शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'पुनश्च'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 07:16 IST

एका रुपयात एका जुन्या लेखाची नवीकोरी डिजिटल पुनर्भेट

'पुनश्च'!... हे मराठीमधले पहिलेवहिले डिजिटल नियतकालिक!किरण भिडे या अभ्यासू तरुणाने त्याची निर्मिती केली आहे. हे डिजिटल नियतकालिक वेब पोर्टल आणि अँड्रॉईड अ‍ॅपच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचते आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. रत्नागिरीच्या प्रवासात लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळी जतन केलेले त्यांचे अग्रलेख वाचायला मिळण्याचा क्षण एका नव्या उपक्रमाला जन्म देऊन गेला. एरवी हॉटेल व्यवसायात असलेल्या किरण यांची ती पहिलीच ‘केसरी’ भेट होती! जुने कालसुसंगत संदर्भ वाचायला मिळणे हा किती दुर्मीळ आनंद आहे हे जाणवल्यावर त्यांना मग छंदच लागला.. जुने लेख शोधून वाचण्याचा, स्वत:च्या विचारांना समृद्ध करण्याचा.

बाळशास्त्री जांभेकरांनी काढलेले पहिले दर्पण वृत्तपत्र, पूर्ण मराठीतले पहिले वृत्तपत्र मुंबई अखबार, भाऊ महाजनांचे प्रभाकर व त्यातील लोकहितवादींची शतपत्रे.. इथपासून नियतकालिकांची उज्ज्वल अशी प्रतिभासंपन्नतेची परंपरा धुंडाळणे किरण भिडे यांनी सुरू केले. १९०९ ला का. र. मित्र यांनी काढलेल्या पहिल्या दिवाळी अंकापासूनचे महाराष्ट्रात प्रकाशित होणारे सारे दिवाळी अंक, सत्यकथा, ललित, ‘मुद्राराक्षसाचा विनोद’ किंवा ‘उपसंपादकाच्या डुलक्या’ अशी सदरे असलेले अमृत, विचित्र विश्व, महाराष्ट्राच्या सामाजिक वाटचालीचा दस्तावेज असलेले माणूस... या साºया साहित्याचे डिजिटायझेशन करता आले तर ते नष्ट होणार नाही, चिरंतन राहील हा विचार करून भिडे यांनी या साहित्याच्या डिजिटायझेशनसाठी पुढाकार घेतला आणि हे शिवधनुष्य उचलले.

या प्रयत्नांचे वेगळेपण आणि महत्त्व जपले जावे म्हणून त्यासाठी अत्यल्प वर्गणी ठेवली. ती भरू इच्छिणाºया वाचकांनाच त्यात सामील करून घ्यायचे ठरवले. त्यातून निवडक पण चोखंदळ मंडळी आॅनलाइन जोडली गेली. त्या सा-यांपर्यंत हा वैचारिक ठेवा पोहोचण्याची सिद्धता झाली. या प्रयत्नांना मूर्तरूप आले आणि ‘पुनश्च’ नावाने संकेतस्थळ साकारले. वेबसाइटवर आणि अ‍ॅपवर हे लेख वाचण्याची, त्याच्यावरील प्रतिक्रिया वाचण्याची आणि सोशल मीडियावर शेअर करण्याची सुविधाही उपलब्ध झाली. रुपयाला एक इतक्या कमी शुल्कात शेकडो लेख त्यांनी या माध्यमातून जगासमोर आणले आहेत. पहिले सशुल्क डिजिटल नियतकालिक म्हणून त्याचे महत्त्व निश्चितपणे वेगळे आहे.संकेतस्थळ : http://punashcha.com/