शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

फिलिप्स आणि एसबीआय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 06:00 IST

प्रत्येक उद्योजक, सेवा पुरवठादार ग्राहकाला वस्तू-मालाच्या पलीकडचा अनुभव देताना ग्राहकाच्या मनात  आशाही निर्माण करत असतो.  आपल्या सेवेचा सारांश लोकांपयर्ंत  पोहोचवण्यासाठी लोगोचा वापर केला जातो.  त्याच माध्यमांतून ते लोकांच्या मनात आपलं घर आणि स्थानही निर्माण करतात.

ठळक मुद्देब्रॅण्ड आणि ब्रॅण्डिंगसाठीचे अनोखे प्रयत्न..

- स्नेहल जोशी

बरेच दिवस झाले आपण सगळे घरात बंद आहोत.  बाहेर पडतो ते फक्त गरजेचं सामान घ्यायला. हे सामानही आता आपल्याला  विशिष्ट अंतर पाळून  घ्यावं लागतं आहे. दुकानातल्या  ह्या वस्तूंच्या गर्दीतून आपल्याला हव्या त्या  नेमक्या ब्रँडची वस्तू आपण कशी शोधून काढतो? एखाद्या मॉल मध्ये किंवा बाजारात आपल्या आवडत्या कपड्यांचं दुकान लांबून, गर्दीतून नेमकं कसं शोधून काढतो? प्रत्येक दुकानाच्या बाहेर नावाची पाटी असतेच, वस्तूंवरही ब्रॅँडचं नाव लिहिलेलं असतं, पण लांबून चटकन दृष्टीस पडतात, ओळखू येतात ती चिन्हं किंवा आकृतीबद्ध लोगो. हे लोगो म्हणजेच एखाद्या कंपनीची, दुकानाची, त्यांच्या उत्पादनाची ओळख. विसाव्या शतकात भांडवलशाही बरोबर उपभोग्यतावाद उंचावू लागला. त्याच बरोबर खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण झाल्याने आपण आज बाजारात उत्पादकांची चाललेली चुरशीची स्पर्धा अनुभवतोय. ह्या स्पर्धेत उत्पादक म्हणून आपण कोण आहोत,  लोकांना काय देतो आहोत,  स्पर्धेपासून कसे वेगळे आहोत,  हे लोकांपयर्ंत पोहोचण्याकरता आपल्या ब्रँडची ओळख पटवणं आणि ती सिद्ध करणं हे प्रत्येक  उद्योजकासाठी काळाची गरज बनलेली आहे. हे एकदा करून संपत नाही. नवनवीन माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपयर्ंत सतत पोहोचत राहावं लागतं, त्यांच्या नजरेत आणि आठवणीत टिकून राहावं लागतं. यालाच ब्रँडिंग म्हणतात. आणि ब्रँडिंगमध्ये ब्रँड आयडेंटिटीसाठी लोगो खूप महत्वाचा घटक आहे.एखादी व्यक्ती असो, विना-नफा काम करणारी संस्था असो, स्टार्ट-अप असो किंवा एखादा मोठा उद्योग असो, त्यांची  ओळख लोकांना कशी होते, त्यांच्या ब्रँडचा काय बोध होतो यावर त्यांची यशस्विता सर्वस्वी अवलंबून असते. तेव्हा लोगो डिझाईन करताना खूप बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. उद्योजक- उत्पादन, सल्ला किंवा सेवा यांची विक्री करतात. त्यामागे त्यांची काही धोरणं असतात, गुणवत्तेचे ठरवलेले निकष असतात, कार्यप्रणालीचं प्रमाण असतं, नैतिक आणि सामाजिक बांधिलकी असते. थोडक्यात, प्रत्येक उद्योजक त्याच्या ग्राहकाला वस्तू-मालाच्या पलीकडे जाऊन अनुभव देत असतो, आणि ग्राहकाच्या मनात आशा देखील निर्माण करत असतो. या सगळ्याचा सारांश लोकांपयर्ंत पोहोचवण्याचं काम लोगो करत असतो. त्यात वापरलेले आकार, रेषा आणि रंग हे सगळेच त्याचा बोध