींचा कथकनृत्याचा प्रत्येक कार्यक्रम म्हणजे  रसिकांना एक आगळावेगळा अनुभव रसिकांना देऊन जात असे. तर सौंदर्यपूर्ण अंग, जोरकस पदलालित्य व अभिनयावरील प्रभुत्व त्यामुळे सितारादेवींचे नृत्य सदैव कलाप्रेमींना मेजवानीच ठरत होते.
 पुण्यात प्रथमच सन २00२ मध्ये सितारादीदी माझ्याकडे आल्या. त्यामुळे केवळ कथकप्रेमीच नव्हे, तर सर्व पुणेकर त्यांना पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी आतुरले होते. माझी संस्था नंदकिशोर कल्चरल सोसायटी व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कथक महायज्ञ’ नावाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.  सितारादीदींचे स्वागत आम्ही शाही थाटात केले. सर्व पुणेकर ८0 व्या वर्षी सितारादेवींचे अप्रतिम नृत्य पाहून धन्य धन्य झाले. 
मला आठवते, २0१२ मध्ये पुण्यात सितारादेवींचे नृत्य होते. मी रंगमंचावर गायक वादकासमवेत बसलो होतो. दीदींनी कथकनृत्य पेश करून रंगमंचावर मला जवळ बोलावले व दीदींनी आपला कंबरपट्टा (सितारादीदींनी स्वत:च्या हातांनी तयार केलेला हे विशेष) हजारो प्रेक्षकांच्या समक्ष माझ्या कंबरेला बांधला व ‘ही माझी भेट आहे, जपून ठेव’ असे म्हणाल्या. हा मला मिळालेला सर्वांत मोठा पुरस्कार आहे. अशा महान कलाकाराकडून भेट मिळणे हा माझ्यासाठी सुवर्णक्षण होता. 
 या वयातही त्यांनी आपले सौंदर्य टिकवून ठेवले होते. माणसाने सुंदर कसे राहावे, हे सितारादेवींकडून शिकावे. सितारादीदींचे जगण्यावर खूप प्रेम होते. त्यामुळेच दीदी आयुष्य आनंदात जगल्या.
माझ्या घरी त्या पुण्यात (१५ फेब्रुवारी २0१४) सर्व घरात, देवघरात देखील फिरल्या आणि सितारादीदी मला म्हणाल्या, ‘नंदकिशोर, देखो मैंने पुरे घर में मेरे पैर रख के मेरी निशानी तुम्हारे पास छोड. दी है। मेरी सारी यादें तुम्हें सौंप दी हैं।’ हे ऐकून मला गहिवरून आले व सितारादीदींना मी म्हणालो, ‘दीदी, आपको सौं साल पुरे होने के बाद भी मेरे पास आना है और तब आपका जनमदिन मैं धुमधाम से मनाऊँगा।’
 त्यांच्या निधनाने कथक विश्‍वात जी 
पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून न येणारी आहे. सर्व कलाकारांचा आधारस्तंभ हरवला आहे. कथक विश्‍वातील सितारादीदी प्रकाशमान तारा आहेत. काळाच्या पडद्याआड सितारादीदी गेल्या असल्या, तरी कथकनृत्य रूपाने त्या सदैव आपल्यात असणार आहेत. ज्या वेळी कथकनृत्याचे नाव 
घेतले जाईल, त्या त्या वेळी त्यांचे अखंड स्मरण 
होत राहील..
(लेखक कथक नर्तक आहेत.)