होण्यासाठी पूरक असतात. अश्याच काही लोगोंच्या गोष्टी पाहूया. फिलिप्स रेडिओफिलिप्स ही इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणारी जगविख्यात डच कंपनी आहे. सामान्य जनांच्या घरात पहिले रेडिओ ट्रांझिस्टर आले ते फिलिप्सचे. फिलिप्सच्या उत्पादनांमध्ये, जाहिरातींमध्ये एक समान सूत्र नाही असं एका तरुणाला वाटलं आणि त्याने तसं पत्र लिहून कंपनीला कळवलं. त्यात त्यांनी काही परिणामकारक बदलही सुचवले. हा तरुण म्हणजे नुकताच आर्किटेक्ट झालेला लुई काफ. आंतोन फिलिप्स यांना काफच्या कल्पना आवडल्या आणि त्यांनी काफना डिझायनर म्हणून रुजू करून घेतलं. त्यांनी सुरुवातीला प्रसिद्धी आणि जाहिरात विभागाचा ताबा घेतला पण लवकरच प्रॉडक्ट डिझाईनचं कामसुद्धा काफ करू लागले. 1930 साली त्यांनी रेडिओ डिझाईन केला. त्यांनी विचार केला, रेडिओच्या स्पीकरवर जी जाळी असते त्याला आकाराचं बंधन नाही, मग ती नक्षीदार असायला काय हरकत आहे? लोक दिवसभर र्शम करून संध्याकाळी शांतपणे रेडिओचा आस्वाद घेतात. याचं प्रतीक म्हणून लाटा आणि तारे वापरून जाळी डिझाईन केली. ह्या डिझाईनला अमाप लोकप्रियता मिळाली. काफने ही लोकप्रियता हेरून जाळीचं नवीन डिझाईन ही फिलिप्सची ओळख म्हणून वापरायला सुरुवात केली. आज 90 वर्ष  झाली, फिलिप्सने कितीतरी नवीन उत्पादनं बाजारात आणली, पण आजही त्या लाटा आणि तारे ही ओळख कायम आहे.एसबीआयचा लोगोआणखी एक उदाहरण. ते आपल्या रोज नजरेस पडणारं आहे - स्टेट बँक ऑफ इंडिया. ब्रिटिशकालीन इंपिरियल बँक ऑफ इंडिया ही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1955 साली स्टेट बँक ऑफ इंडिया झाली. त्यामुळे स्वत:ची भारतीय ओळख लोकांसमोर नव्याने देणं त्यांना क्रमप्राप्त होतं. बँकेची खोलवर रुजलेली मूल्यं आणि देशभर असलेला प्रचंड विस्तार लक्षात घेऊन तिला वटवृक्षाची प्रतिमा दिली गेली. मात्र काही वर्षांनी हा लोगो जुनाट वाटू लागला. छपाईलादेखील तो फारसा सुलभ नव्हता. शिवाय वडाच्या सावलीत इतर काही वाढू शकत नाही, अशी टीका होऊ लागल्याने पुन्हा एकदा ही ओळख बदलायचं ठरलं.  1971 साली शेखर कामात यांनी स्टेट बॅँक ऑफ इंडियाचा नवीन लोगो डिझाईन केला. हा अतिशय स्पष्ट, सुटसुटीत, दृष्टीला सुलभ आणि पाहताक्षणी ओळख पटेल असा आहे. गंमत म्हणजे या लोगोचे लोकांनी अनेक अर्थ लावले आहेत. बाहेरचं निळं वतरुळ म्हणजे कुलूप आणि त्यात किल्लीसाठी असलेलं भोक - हे सुरक्षिततेचं प्रतीक असल्याचं भासतं. काहीजणांना गोलात असलेल्या रिकाम्या भागाचा आकार माणसासारखा वाटतो; तेव्हा प्रत्येक माणूस / ग्राहक हा बँकेसाठी मोलाचा आहे असं हा लोगो दर्शवतो असंही मत आहे. आकाशी निळा रंग जबाबदारी, निष्ठा आणि विश्वसार्हता दर्शवतो. यावरून बँकेच्या कामकाजाचं स्वरूप लक्षात येतं. लोगोमध्ये दडलेल्या अनेक अर्थांमुळे तो अधिक आकर्षक वाटतो हे नक्की.

snehal@designnonstop.in(लेखिका वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)